सुषमा अंधारे यांनी एकाचवेळी वाघ, चाकणकर, गोऱ्हे यांना अंगावर घेतलं, केली सडकून टीका

अकोला येथील अत्याचारित मुलीच्या घरी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भेट दिली. यावेळी त्याच्यासोबत आमदार नितीन देशमुख होते. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत अंधारे यांनी चित्रा वाघ, डॉ. नीलम गोऱ्हे आणि रुपाली चाकणकर यांच्यावर टीका केली.

सुषमा अंधारे यांनी एकाचवेळी वाघ, चाकणकर, गोऱ्हे यांना अंगावर घेतलं, केली सडकून टीका
SUSHMA ANDHAREImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Nov 21, 2023 | 12:05 AM

अकोला | 20 नोव्हेंबर 2023 : अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री फडणवीस होते. पण, एक महिन्यापूर्वी विखे पाटिल पालकमंत्री झाले. अकोल्यातील पैलपाडा येथील मुलीवर अत्याचार झाला. दुसऱ्या एका मुलीवर बलात्कार करून जिवंत मारण्यातं आलं. एक अंध महिलेवर तिच्याचं अंध पतीसमोर बलात्कार केला गेला. अकोल्याच्या एका शाळेत चार मुलीवर त्यांचेचं शिक्षक बलात्कार करतं होतं आणि ह्या सर्व घटनेच्या वेळेस अकोल्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस होते. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस तुमची प्रशासनाची पकड कमी होतं आहे का? असा सवाल ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला. हिवाळी अधिवेशनातं ठाकरे गट अकोला अत्याचार प्रकरण उचलणार असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

अकोला येथील अत्याचारित मुलीच्या घरी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भेट दिली. यावेळी त्याच्यासोबत आमदार नितीन देशमुख होते. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत अंधारे यांनी चित्रा वाघ, डॉ. नीलम गोऱ्हे आणि रुपाली चाकणकर यांच्यावर टीका केली. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार पिडीत मुलीला भेट आणि आर्थिक मदत देण्यासाठी अकोल्यात आले आले असे त्यांनी यावेळी सांगितलं.

मुलीनी आत्मनिर्भर व्हा असं सरकार म्हणत. ती 14 वर्षाची मुलगी, ती अंध महिला काय आत्मनिर्भर व्हा म्हणता? टोल फ्रि नंबर दिला. 7 वी, 5 वी आणि 9 वीच्या मुलींकडे मोबईल असतो का? किंवा फोन केला तर त्यावर अॅक्शन होते का? आता जी घटना घडली त्यांच्या परिवाराची चर्चा मी इथे करणार नाही. पण, पिडीत मुलीच्या वडिलांची पोलिसांनी तक्रार लिहून घेतली नाही. गणूभाई नामकं व्यक्तीचा गांज्याचा व्यवसाय आहे. गृहमंत्री ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेतं त्याचं जिल्ह्यातं गांज्याचा व्यवसाय होतोयं अशी जळजळीत टीका त्यांनी केली.

हे सुद्धा वाचा

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी सांगाव की 7 वर्षाची मुलगी आत्मनिर्भर होईल? तिला टोल फ्री नंबर लावता येतो का? घटना घडल्यानंतर तुम्ही पंचनामा करता. पण, त्या अगोदर तुम्ही पोलिस तक्रार घेत नाहीत. बीडमध्ये भाजपा आमदाराचे परिवारातील लोकं पारधी समाजातील महिलेवर अत्याचार करतात आणि हे सगळे गप्प बसतात? असा थेट सवाल अंधारे यांनी केला.

निलम गोऱ्हे यांना आपली खुर्ची वाचवयची आहे. त्यामुळे त्यांनी नैतिकता गहाण ठेवली आहे, अशी टीका करून त्या पुढे म्हणाल्या, भाजपच्या तिसऱ्या चौथ्या फळीतील आक्रस्थळ बायांनी संजय राठोड प्रकरणातं पुढे काय केलं हे माहित आहे. नांदेडच्या घटनेत सर्व मृत्यु प्रसुतीच्या वेळेसच्या नव्हत्या हे त्यांना माहित नाही का? अकोल्यातील घटनेत मुलीचा आणि नराधमाचा संबंध नसताना भाजपची आक्रस्थळीबाई संबंध जोडत आहेत अशा शब्दात त्यांनी चित्रा वाघ यांच्यावर टीका केली.

आक्रस्थळी बायका ट्रकवर आमदारासोबतं झालेल्या घटनेला ती घटना घडलीच नाही असं म्हणतात आणि राहूल गांधी यांची जी घटना घडलीचं नाही त्यावर बोलतात. आक्रस्थळी बायका अभ्यासं करत नाहीत हीचं समस्या आहे असा टोलाही त्यांनी लगावला. मी त्या उध्दव ठाकरे यांच्या पक्षातील आहे ज्यांनी स्वतःचे मंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेतला आणि ही आक्रस्थळी बाई त्या पक्षातील आहे ज्यांनी त्याचं संजय राठोडला मंत्रीपद दिलं. प्रादेशिक पक्षाच्या अध्यक्षांनी गृहमंत्र्यांना प्रश्न विचारला पाहिजे होता. पण, ते नाही विचारतं, असा खरमरीत टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

Non Stop LIVE Update
असला बुके कधी पाहिलाय? अजितदादांना १,३६९ गुलाबांच्या फुलांचा गुच्छ खास
असला बुके कधी पाहिलाय? अजितदादांना १,३६९ गुलाबांच्या फुलांचा गुच्छ खास.
२०२४ ला भाजपपासून भारताला मुक्ती मिळणार, संजय राऊत यांची जहरी टीका काय
२०२४ ला भाजपपासून भारताला मुक्ती मिळणार, संजय राऊत यांची जहरी टीका काय.
जरांगेंच्या दौऱ्याचा चौथा टप्पा, सभेची जय्यत तयारी, अवघं जालना भगवंमय
जरांगेंच्या दौऱ्याचा चौथा टप्पा, सभेची जय्यत तयारी, अवघं जालना भगवंमय.
गुणरत्न सदावर्तेंना सर्वात मोठा झटका, ST कर्मचारी बँकेतील 17 संचालक...
गुणरत्न सदावर्तेंना सर्वात मोठा झटका, ST कर्मचारी बँकेतील 17 संचालक....
५ राज्यांचा एक्झिट पोल, कुठं कुणाची सत्ता येणार? बघा tv9 मराठीवर
५ राज्यांचा एक्झिट पोल, कुठं कुणाची सत्ता येणार? बघा tv9 मराठीवर.
अस्मानी संकट पण सुलतान कुठे? शिंदेंच्या प्रचार दौऱ्यावरून कुणाची टीका?
अस्मानी संकट पण सुलतान कुठे? शिंदेंच्या प्रचार दौऱ्यावरून कुणाची टीका?.
मोदींसोबत जवळीक वाढवण्यासाठी शिंदेंचा खटाटोप, उबाठा नेत्याचा टोला काय?
मोदींसोबत जवळीक वाढवण्यासाठी शिंदेंचा खटाटोप, उबाठा नेत्याचा टोला काय?.
मनोज जरांगे पाटील लहान, त्यांनी अभ्यास करावा; कुणी दिला खोचक सल्ला
मनोज जरांगे पाटील लहान, त्यांनी अभ्यास करावा; कुणी दिला खोचक सल्ला.
... अन् छगन भुजबळ यांच्यासमोरच शेतकरी महिलेला अश्रू अनावर
... अन् छगन भुजबळ यांच्यासमोरच शेतकरी महिलेला अश्रू अनावर.
तेव्हा NCP चा CM का झाला नाही? अजितदादा तुम्हीच सांगा; तटकरेंचं साकडं
तेव्हा NCP चा CM का झाला नाही? अजितदादा तुम्हीच सांगा; तटकरेंचं साकडं.