Amravati water | अमरावतीत पारा भडकला, पाण्यासाठी शिंगणापुरात पायपीट, संत्राबाग टिकवणे कठीण

सद्या उन्हाळा सुरू झाल्याने विदर्भातील तापमानाचा पारा 43 अंशापार गेलाय. परिणामी विदर्भातील अनेक विहिरी कोरड्या पडल्यात. त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईला समोर जावं लागत आहे. अमरावती जिल्ह्यातील शिंगणापूर येथे पाणीटंचाई असल्याने नागरिकांना 2 किमी पायपीट करून तहान भागवावी लागते आहे.

Amravati water | अमरावतीत पारा भडकला, पाण्यासाठी शिंगणापुरात पायपीट, संत्राबाग टिकवणे कठीण
पाण्यासाठी अशाप्रकारे पायपीट करावी लागत आहे. Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Apr 14, 2022 | 12:39 PM

अमरावती : शिंगणापूर हे गाव 5 हजार लोकसंख्या असलेलं गाव आहे. या गावाला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून (Maharashtra Jeevan Pradhikaran) पाणी पुरवठा केला जातो. मात्र सद्या पाणीपुरवठा अनियमित होत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते आहे. गावाबाहेर 2 किमी अंतरावरील मजीप्रच्या कार्यालयातून पाणी आणून तहान भागवावी लागते आहे. शिंगणापूर (Shinganapur) गावाला लागून शहानूर प्रकल्प असल्याने या प्रकल्पातून गावाला पाणी पुरवठा केला जावा, अशी गावकऱ्यांची मागणी आहे. गावकऱ्यांना पिण्याचं पाणी मिळालं नाही तर जण आंदोलन ( Andolan) करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. सद्या उन्हाळा सुरू झाल्याने विदर्भातील तापमानाचा पारा 43 अंशापार गेलाय. परिणामी विदर्भातील अनेक विहिरी कोरड्या पडल्यात. त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईला समोर जावं लागत आहे. अमरावती जिल्ह्यातील शिंगणापूर येथे पाणीटंचाई असल्याने नागरिकांना 2 किमी पायपीट करून तहान भागवावी लागते आहे.

संत्राबागांना फटका बसणार

यंदाचा उन्हाळा सर्वाधिक हॉट राहणार असल्याची शक्यता हवामान खात्याने यापूर्वीच वर्तविली आहे. त्यामुळे आधीच संकटात असलेला पश्चिम विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकरी सापडला आहे. संत्राची काही भागात आंबियाची गळ होत आहे. त्यामुळे पश्चिम विदर्भातील 88 हजार 848 हेक्टरमधील संत्रा बागांमध्ये व्यवस्थापन नाही. उन्हाच्या दाहकतेमुळे किमान 100 कोटींचा फटका संत्रा उत्पादकांना बसण्याची शक्यता आहे. सध्या दिवसाचे तापमान 42 अंशांवर गेले आहे. अद्याप मे व जून शिल्लक आहे.

लहान फळांची गळ

उष्ण तापमानामुळे संत्रा, मोसंबी, लिंबू फळबागांमध्ये कोवळी नवती करपणे, आंबिया बहराच्या लहान फळांची गळ, खोड तडकणे, झाडे निस्तेज दिसणे, नवीन कलमांमध्ये मर, कोवळ्या रोपांचे शेंडे वाळणे, पाने गळणे, आदी दुष्परिणाम दिसू लागले आहेत. तर या उन्हापासून संत्रा झाडावर टिकवणे कठीण झाले आहे. संत्रा गळ मोठ्या प्रमाणावर होत आहे, अशी माहिती संत्रा उत्पादक सुधीर वानखडे यांनी दिली.

Babasaheb Ambedkar | बाबासाहेब आंबेडकरांच्या वस्तूंचे संग्रहालय अर्धवट! नागपुरातील संग्रहालय रखडल्याचे कारण काय?

Photo : Babasaheb Ambedkar Jayanti | नागपुरातील चिचोलीत बाबासाहेबांच्या वस्तूंचा संग्रह; ऐतिहासिक वस्तूंवर रासायनिक प्रक्रिया

Nagpur Education | मनपाच्या 6 इंग्रजी शाळा कार्यरत, मनपा आयुक्तांची शाळांना भेट; विद्यार्थ्यांशी साधला संवाद

Non Stop LIVE Update
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.