AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोलिसांना गुंगारा देत अर्णव गोस्वामींपर्यंत पोहोचवण्यात आला मोबाईल फोन?

गेल्या काही दिवसांत अर्णव गोस्वामी यांना भेटण्यासाठी त्यांचे वकील आणि घरचे लोक सातत्याने येत आहेत. | Arnab goswami

पोलिसांना गुंगारा देत अर्णव गोस्वामींपर्यंत पोहोचवण्यात आला मोबाईल फोन?
| Updated on: Nov 08, 2020 | 11:00 AM
Share

रायगड: अलिबागच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये पोलीस सुरक्षेला गुंगारा देत एका व्यक्तीने अर्णव गोस्वामी (Arnab Goswami) यांच्यापर्यंत मोबाईल पोहोचवल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या मोबाईलवरुन अर्णव गोस्वामी यांनी एक फोन केल्याचेही समजते. सध्या पोलिसांकडून या सगळ्याची अंतर्गत चौकशी सुरु आहे. मात्र, भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी अर्णव गोस्वामी यांना तळोजा कारागृहात हलवण्यात आल्याचे सांगितले जाते. (Arnab goswami got mobile phone in Alibaug quarantine centre)

गेल्या काही दिवसांत अर्णव गोस्वामी यांना भेटण्यासाठी त्यांचे वकील आणि घरचे लोक सातत्याने येत आहेत. यावेळी अर्णव यांच्यापर्यंत मोबाईल फोन पोहोचवण्यात आल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. परिणामी अर्णव गोस्वामी यांच्या सुरक्षाव्यवस्थेत त्रुटी असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी न्यायालयाकडून रितसर परवानगी घेऊन अर्णव गोस्वामी यांना तळोजा कारागृहात हलवण्यात आल्याचे सांगितले जाते.

काही वेळापूर्वीच पोलीस अर्णव गोस्वामी यांना घेऊन तळोजा कारागृहाच्या दिशेने रवाना झाले. कारागृह विभागाच्या पोलीस महानिरीक्षांकडून यासंदर्भातील आदेश काढण्यात आले होते. खारघर येथील तळोजा कारागृहात क्वारंटाईन सेंटरची सुविधा आहे. याठिकाणी अर्णव गोस्वामी यांना ठेवण्यात येईल. हा परिसर तुरुंग प्रशासनाच्या देखरेखीखाली असल्याने याठिकाणी बाहेरील कोणतीही व्यक्ती अर्णव गोस्वामी यांच्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे आता अर्णव गोस्वामी यांच्या अडचणीत आणखीनच भर पडली आहे.

अलिबागवरून तळोजाच्या दिशेने रवाना होत असताना अर्णव गोस्वामी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. माझा जीव धोक्यात आहे. मला माझ्या वकिलांशी बोलून दिले जात नाही. मला आज सकाळी सहा वाजता उठवण्यात आले. पोलिसांनी मला धक्काबुक्की केली. त्यामुळे माझ्या जीवाला धोका असल्याचे अर्णव गोस्वामी यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. संबंंधित बातम्या:

अर्णव गोस्वामींना हायकोर्टाकडून तूर्तास दिलासा नाहीच, आजची रात्र शाळेत, उद्या पुन्हा सुनावणी

Arnab Goswami| हरिश साळवे म्हणाले, अर्णवला जामीन दिल्यास आभाळ कोसळेल का? कोर्टात काय काय घडलं?

‘वृत्तपत्र स्वातंत्र्याचे गटार राजकारण्यांनीच केले!’ अर्णव गोस्वामींच्या अटकेनंतर लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरुन होणाऱ्या टीकेला राऊतांचं ‘रोखठोक’ उत्तर

अर्णव गोस्वामींसोबत अटकेत असलेले फिरोज शेख तीन दिवसांपासून एकाच कपड्यांवर?, मानवी हक्काचे उल्लंघन; वकिलाचा आरोप

(Arnab goswami got mobile phone in Alibaug quarantine centre)

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.