AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

100 बँक खाती, 60 कोटींचे व्यवहार अन् शिर्डीतील पतसंस्था… भोंदूबाबा अशोक खरातप्रकरणी मोठी अपडेट समोर

भोंदू बाबा अशोक खरातच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. शिर्डी पोलिसांनी समता पतसंस्थेतील खरातशी संबंधित १०० संशयास्पद बँक खाती गोठवली असून २०२१ पासून ६० कोटींचे व्यवहार झाल्याचे तपासात उघड झाले आहे.

100 बँक खाती, 60 कोटींचे व्यवहार अन् शिर्डीतील पतसंस्था... भोंदूबाबा अशोक खरातप्रकरणी मोठी अपडेट समोर
Ashok Kharat
| Updated on: Apr 03, 2026 | 10:41 AM
Share

अध्यात्म आणि समाजसेवेचा बुरखा पांघरून महिलांचे शोषण करणाऱ्या भोंदू बाबा अशोक खरातच्या पापाचा घडा आता भरु लागला आहे. अशोक खरातच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहेत. त्यातच आता शिर्डी पोलिसांनी केलेल्या सखोल तपासात समता नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये खरातचे मोठे आर्थिक हितसंबंध असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या प्रकरणाचा तपास करत असताना खरातशी संबंधित तब्बल १०० संशयास्पद बँक खाती गोठवली आहेत. तसेच २०२१ पासून या खात्यांमधून सुमारे ६० कोटी रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाल्याचे उघड झाले आहे.

नेमकं प्रकरण काय?

महिला शोषणाच्या तक्रारीनंतर अटकेत असलेल्या अशोक खरातच्या आर्थिक व्यवहारांची पोलिसांनी झाडाझडती सुरू केली. या तपासादरम्यान पोलिसांना राहाता येथील समता पतसंस्थेच्या शाखेत अशोक खरातशी संबंधित १०० बँक खाती आढळून आली आहेत. या खात्यांचे वैशिष्ट्य म्हणजे या सर्व खात्यांवर नॉमिनी म्हणून एकाच व्यक्तीचे नाव लावण्यात आले आहे. ही बाब बँकिंग नियमांच्या विरोधात आहे. काळ्या पैशाची विल्हेवाट लावण्यासाठी या खात्यांचा वापर झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पतसंस्थेत नियमबाह्यपणे १०० खाती उघडण्यासाठी कोणाची मदत

पतसंस्था फेडरेशनचे राज्य अध्यक्ष आणि समता पतसंस्थेचे सर्वेसर्वा काका कोयटे यांचे अशोक खरातशी संबंध होते. तीन वर्षांपूर्वी म्हणजेच २०२१ ला नाशिकमध्ये पार पडलेल्या राज्यस्तरीय पतसंस्था पुरस्कार सोहळ्यात भोंदू बाबा अशोक खरातला प्रमुख पाहुणा म्हणून सन्मानित करण्यात आले होते. या सोहळ्याला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

अशोक खरातसारख्या प्रवृत्तीला समाजातील सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तींकडून मिळणारी प्रतिष्ठा, हेच त्याच्या गुन्हेगारी वाढीचे मुख्य कारण असल्याचा आरोप आता सामान्यांकडून होत आहे. अशोक खरातला पतसंस्थेत नियमबाह्यपणे १०० खाती उघडण्यास कोणी मदत केली, याची चर्चा आता सुरू झाली आहे.

आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरु

शिर्डी पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तातडीने पावले उचलली आहेत. अशोक खरात आणि त्याच्या निकटवर्तीयांच्या नावावर असलेली १०० खाती गोठवण्यात आली आहेत. त्यासोबतच २०२१ पासून आतापर्यंत या खात्यांमध्ये जी ६० कोटींची आवक-जावक झाली आहे. हा पैसा भक्तांकडून घेतलेल्या देणग्यांचा आहे की आणखी कशाचा, याचा तपास सुरू आहे. त्यासोबतच समता पतसंस्थेच्या व्यवस्थापनाने केवायसी (KYC) नियमांचे उल्लंघन कसे केले, याचीही चौकशी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केली जाण्याची शक्यता आहे.

प्रशासकीय आणि राजकीय पडसाद

या प्रकरणामुळे राहाता आणि शिर्डी परिसरातील गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. समता पतसंस्थेच्या राज्यभरात अनेक शाखा असल्याने, खरातचे जाळे इतरत्रही पसरले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्या राहाता शाखेत हे व्यवहार झाले, त्या कार्यालयाबाहेर सध्या पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. तसेच याप्रकरणी तपासाची चक्रे अधिक वेगाने फिरू लागली आहेत.

Follow Us
अभिजीत दीपके राजीनाम्याची मागणी करत असताना मंत्री दादा भुसेंचं विधान
अभिजीत दीपके राजीनाम्याची मागणी करत असताना शिक्षण मंत्री दादा भुसेंचं मोठं विधान, म्हणाले...
मोठी बातमी! शिवसेनेतील जिल्हाप्रमुखांवर हल्ला... मंत्री सामंतांच्या
मोठी बातमी! शिवसेनेतील जिल्हाप्रमुखांवर हल्ला... मंत्री सामंतांच्या दौऱ्याआधीच मोठा राडा!
मोठी बातमी! शिवसेनेतील महिला नेत्याला मोठं गिफ्ट; थेट या पदावर...
मोठी बातमी! शिवसेनेतील महिला नेत्याला मोठं गिफ्ट; थेट या पदावर नियुक्ती
ठाकरेंना अखेर कळलं, या रेड्याने तोंड उघडले तर... बड्या नेत्याचं विधान
ठाकरेंना अखेर कळलं... या रेड्याने तोंड उघडले तर... बड्या नेत्याचं विधान तुफान चर्चेत
पार्थ पवार आणि शरद पवार यांच्या भेटीवर सुप्रिया सुळेंचे मोठे विधान,
पार्थ पवार आणि शरद पवार यांच्या भेटीवर सुप्रिया सुळेंचे मोठे विधान, म्हणाल्या...
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान,
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे वक्तव्य, काय म्हणाल्या?
मविआ म्हणून सत्ता स्थापन करू; हा माझाच प्रस्ताव- पृथ्वीराज चव्हाण
Prithviraj Chavan | 'मविआ म्हणून सत्ता स्थापन करू; हा माझाच प्रस्ताव...चव्हाणांच्या विधानाची सर्वत्र चर्चा
CJP कार्यकर्त्यांना ग्रामस्थांकडून मारहाण; अभिजीत दिपकेंचं मोठं विधान
CJP कार्यकर्त्यांना ग्रामस्थांकडून मारहाण; अभिजीत दिपके यांचं सर्वात मोठं विधान
CJP जखमी विद्यार्थ्यासाठी राहुल गांधींचा पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या...
CJP च्या जखमी विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधींचा संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या; जोपर्यंत...
राहुल गांधींच्या कार्यक्रमात गर्दी करण्यासाठी 25 हजार...
एकच खळबळ! राहुल गांधींच्या कार्यक्रमात गर्दी करण्यासाठी 25 हजार... व्हायरल ऑडियो क्लिपमध्ये नेमकं काय?