महावितरणकडून निर्लज्जपणे शेतकऱ्यांची लूट, फसवणूक करणं थांबवावं अन्यथा रस्त्यावर उतरु, प्रशांत बंब यांचं खरमरीत पत्र

गंगापूरचे भाजप आमदार प्रशांत बंब (Prashant Bamb) यांनी महावितरण (Mahadiscom) कंपनीला एक खरमरीत पत्र लिहिले आहे.

महावितरणकडून निर्लज्जपणे शेतकऱ्यांची लूट, फसवणूक करणं थांबवावं अन्यथा रस्त्यावर उतरु, प्रशांत बंब यांचं खरमरीत पत्र
प्रशांत बंब
Follow us
| Updated on: Dec 09, 2021 | 8:04 AM

औरंगाबाद: जिल्ह्यातील गंगापूरचे भाजप आमदार प्रशांत बंब (Prashant Bamb) यांनी महावितरण (Mahadiscom) कंपनीला एक खरमरीत पत्र लिहिले आहे. महावितरण कंपनी सध्या शेतकऱ्यांना वीज पुरवठा करणारे (Farmers) विद्युत रोहित्र खंडित करत आहे.शेतकरी वीजबिल भरत नसल्यामुळे विद्युत रोहित्र खंडित करण्यात येतात. त्यामुळे औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान होते. त्यामुळेच प्रशांत बंब यादी महावितरणला हे खरमरीत पत्र लिहिलेले हे पत्र लिहीत असताना प्रशांत बंब यांनी महावितरण कंपनीकडे अनेक मुद्दे सुद्धा नोंदवले आहेत.

18 तास वीज पुरवठ्याचा करार

महावितरण कंपनीला महाराष्ट्र शासन हे दरवर्षी शेकडो कोटी रुपयांचं अनुदान देत त्या बदल्यात महावितरण कंपनीने शेतकऱ्यांना तब्बल अठरा तास वीजपुरवठा करणे बंधनकारक आहे. मात्र, हा नियम पाळला जात नाही दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांनी बिल भरले नाही म्हणून विद्युत रोहित्र बंद बंद केले जातात. हा प्रकार फसवणूकीचा असल्याचा आरोप प्रशांत बंब यांनी केलेला आहे. या अनुषंगाने महावितरण कंपनी वरती फसवणुकीचा गुन्हा का दाखल करण्यात येऊ नये असा सुद्धा सवाल आमदार प्रशांत बंब यांनी उपस्थित केला आहे.

प्रशांत बंब न्यायालयीन लढा उभारणार

प्रशांत बंब यांनी महावितरण कंपनीकडे राज्य सरकार सोबत झालेले सगळे करार त्याचबरोबर न्यायालय मधून आलेले अनेक आदेश आणि वेळोवेळी संघटना तसेच झालेल्या चर्चांचे सर्व पत्र कागदपत्रे आणि अहवाल देण्याची मागणी सुद्धा केलेली आहे. हे अहवाल आल्यानंतर आमदार प्रशांत बंब न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी रस्त्यावरचा लढा सुद्धा उभारण्याची शक्यता आहे.

रस्त्यावरच्या लढाईचे संकेत

आमदार प्रशांत बंब औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करतात या मतदारसंघात सर्वात मोठी संख्या ही शेतकऱ्यांची आहे. गंगापूर मतदार संघाच्या शेजारून गंगा गोदावरी नदी गेली आहे. त्यामुळे बहुतांशी परिसर हा सिंचनाखाली येणारा परिसर आहे आणि सिंचनासाठी रब्बीच्या हंगामात विजेची मोठी गरज पडते. मात्र, या संघांमध्ये विद्युत रोहित्र बंद करणे या शेतकऱ्यांची वीज कनेक्शन कट करणे, अशा स्वरूपाच्या कारवाई महावितरणकडून सुरू आहेत. त्यामुळे वैतागलेल्या शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा सुद्धा घेतलेला आहे. तत्पूर्वी कायदेशीर बाब म्हणून आमदार प्रशांत बंब यांनी महावितरणला हे पत्र पाठवले. या पत्रानंतर महावितरणने जर का समाधानकारक भूमिका नाही घेतली तर कदाचित गंगापूर तालुक्यात शेतकऱ्यांचा उद्रेक पाहायला मिळू शकतो.

इतर बातम्या:

संदिपान भुमरेंच्या भावाची कार्यकर्त्याला मारहाण; रस्त्याची तक्रार केल्याचा राग, आठ जणांविरोधात गुन्हा दाखल

Aurangabad: विद्यापीठातल्या शिवाजी पुतळ्याच्या पायाभरणीत रायगडाची माती अन् चवदार तळ्याचे पाणी!

Aurangabad Gangapur MLA Prashant Bamb wrote letter to Mahdiscom over famers connection cut

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.