AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कट्टर विरोधकांची आता घट्ट मैत्री, तब्बल 20 वर्षांनंतर चव्हाण-चिखलीकर एकाच फ्रेममध्ये

अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्याने खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यासोबतचा राजकीय वाद संपुष्टात आल्याने तब्बल 20 वर्षांनंतर चव्हाण आणि चिखलीकर एकाच फ्रेममध्ये दिसले.

कट्टर विरोधकांची आता घट्ट मैत्री, तब्बल 20 वर्षांनंतर चव्हाण-चिखलीकर एकाच फ्रेममध्ये
| Updated on: Feb 24, 2024 | 8:24 PM
Share

रमेश चेंडके, Tv9 प्रतिनिधी, नांदेड | 24 फेब्रुवारी 2024 : काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण भाजपात गेल्यानंतर त्यांना राज्यसभेची उमेदवारी मिळाली आहे. यानंतर अशोक चव्हाण यांनी आज नांदेड येथे भाजपचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर आणि आमदारांना चहाचे निमंत्रण दिले होते. अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्याने खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यासोबतचा राजकीय वाद संपुष्टात आल्याने तब्बल 20 वर्षांनंतर चव्हाण आणि चिखलीकर एकाच फ्रेममध्ये दिसले. यानंतर अशोक चव्हाण यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सविस्तर खुलासा केला. “मी आणि अजित गोपछडे आम्ही दोघांची राज्यसभेवर निवड झाल्यानंतर आणि मी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर आणि भाजपामधील माजी खासदार, आमदार, माजी आमदार यांना चहाचं निमंत्रण दिलं होतं. आमच्यात समन्वय राहावा आणि आता आमच्यात कोणताही वाद-विवाद नाही. जी आधी होती ती पक्षीय भूमिका होती. येणारी लोकसभा निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. त्या दृष्टिकोनात आज चर्चा झाली. पंतप्रधान मोदींचा 28 तारखेला आगमन होणार आहे त्यावरही चर्चा झाली”, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली.

‘मी कुठलीही निवडणूक आव्हान म्हणून पाहतो’

तुम्ही आता भाजपात गेलात. काँग्रेसचा उमेदवार तुम्हाला आव्हान देईल का? असा प्रश्न अशोक चव्हाण यांना यावेळी विचारण्यात आला. त्यावर त्यांनी भूमिका मांडली. “मी कुठलीही निवडणूक आव्हान म्हणून पाहतो, कुठली निवडणूक मी सोपी म्हणून समजत नाही. आम्ही निवडणुकीची जोरदार तयार करू. भाजपाचा उमेदवार निवडून येईल हा आमचा प्रयत्न राहणार आहे”, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली.

‘मी म्हणत होतो अशोकराव भाजपात येतील ती गोष्ट खरी झाली’

यावेळी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनीदेखील प्रतिक्रिया दिली. “मला जे वाटत होतं की, अशोकराव चव्हाण भारतीय जनता पार्टीत येतील, ते भारतीय जनता पार्टीत आले आणि ती गोष्ट खरी झाली. आजची बैठक अशोकराव चव्हाण यांनी बोलावली होती. सर्वांमध्ये समन्वय असावा, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. ते पक्षात आल्यामुळे आता काही वादाचा विषय राहिला नाही. त्यामुळे सर्वांनी समन्वयाने काम करावे”, असं आवाहन त्यांनी केलं.

खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना पुढचा नांदेड लोकसभेचा भाजप उमेदवार कोण असेल? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर “लोकसभेचा उमेदवार पक्ष पक्षश्रेष्ठी ठरवेल आणि पक्ष जो उमेदवार देईल तो 100 टक्के निवडून येईल”, अशी प्रतिक्रिया चिखलीकर यांनी दिली. चिखलीकर हे नांदेड लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे विद्यमान खासदार आहेत. मात्र आगामी उमेदवार कोण? याबाबत पक्ष निर्णय घेईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिल्यामुळे खासदार चिखलीकर यांना स्वतःच्या उमेदवारीची शाश्वती नाही? अशी चर्चा आता नांदेडमध्ये सुरु आहे.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.