AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad | ‘गरीबांचं नंतर पाहू, आधी आमदारांना घर देऊ’, कन्नडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा

कन्नडचे शिवसेना आमदार उदयसिंग राजपूत यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने शहरात बॅनरबाजी केली आहे. मला मुंबईत घर द्या हो... अशी व्याकुळ मागणी आमदारांची असून त्यांच्यासाठी भिक मागो आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.

Aurangabad | 'गरीबांचं नंतर पाहू, आधी आमदारांना घर देऊ', कन्नडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा
कन्नड शहरात राष्ट्रवादीकडून बॅनरबाजीImage Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Mar 26, 2022 | 10:59 AM
Share

औरंगाबादः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नुकतीच आमदारांना घरे बांधून देण्याची घोषणा केल्याने राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. महाविकास आघाडीच्या या निर्णयाविरोधात कन्नडमधील राष्ट्रवादी काँग्रेसनेच आंदोलनाचा इशारा दिला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या (National congress Party) कार्यकर्त्यांनी बॅनर लावले आहेत. कन्नडच्या आमदारांना मुंबईत घर देण्यासाठी भीक मागो आंदोलन (Agitation) करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. गरीबांना घरकुल मिळो अथवा न मिळो, पण आमदारांना घर मिळण्यासाठी भीकही मागायची तयारी आहे, असा उपहासात्मक अर्थाचा मजकूर या बॅनरवर लिहिलेला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाविरोधात सोमवारी आंदोलन करणार असल्याचा इशाराही राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे.

शिवसेना आमदाराविरोधात आंदोलन

कन्नडचे शिवसेना आमदार उदयसिंग राजपूत यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने शहरात बॅनरबाजी केली आहे. मला मुंबईत घर द्या हो… अशी व्याकुळ मागणी आमदारांची असून त्यांच्यासाठी भिक मागो आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे. येत्या सोमवारी आमदारांची मागणी पूर्ण करण्यासाठी अधिकारी, गुत्तेदार व तालुक्यातील अवैध धंदेवाले यांच्याकडे आंदोलन करणार असल्याचा इशारा या बॅनरवर देण्यात आला आहे. कन्नड शहरातील प्रमुख चौकात तसेच प्रमुख रस्त्यांवर हे बॅनर लावण्यात आले आहे.

आमदारांच्या घरावरून ठाकरे सरकार चौफेर टीका

राज्यातील सर्वपक्षीय आमदारांना म्हाडाची 300 घरे देण्याची घोषणा गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी विधानसभेत केली. त्याचे पडसाद सोशल मीडियावर उमटत आहेत. कोट्यवधींची मालमत्ता असणाऱ्या आणि लाखोंचा पगार असलेल्या आमदारांना घर कशासाठी, असा सवाल सर्वसामान्यांकडून विचारला जात आहे. दरम्यान, आमदारांना ही घरे मोफत देण्यात येमार नसून कम किंमतीत दिली जातील, आमदारांकडून घराची किंमत वसूल केली जाईल नंतरच घराचा ताबा दिला जाईल, अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली. मात्र आमदारांच्या घरांवरून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही आमदारांनी याचे स्वागत केले तर काहींनी आम्हाला घर देण्यापेक्षा शेतकऱ्यांना मोफत वीज द्या, असं म्हटलं आहे.

इतर बातम्या-

वाहनचालकांनो, चुका कराल तर insuranceचा छदामही मिळणार नाही, वाचा काय करावं आणि काय करू नये

Akola | वंचितवर आरोप करणाऱ्या संतोष बांगरांना प्रत्युत्तर, Rajendra Patode म्हणतात, एक हजार कोटींचे आरोप बालीशपणाचे

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.