AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबाद मोहटादेवी भाजी मंडई तोडफोडप्रकरणी भाजप शहराध्यक्षासह 25 जणांवर गुन्हे

मोहटादेवी भाजी मंडई तोडफोड आणि जाळपोळ प्रकरणी भाजप शहराध्यक्षासह 25 जणांवर वळूज पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

औरंगाबाद मोहटादेवी भाजी मंडई तोडफोडप्रकरणी भाजप शहराध्यक्षासह 25 जणांवर गुन्हे
औरंगाबाद मंडई तोडफोड
| Updated on: Feb 11, 2021 | 9:38 AM
Share

औरंगाबादमोहटादेवी भाजी मंडई तोडफोड आणि जाळपोळ प्रकरणी भाजप शहराध्यक्षासह 25 जणांवर वळूज पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. भाजप शहराध्यक्ष संजय केनेकर यांच्यासह 25 जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. (Aurangabad Mohtadevi vegetable market vandalism case Police File against 25 people including BJP city president)

जमावबंदी आदेशाचे उल्लंघन, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी संजय केनेकर यांच्यासह 25 जणांविरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. भाजी मंडई हटवण्यावरून शहरातील वाळूज परिसरात मंगळवारी मध्यरात्री हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला होता.

शहरात बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास भाजप कार्यकर्त्यांनी वाळूज परिसरात जमून मोठा गदारोळ केला होता. मध्यरात्री अचानकपणे झालेल्या या गोंधळामुळे येथे काही काळासाठी तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

प्रशासनाच्या निर्णयाला भाजपचा विरोध

वाळूजमधील मोहटादेवी परिसरात 25 वर्षे जुनी भाजी मंडई आहे. ती हटवण्याचा औरंगाबाद प्रशासनाचा प्रयत्न आहे. प्रशासनाच्या या भूमिकेला स्थानिक भाजप नेत्यांचा विरोध आहे. याच विरोधातून मंगळवारी मध्यरात्री वाळूज परिसरात भापज कार्यकर्त्यांचा मोठा जमाव जमला. या जमावाने रात्रीच्या सुमारास रस्त्यावर टायर पेटवले. तसेच पोलिसांनी लावलेल्या बॅरिकेटचीही भाजप कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्याचं पाहायला मिळाले.

यापूर्वी विद्यापीठ रस्त्यावरुन दोन गटांत राडा

दरम्यान, औरंगाबाद शहराला दोन गटांतील तसेच, राजकीय वाद नवे नाहीत. यापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरातील रस्त्यावरुनही 27 जानेवारी रोजी वाद झाला होता. विद्यापीठ परिसरातील रस्त्यावरून (27 जानेवारी) काही तरुण आणि इम्तियाज जलील यांच्या समर्थकांमध्ये बाचाबाची झाली होती. यावेळी औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी तरुणांना दमबाजी केल्याचा आरोप काही तरुणांनी केला होता. तर दुसरीकडे तरुणांनाकडून इम्तियाज जलील यांना शिवीगाळ झाल्याचे जलील समर्थकांनी म्हटलं होतं. रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे तरुण आणि इम्तियाज जलील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्यानंतर त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

(Aurangabad Mohtadevi vegetable market vandalism case Police File against 25 people including BJP city president)

हे ही वाचा :

औरंगाबादेत मध्यरात्री हाय व्होल्टेज ड्रामा, भाजप कार्यकर्त्यांची रस्त्यावर जमून घोषणाबाजी

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.