AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खबरदार, माझ्या अंगावर कोणी आलं तर सोडणार नाही, अमृता फडणवीस कडाडल्या

अमृता फडणवीस यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधलाय, त्यावेळी त्या बोलत होत्या. या ग्रुपला मी देवेंद्र फडणवीसांकडे घेऊन आले आहे. ईशा फाऊंडेशनने त्यांना घेतलं म्हणून आम्ही घेतलं. तेव्हा जयदीप राणाचा पंटरचा काही रेकॉर्ड नव्हता. त्यानंतर आपण लोकांचं प्रबोधन केलं पाहिजे, असं मनात आलं.

खबरदार, माझ्या अंगावर कोणी आलं तर सोडणार नाही, अमृता फडणवीस कडाडल्या
अमृता फडणवीस
| Edited By: Vaibhav Desai | Updated on: Nov 01, 2021 | 7:58 PM
Share

मुंबईः देवेंद्र फडणवीस आणि मी आम्हा दोघांच्या दोन आयडेंटिटी आहेत. मी गायिका आणि सामाजिक कार्यकर्ती आहे. माझ्या अंगावर कोणी आलं तर मी त्याला सोडणार नाही. मी खऱ्याची साथ सोडत नाही आणि असत्याला साथ देणाऱ्यालाही सोडत नाही, असं म्हणत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय.

तेव्हा जयदीप राणाचा पंटरचा काही रेकॉर्ड नव्हता

अमृता फडणवीस यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधलाय, त्यावेळी त्या बोलत होत्या. या ग्रुपला मी देवेंद्र फडणवीसांकडे घेऊन आले आहे. ईशा फाऊंडेशनने त्यांना घेतलं म्हणून आम्ही घेतलं. तेव्हा जयदीप राणाचा पंटरचा काही रेकॉर्ड नव्हता. त्यानंतर आपण लोकांचं प्रबोधन केलं पाहिजे, असं मनात आलं. आम्ही सदगुरू जग्गी वासूदेव यांच्याशी जोडलो गेलो. त्यांच्या ईशा फाऊंडेशनसाठी एक नदी वाचवण्याबाबतचं गाणं तयार केलं गेलं, असंही त्यांनी सांगितलं.

मनात आलं असतं तर शाहरुख आणि सलमानलाही घेतलं असतं

या गाण्यात बॉलिवूडचे अनेक कलाकार सहभागी झाले. मीही झाले. देवेंद्र फडणवीसही झाले. त्यानंतर रिव्हर मार्चनेही आमच्यासाठी एक गाणं बनवा, असं त्यांना सांगितलं. सचिन गुप्तांनी त्याला होकार दिला. त्यानंतर सचिन गुप्ताने दिग्दर्शनासाठी मदत केली. तर रिव्हर मार्चने गाणं तयार केलं. फुकटात गाणं तयार केलं. त्या गाण्यात कोळी समाज आणि डब्बेवाले आले. ते एक पैसा न घेता आले. मनात आलं असतं तर शाहरुख आणि सलमानलाही घेतलं असतं, असंही अमृता फडणवीस म्हणाल्यात.

बिगडे नवाबला हे सवाल तुम्हाला विचारावे लागतील

आम्ही जागृती केली आणि आज आम्हालाच लाथ मारली जाते. आम्हाला कोणतीही राजकीय अभिलाषा नाही. त्यांच्या मागे हात धुवून लागलात हे कोणतं राजकारण आहे. तुम्हाला राजकारण करायचं आणि बिगडे नवाब व्हायचं आहे तर तुम्ही बिगडे नवाबची एनर्जी सुधरे नवाबमध्ये कन्व्हर्ट करा. तरच महाराष्ट्र पुढे जाऊ शकतो. बिगडे नवाबला हे सवाल तुम्हाला विचारावे लागतील . त्यांच्या बॉसला किंवा त्यांच्या सूपर बॉसला, असं म्हणत अमृता फडणवीसांनी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांवर नाव न घेता हल्लाबोल केलाय. संबंधित बातम्या

नवाब मलिक यांचे डोके ठिकाणावर आहे का ते तपासण्याची गरज; प्रवीण दरेकर यांची हल्लाबोल

Deglur By Election : देगलूरला नवा आमदार मिळणार का? यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये काय घडलं?

amruta fadnavis criticism on nawab malik

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...