प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया उद्योग योजनेसाठी 25 ऑक्टोबरपर्यंत मागवले अर्ज; 10 लाखांपर्यंत असे मिळवा अनुदान

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेसाठी 25 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी केले आहे. या योजनेत वैयक्तिक सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना बँक कर्जाशी निगडीत पात्र प्रकल्प किमतीच्या 35 टक्क्यांपर्यंत आणि जास्तीत जास्त 10 लाख रुपयांपर्यंत प्रती प्रकल्प अनुदान देण्यात येणार आहे.

प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया उद्योग योजनेसाठी 25 ऑक्टोबरपर्यंत मागवले अर्ज; 10 लाखांपर्यंत असे मिळवा अनुदान
संग्रहित छायाचित्र.


नाशिकः प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेसाठी 25 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी केले आहे. या योजनेत वैयक्तिक सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना बँक कर्जाशी निगडीत पात्र प्रकल्प किमतीच्या 35 टक्क्यांपर्यंत आणि जास्तीत जास्त 10 लाख रुपयांपर्यंत प्रती प्रकल्प अनुदान देण्यात येणार आहे.

केंद्र सरकार आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग या योजनेंतर्गत इच्छुक आणि पात्र लाभार्थ्यांनी वैयक्तिक सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग, इन्क्युबेशन सेंटर, पायाभूत सुविधा, ब्रॅडिंग, विपणन, क्षमता बांधणी, संशोधन यासाठी प्रशिक्षण संस्थाबाबत विहित पद्धतीने सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. सदर केंद्र पुरस्कृत योजना 2020-21 ते 2024-25 या पाच वर्षाच्या कालावधीत राबविण्याचे नियोजन करण्यात आले असून, इच्छुक अर्जदारांनी कृषी विभागाच्या Link of PMFME website: http://pmfme.mofpi.gov.in Link of MIS Application: http://pmfme.mofpi.gov.in/mis/#/Login या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावयाचा आहे. तसेच या योजनेसाठी (Resource Person) संसाधन व्यक्तीची नेमणूक करण्यासाठी देखील पात्र अर्जदारांनी 25 ऑक्टोंबर 2021 पर्यंत आपले अर्ज विहित पध्दतीने नाशिक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय येथे संध्याकाळी 5.30 पर्यंत सादर करावे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

एक जिल्हा, एक उत्पादन

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग या योजनेंतर्गत नाशिक जिल्ह्यासाठी एक जिल्हा एक उत्पादन या घटकांमध्ये कांदा या पिकाची निवड करण्यात आली आहे. या योजनेत असंघटित अन्न प्रक्रिया उद्योगातील कार्यरत वैयक्तिक सूक्ष्म उद्योगांच्या स्पर्धा क्षमतेत वाढ करणे, शेतकरी उत्पादक संस्था स्वयंसहाय्यता गट व उत्पादक सहकारी संस्थाच्या उत्पादनासाठी सर्वकष मूल्यसाखळी विकसित करण्यात येणार आहे. सध्या कार्यरत असलेले सूक्ष्म अन्न प्रक्रिया प्रकल्प, शेतकरी उत्पादक संस्था, स्वयंसहायता गट व अन्न प्रक्रिया उद्योगाशी निगडीत प्रकल्पासाठी असंघटित क्षेत्रातील अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी ही योजना राबविण्यात येणार आहे. यामध्ये वैयक्तिक सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना बँक कर्जाशी निगडीत पात्र प्रकल्प किमतीच्या 35 टक्क्यांपर्यंत व जास्तीत जास्त 10 लाख रुपये या मर्यादेत प्रती प्रकल्पासाठी अनुदान देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी दिली आहे.

इतर बातम्याः

6 कांदा व्यापाऱ्यांवर 13 ठिकाणी आयकरचे छापे; पिंपळगाव बसवंत येथील कारवाईने खळबळ, कांद्याचे भाव 2500 रुपयांच्या खाली

राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे नाशिकमध्ये आयोजन; शनिवारपासून रंगणार सामने

बहुचर्चित कांदे-निकाळजे वादाची चौकशी पूर्ण; पोलीस आयुक्त काय निर्णय घेणार याकडे लक्ष

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI