Video : Amravati rain | अमरावतीत धो-धो बरसला, पावसात बाजार समितीतील शेतमाल भिजला, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान

अमरावतीत आलेल्या धुव्वादार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत विकायला आणलेला हजारो क्विंटल शेतमाल पावसाने भिजला. मुसळधार पावसामुळे शेतमाल पाण्याने वाहत गेला. पेरणीचे दिवस असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणावर शेतमाल आणतात. बाजार समितीकडून उपाय योजना होत नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.

Video : Amravati rain | अमरावतीत धो-धो बरसला, पावसात बाजार समितीतील शेतमाल भिजला, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान
पावसात बाजार समितीतील शेतमाल भिजला
Follow us
| Updated on: Jun 18, 2022 | 5:11 PM

अमरावती : विदर्भात मान्सून कोसळतोय. अमरावतीतही आज मान्सून कोसळला. अमरावतीमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान (Loss) झालंय. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत (Agricultural Produce Market Committee) विकायला आणलेला शेतमाल पावसात भिजला. त्यामुळं शेतकऱ्यांचं हजारो रुपयांचं नुकसान झाले. पेरणीचे (Sowing) दिवस असल्यानं मोठ्या प्रमाणावर शेतकरी शेतमाल बाजार समितीमध्ये आणत आहेत. मात्र, बाजार समितीकडून शेतमाल ठेवण्यासाठी कोणत्याही प्रकारची व्यवस्था करण्यात आली नाही, असा आरोप शेतकऱ्यांनी केलाय.

15 ते 20 मिनिटं मुसळधार

15 ते 20 मिनिटं मुसळधार पाऊस झाला. यामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. यापूर्वी आलेल्या पावसात धान्य भिजलं. आज पुन्हा पाऊस गेल्यानं शेतमालाचं नुकसान झाल्याचं एका शेतकऱ्यानं सांगितलं. बऱ्याच शेतकऱ्यांचं या पावसात नुकसान झालंय. राजकारण्यांनी निवडणुकीत व्यस्त राहण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडं लक्ष द्यावं. शेतकऱ्यांचं कष्ट शेतकऱ्यांनाच माहिती आहेत, अशी टीका एका शेतकऱ्यानं केली.

पाहा व्हिडीओ

हे सुद्धा वाचा

हजारो क्विंटल शेतमाल भिजला

अमरावतीत आलेल्या धुव्वादार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत विकायला आणलेला हजारो क्विंटल शेतमाल पावसाने भिजला. मुसळधार पावसामुळे शेतमाल पाण्याने वाहत गेला. पेरणीचे दिवस असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणावर आणतात शेतमाल. बाजार समितीकडून उपाय योजना होत नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. पावसामुळं शेतकरी कामाला लागला आहे. शेतमाल विकून दोन पैसे हातात येतील. शेतातली कामं सुरू करता येतील, अशी शेतकऱ्यांना आस होती. त्यासाठी त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल आणून ठेवला. पण, त्याठिकाणी शेतमाल ठेवण्याची व्यवस्था नव्हती. त्यामुळं शेतमाल भिजला. यात नुकसान शेतकऱ्यांचंच झालं.

शिरजगावात वाहू लागले रस्त्यावरून पाणी

अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा येथे ढगफुटी सदृश्य पाऊस पडला. गावातील रस्त्यांवरुन पाणी वाहून गेले. रस्त्यालगतच्या अनेक घरांत पाणी घुसले. पाण्यातून दुचाकी वाहत चालविताना नागरिकांची चांगलीच दमछाक झाली. अचानक आलेल्या पावसाने मोठे नुकसान झाले. अमरावती जिल्ह्यात पावसाची दमदार एंट्री झाली.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.