AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमरावतीत शिक्षक मतदारसंघात महायुतीत राडा? शिंदे सेनेच्या या नेत्याची उमेदवारी पक्की, भाजप उमेदवार बंडखोरी करणार?

Amravati Teachers Constituency Election: अमरावती शिक्षण मतदारसंघात महायुतीमध्येच मोठ्या बंडाची चिन्हं आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ही जागा सुटल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. तर भाजपचा इच्छुक उमेदवार बंडखोरी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या भांडणात आता तिसर्‍या उमेदवाराचा लाभ होण्याची कुजबुज सुरू झाली आहे.

अमरावतीत शिक्षक मतदारसंघात महायुतीत राडा? शिंदे सेनेच्या या नेत्याची उमेदवारी पक्की, भाजप उमेदवार बंडखोरी करणार?
अमरावतीत शिक्षक मतदारसंघ
| Updated on: Sep 30, 2026 | 10:55 AM
Share

अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक चुरशीची ठरण्याची शक्यता आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघ शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला जाणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. शिवसेनेकडून विद्यमान आमदार किरण सरनाईक यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. तर या उमेदवारीवरून भाजपचे इच्छुक उमेदवार बंडखोरी करण्याच्या पवित्र्यात आहेत. मतदारसंघ भाजपला मिळावा यासाठी काल अमरावती मधील भाजपच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. यामुळे या निवडणुकीत महायुतीत मोठा राडा होण्याची शक्यता आहे. तर तिसऱ्या उमेदवाराला फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

उमेदवाराकंडून मोर्चेबांधणी

अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवारांनी मोर्चेबांधणीला अगोदरच सुरुवात केली होती. एकदा उमेदवारी जाहीर झाली की उमेदवार प्रचाराच्या रणधुमाळीत आणि भेटीगाठीत मश्गूल होतील.23 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. त्यापूर्वी उमेदवारांना जवळपास 20 दिवस प्रचारांसाठी मिळणार आहेत. अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ या पाच जिल्ह्यांचा समावेश या मतदारसंघात होतो. काँग्रेस, भाजप, शिंदे शिवसेना, उद्धव सेनेसह काही अपक्षांनी आणि विविध शिक्षक संघटनांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. विद्यमान आमदारांसह इच्छुकांना यंदा जिंकण्यासाठी जोर बैठका माराव्या लागणार असे चित्र आहे.

भाजपचा दावा संपुष्टात, महायुतीत राडा

विधान परिषदेच्या अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघातील भाजपचा दावा संपुष्टात आल्याचे मानले जात आहे. हा मतदारसंघ शिंदे शिवसेनेकडे गेल्यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. काँग्रेसमधून शिंदे शिवसेनेत प्रवेश केलेले आमदार किरण सरनाईक आणि गेल्या निवडणुकीत छाप उमटवणारे प्रा. श्रीकांत देशपांडे यांनी उमेदवारी अगोदरच जाहीर केलेली आहे. दोन्ही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता कुणाचे नाव जाहीर करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पण सूत्रांच्या माहितीनुसार, किरण सरनाईक यांचं पारडं जड आहे.

भाजपकडून दोन नावं पुढे

भाजपचा दावा संपुष्टात आला असला तरी पक्षाच्या वर्तुळात डॉ. संगीता शिंदे आणि डॉ. सुमित पवार या दोन नावांची मोठी चर्चा सुरू आहे. याशिवाय भाजप नेते शेखर भोयर हे 5 तारखेला अर्ज भरणार असल्याचे समजते. यामुळे महायुतीत बंडखोरीचे संकेत मिळत आहेत. विद्यमान आमदार किरण सरनाईक यांच्यावर भोयर यांनी आरोप केला आहे. त्यांनी काम केले नसल्याने ते आता साडी वाटप कार्यक्रम हाती घेणार असल्याची टीका त्यांनी केली आहे.

Follow Us
रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
Ratnagiri : रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; गजानन महाराज...
Dry Drought Help : राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; शेगावच्या गजानन महाराज संस्थानकडून तब्बल एवढी मदत जाहीर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर....
Thane : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर, जुन्या वादातून....
संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
मोठी बातमी! संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य
Sachin Waze : साडेपाच वर्षांनी सचिन वाझेला जामीन! अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
Thane | ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट