AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashok Kharat : भोंदू अशोक खरात प्रकरणाच्या तपासाला नवं वळण, ‘तो’ ज्वेलरही पोलिसांच्या रडारवर

महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या भोंदू अशोक खरातच्या अडचणी वाढत आहेत. एसआयटी तपासामुळे प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, नरबळी, मंत्र तंत्र आणि फसवणुकीच्या संशयाने आयुर्वेदिक दुकान मालक व ज्वेलरची चौकशी होणार आहे. पुरातन मंदिर पाडण्याचा प्रयत्न आणि शिवनिका संस्थेचे बँक खाते सील झाल्याने त्याच्या आर्थिक मायाचाही पर्दाफाश होत आहे.

Ashok Kharat : भोंदू अशोक खरात प्रकरणाच्या तपासाला नवं वळण, 'तो' ज्वेलरही पोलिसांच्या रडारवर
अशोकर खरात
| Updated on: Mar 26, 2026 | 10:14 AM
Share

महिलांवर लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली तुरूंगात असलेला भोंदू अशोक खरातच्या अडचणी वाढत चालल्या असून आता याप्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. खरातला 29 मार्चपर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली असून एसआयटीकडून तपास सुरू आहे. दरम्यान खरात प्रकरणातील तपासात नवं वळण आलंय. याप्रकरणी बड्या आयुर्वेदिक औषधे व जडीबुटी दुकानाच्या मालकाची चौकशी होणार आहे. अशोक खरातने मंत्र तंत्र केल्याचा, नरबळी दिल्याचा संशय असून यादृष्टीने तपास सुरू आहे.

नाशिकमधील बड्या आयुर्वेदिक औषधे व जडीबुटी दुकानातूनच खरात याने हरिणाची कस्तुरी व जडीबुटी खरेदी केल्याचा संशय आहे. त्यामुळे पोलिस या दुकान मालकाची चौकशी होणार आहे. तसेच नाशिकरोड परिसरातील एक ज्वेलरही पोलिसांच्या रडारवर असून संबंधित ज्वेलर्सकडून खरातने बनावट रत्नांची खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. अंधश्रद्धा व फसवणूक प्रकरणातील पुरावे जोडण्याचा पोलिसांचा प्रयत्न असून आर्थिक व्यवहार आणि धार्मिक विधींचा संबंध तपासात उलगडण्याची शक्यता आहे.

खरातचा आणखी एक कारनामा समोर

दरम्यान भोंदू अशोक खरातचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. वावी येथील पुरातन ऐतिहासिक वैजेश्वर मंदिर पाडण्याचा घाट त्याने घातला होता अशी माहिती समोर येत्ये. मंदिराची शक्ती संपल्याचा दावा त्याने केला होता, तसेच हगे मंदिर पाडण्याचा सल्ला त्याने गावकऱ्यांना दिला होता, असं उघड झालं आहे. त्याच्या गिरगाव येथील मंदिराकडे भावी वळवण्यासाठी वावी येथील वैजेश्वर मंदिर पाडण्याचा सल्ला दिल्याचं समजतं. मात्र गावकऱ्यांनी मंदिर पाडण्या नकार दिला होता.

शिवनिका संस्थांचे बँक अकाऊंट सील

अटकेत असलेला खरात याला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. कारण खरात याच्या शिवनिका संस्थांचे बँक अकाऊंट सील करण्यात आलं आहे. या संस्थेच्या आर्थिक व्यवहारांचा तपास सुरू असून विशेष तपास पथकाकडून मालमत्तेची माहिती मागवण्यात आली आहे. कुटुंबीयांच्या नावावर असलेली जमीन, घर, दुकानांची चौकशी केली जात असून नोंदणी विभागाकडून राज्यभरातील मालमत्तेचा शोध सुरू आहे. यामुळे खरातची कोट्यवधी रुपयांची आर्थिक माया उघड होण्याची शक्यता आहे. मालमत्ता खरेदीसाठी खरातकडे पैसा कुठून आला, याचाही तपास सुरू आहे. पुढील 2–3 दिवसांत तपासाला वेग येणार आहे

Follow Us
अजित पवार अपघात प्रकरण, कॅप्टनची बदली का झाली?, फडणवीसांनी सांगितलं...
अजित पवार अपघात प्रकरण, कॅप्टनची बदली का झाली?, फडणवीसांनी सांगितलं....
मुख्यमंत्री फडणवीस यांचे अशोक खरातबाबत कठोर वक्तव्य
मुख्यमंत्री फडणवीस यांचे अशोक खरातबाबत कठोर वक्तव्य.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं निवडणूक आयोगाला पत्र
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं निवडणूक आयोगाला पत्र.
चंद्रकांत पाटील यांचे अशोक खरातसोबत जवळचे संबंध?
चंद्रकांत पाटील यांचे अशोक खरातसोबत जवळचे संबंध?.
अशोक खरातबाबत आणखी एक मोठा खुलासा, ईशान्येश्वर मंदिरासाठी दीड कोटीचा..
अशोक खरातबाबत आणखी एक मोठा खुलासा, ईशान्येश्वर मंदिरासाठी दीड कोटीचा...
महाराष्ट्रात पेट्रोल टंचाई, भंडाऱ्यात लांबच लांब रांगा
महाराष्ट्रात पेट्रोल टंचाई, भंडाऱ्यात लांबच लांब रांगा.
रुपाली चाकणकर यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी
रुपाली चाकणकर यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी.
अशोक खरात प्रकरणावर माजी मंत्री केसरकरांची प्रतिक्रिया
अशोक खरात प्रकरणावर माजी मंत्री केसरकरांची प्रतिक्रिया.
खरात प्रकरणी रुपाली चाकणकर आणि दीपक केसरकर यांची पोलिसांकडून चौकशी?
खरात प्रकरणी रुपाली चाकणकर आणि दीपक केसरकर यांची पोलिसांकडून चौकशी?.
अजितदादांची ताकद... रोहित पवार यांच्या संशयाने खळबळ
अजितदादांची ताकद... रोहित पवार यांच्या संशयाने खळबळ.