AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंजली दमानिया, जरांगे आणि धनंजय देशमुख पहिल्यांदाच एकत्र भेटले, अर्धा तास खलबतं; त्यानंतर थेट मोठी मागणी

मोठी बातमी समोर येत आहे, आज पहिल्यांदाच मनोज जरांगे पाटील, धनंजय देशमुख आणि अंजली दमानिया हे तिघं एकत्र भेटले, तिघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली.

अंजली दमानिया, जरांगे आणि धनंजय देशमुख पहिल्यांदाच एकत्र भेटले, अर्धा तास खलबतं; त्यानंतर थेट मोठी मागणी
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 03, 2025 | 8:48 PM
Share

बीड जिल्ह्याच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली. हे प्रकरण सध्या राज्यभर गाजत असून, वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणात सुरुवातीपासून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान आज अंजली दमानिया या जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली, यावेळी तिथे संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख देखील उपस्थित होते. तिघेही एकत्र भेटण्याची ही पहिलीच वेळ आहे, तिघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली. आपण मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी अंतरवाली सराटीमध्ये आल्याचं दमानिया यांनी यावेळी म्हटलं.

नेमकं काय म्हणाल्या दमानिया?  

गेल्या दोन महिन्यांमध्ये जालन्याचे शेतकरी मला दोनदा येऊन भेटून गेले होते. त्यांना मी अश्वासन दिलं होतं की मी तिथे येते. काय सत्य परिस्थिती आहे त्याची पाहाणी करते. आणि तुमच्याकडून माहिती घेते, कारण मुंबईपर्यंत सर्वांनाच पोहोचता येत नाही. म्हणून मी इथे येण्याचं ठरवलं होतं आणि जालन्यात आले म्हणून मी दादांची देखील भेट घेतली, त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली, असं अंजली दमानिया यांनी यावेळी म्हटलं आहे.

जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया 

संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात सुरुवातीपासूनच मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आरोपीला पकडण्याच्या मागणीसाठी जे आक्रोश मोर्चे निघाले त्या प्रत्येक मोर्चाला मनोज जरांगे पाटील उपस्थित होते. दरम्यान आजच्या या भेटीनंतर प्रतिक्रिया देताना त्यांनी मोठी मागणी केली आहे. संतोष देशमुख प्रकरणात माजी मंत्री धनंजय मुंडे यांना मुख्य आरोपी करा अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. धनंजय मुंडे यांना मुख्य आरोपी करायल हवे. कारण तेच कर्तेकर्वीते आहेत, असा आरोप यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

Follow Us
लोकल लेट, रस्ते जाम! मुसळधार पावसाने मुंबईकरांची सकाळ केली बेहाल
Railway Updates | लोकल लेट, रस्ते जाम! मुसळधार पावसाने मुंबईकरांची सकाळ केली बेहाल
मॉन्सूनची धडाकेबाज एंट्री! पहिल्याच पावसात मुंबईची दाणादाण
Mumbai Rains | मॉन्सूनची धडाकेबाज एंट्री! पहिल्याच पावसात मुंबईची दाणादाण, पुढील 3 तास ऑरेंज अलर्टचा इशारा
मोठी बातमी! रायगडचे नवे पालकमंत्री कोण? बंद दाराआड चर्चा होताच…
मोठी बातमी! रायगडचे नवे पालकमंत्री कोण? बंद दाराआड चर्चा होताच…
राणा जगजीतसिंह पाटलांचा मैत्रीचा प्रस्ताव, ओमराजेंचं थेट विधान; म्हणाल
राणा जगजीतसिंह पाटलांचा मैत्रीचा प्रस्ताव, ओमराजेंचं थेट विधान; म्हणाले मला त्यांचे...
2029 मध्ये सर्व खासदारांना... अखेर शिंदेंची संपूर्ण मास्टर प्लॅन
DCM Eknath Shinde | 2029 मध्ये सर्व खासदारांना... अखेर शिंदेंची संपूर्ण मास्टर प्लॅन सांगितलाच
मुंबईकरांनो पुढील 24 तास महत्त्वाचे! दादरसह मुंबईच्या उपनगरीय भागात
मुंबईकरांनो पुढील 24 तास महत्त्वाचे! दादरसह मुंबईच्या उपनगरीय भागात पावसाच्या सरीवर सरी; पहा व्हिडीओ...
कल्याणमध्ये भयंकर घडलं, झाडाच्या फांदीने केला घात, पाऊस येताच...
कल्याणमध्ये भयंकर घडलं, झाडाच्या फांदीने केला घात, पाऊस येताच...
प्राजक्त तनपुरे, अरुण लखानी, अनिकेत तटकरेंसह 6 आमदारांचा शपथविधी सोहळा
प्राजक्त तनपुरे, अरुण लखानी, अनिकेत तटकरेंसह 6 आमदारांचा शपथविधी सोहळा संपन्न
मी उद्धव ठाकरेंबद्दल बोललो, बाळासाहेबांबद्दल नाही; पावसकरांचा खुलासा
Kiran Pawaskar | मी उद्धव ठाकरेंबद्दल बोललो, बाळासाहेबांबद्दल नाही; पावसकरांचा खुलासा, म्हणाले...
विधानभवनाबाबत चकित करणारी माहिती! थेट प्रसाधनगृहाबाहेर ठेवलाय शिपाई; अ
विधानभवनाबाबत चकित करणारी माहिती! थेट प्रसाधनगृहाबाहेर ठेवलाय शिपाई; अधिकाऱ्यांनाही...