AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईची कमान महिलेच्या हाती, अश्विनी भिडे पहिल्या महिला आयुक्त; आदेश जारी

मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भीडे यांची नियुक्ती झाली आहे. त्यांच्याकडे मुंबई महापालिका आयुक्तपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

मुंबईची कमान महिलेच्या हाती, अश्विनी भिडे पहिल्या महिला आयुक्त; आदेश जारी
अश्विनी भीडेImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Mar 31, 2026 | 3:01 PM
Share

मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) आयुक्तपदी मेट्रो वुमेन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अश्विनी भिडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाने बुधवारी याबाबत अधिकृत घोषणा केली. सध्याचे मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी हे ३१ मार्च २०२६ रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या निवृत्तीनंतर मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी कोणाची नियुक्ती होणार याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती.

भेटीगाठींचा परिणाम?

मुंबई महापालिका आयुक्तपदासाठी संजय मुखर्जी, असीम गुप्ता, मिलिंद म्हैसकर, विकास खारगे, मनीषा वर्मा, व्ही राधा या अधिकाऱ्यांची नावे चर्चेत होती. हे अधिकारी अश्विनी भिडे यांच्यापेक्षा वरिष्ठही आहेत. मात्र, वरिष्ठता डावलून अश्विनी भिडे यांच्याकडे महापालिका आयुक्तपद देण्यात आलं आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे. अश्विनी भिडे या 1995 च्या तुकडीतील अधिकारी आहेत. यामुळे 1990 ते 1994 मधील जवळपास 10-12 अधिकारी डावलले गेले असल्याचं बोललं जात आहे. कालच अश्विनी भिडे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज भिडे यांच्याकडे मुंबईचं महापालिका आयुक्तपद देण्यात आलं आहे.

अश्विनी भिडे या १९९५ बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRCL) च्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून मेट्रो लाइन ३ च्या प्रकल्पात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. तसेच मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदावरही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आता मुंबई महापालिकेची सर्वोच्च जबाबदारी त्यांच्या हाती आली आहे. अश्विनी भिडे मुंबई महापालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त ठरल्या आहेत.

अश्विनी भिडे कोण आहेत?

-१९९५ बॅचच्या IAS अधिकारी

-मुंबई मेट्रो प्रकल्पात ‘मेट्रो वुमेन’ म्हणून प्रसिद्ध

-मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून काम केलेले

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीय अधिकारी म्हणून ओळख

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातील अधिकारी म्हणून अश्विनी भिडे यांची विशेष ओळख आहे. मेट्रो प्रकल्पातील त्यांच्या कामगिरीमुळे त्यांना ‘मेट्रो वुमेन’ असे संबोधले जाते.

पूर्वीच्या आयुक्तांची यादी

इक्बाल चहल यांच्या बदलीनंतर भूषण गगराणी यांची मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती झाली होती. भूषण गगराणी यांच्यानंतर आता अश्विनी भिडे यांच्याकडे मुंबई महानगरपालिकेची धुरा सोपवण्यात आली आहे.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...