काकांनी निवृत्त होण्याची वेळ, गृहमंत्र्यांना पुतणे आशिष देशमुखांचा ‘घरचा’ आहेर

अनिल देशमुख निवृत्त होण्याची वेळ आली आहे, असं सांगत आशिष देशमुखांनी आपण लढण्याचा इरादा व्यक्त केला (Ashish Deshmukh Anil Deshmukh)

काकांनी निवृत्त होण्याची वेळ, गृहमंत्र्यांना पुतणे आशिष देशमुखांचा 'घरचा' आहेर
Follow us
| Updated on: Feb 03, 2021 | 11:49 AM

नागपूर :गृहमंत्री अनिल देशमुख काका’ (Anil Deshmukh) काटोल मतदारसंघातून गायब झाले आहेत, असं म्हणत पुतणे आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी घरचा आहेर दिला. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अनिल देशमुख आणि काँग्रेस नेते आशिष देशमुख या राजकीय क्षेत्रातील काका-पुतण्यामधली ‘तू तू मै मै’ पुन्हा उघड्यावर येण्याची चिन्हं आहेत. अनिल देशमुख निवृत्त होण्याची वेळ आली आहे, असं सांगत आशिष देशमुखांनी आपण लढण्याचा इरादा व्यक्त केला. (Ashish Deshmukh taunts Anil Deshmukh says later missing from Katol)

“काटोलची जनता अनिल देशमुखांवर नाराज”

“अनिल देशमुख हे नागपुरातील काटोल या आपल्याच मतदारसंघातून गायब आहेत. त्यांच्यावर काटोलची जनता नाराज आहे. गेल्या सव्वा वर्षात कोणतीही कामं झालेली नाहीत, त्यामुळे मी सक्रिय व्हावं, अशी जनता आणि कार्यकर्त्यांची मागणी होती” असं आशिष देशमुख ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना म्हणाले. पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचं नुकसान टाळण्यासाठी परवानगी घेऊन मंदिर, शाळेत क्लासेस घेणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

अनिल देशमुख औरंगाबादमध्ये कोणाकोणासोबत दिसतात

काटोलमध्ये विधानसभा मतदारसंघात पुन्हा सक्रिय झाल्याचं सांगत आशिष देशमुखांनी पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेतही दिले आहेत. “राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सर्वच मतदारसंघात फिरतात, काँग्रेसच्या असो, किंवा शिवसेनेच्याही. पक्षवाढीसाठी सर्वांनाच वाव आहे. आगामी काळात काँग्रेस सत्तेत येणार, असा विश्वासही आशिष देशमुखांनी बोलून दाखवला. अनिल देशमुख औरंगाबादमध्ये कोणाकोणासोबत दिसतात, असा टोलाही त्यांनी लगावला.

कोण आहेत आशिष देशमुख?

आशिष देशमुख हे नागपुरातील काटोल विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर आमदार होते. 2019 च्या विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर त्यांनी भाजपला रामराम ठोकत काँग्रेसचा हात हाती धरला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात त्यांनी नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवली. परंतु त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. सध्या ते काँग्रेसमध्येच आहेत. (Ashish Deshmukh taunts Anil Deshmukh says later missing from Katol)

काकांना हरवून 2014 मध्ये विजयी

2014 च्या विधानसभा निवडणुकीत आशिष देशमुख भाजपच्या तिकिटावर काटोल मतदारसंघातून विजयी झाले होते. राष्ट्रवादीचे उमेदवार असलेले काका अनिल देशमुख यांना पराभूत करत त्यांनी विजय मिळवला होता. परंतु वेगळ्या विदर्भाची मागणी करत आशिष देशमुखांनी 2018 मध्ये आमदारकी आणि भाजपचा राजीनामा दिला आणि काँग्रेसमध्ये घरवापसी केली.

रणजीत देशमुख यांचे पुत्र

आशिष देशमुख हे महाराष्ट्र काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी कॅबिनेट मंत्री रणजीत देशमुख यांचे पुत्र आहेत. रणजीत देशमुख यांनी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या कॅबिनेटमध्ये कृषी मंत्रिपद सांभाळले आहे.

संबंधित बातम्या:

पश्चिम बंगालचा गड सर करण्यासाठी काँग्रेसचा मराठमोळा शिलेदार, डॉ. अमोल देशमुख प्रभारीपदी

वीजबिल माफीवरुन काँग्रेसने ठाकरे सरकारला शॅाक द्यावा; आशिष देशमुखांचा घरचा आहेर

(Ashish Deshmukh taunts Anil Deshmukh says later missing from Katol)

Non Stop LIVE Update
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.