AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एपीएमसी सचिव सतीश सोनींच्या कारला अपघात; जीवितहानी टळली

या अपघातात सचिव सतीश सोनी यांच्यासह कार चालक सुदैवाने थोडक्यात बचावले. मात्र कारच्या दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

एपीएमसी सचिव सतीश सोनींच्या कारला अपघात; जीवितहानी टळली
| Edited By: | Updated on: Jul 28, 2021 | 5:16 PM
Share

नवी मुंबई : पणन संचालक आणि मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केटच्या सचिवपदाचा अतिरिक्त पदभार सांभाळणारे सचिव सतीश सोनी यांच्या कारला सोमवारी रात्रीच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात सचिव सतीश सोनी यांच्यासह कार चालक सुदैवाने थोडक्यात बचावले. मात्र कारच्या दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

लोणावळ्यानजीक सदर कारला अपघात

सोमवारी मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्गावर लोणावळ्यानजीक सदरचा अपघात झाला. सध्या पणन संचालक आणि बाजार समिती सचिव या दोन्ही जबाबदाऱ्या सतीश सोनी यांना पार पाडव्या लागत आहेत. शासकीय कामकाजानिमित्त पुणे ते नवी मुंबई अशी त्यांची ये-जा सुरू असते.

पुढच्या कारनं अर्जंट ब्रेक मारल्यानं अपघात

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ते पुणे येथील काम आटोपून ते एमएच-43 एएन- 4100 या शासकीय कारने नवी मुंबईकडे येत होते. रात्रीच्या सुमारास त्यांची कार मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्गावर लोणावळ्यानजीक आली असता, सचिव सतीश सोनी यांच्या कारच्या पुढे असलेल्या एका वाहनचालकाने अर्जंट ब्रेक मारला.

सोनी यांच्या कारची धडक सदर वाहनाला बसली

यावेळी सचिव सोनी यांच्या कारची धडक सदर वाहनाला बसली. सचिव सोनी यांच्या कारवरील चालकाने तात्काळ प्रसंगावधान राखून कारचा वेग कमी केल्यामुळे या अपघातात कारमध्ये असलेले सचिव सतीश सोनी यांच्यासह कारचालक या अपघातातून सुखरूप बचावले. मात्र कारच्या पुढील भागाचे नुकसान झाले.

संबंधित बातम्या

शिपिंग क्षेत्रातील आर्थिक फसवणूक थांबवा, सिफेरर्सकडून ठोस उपाययोजना करण्यासाठी राज्यपालांना निवेदन

राज्यात ओढवलेल्या पूरपरिस्थितीग्रस्तांना नवी मुंबई महापालिकेमार्फत 1 कोटी रुपये द्या, मंदा म्हात्रेंची मागणी

APMC secretary Satish Soni car accident; Fortunately, no casualties were reported

BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.