Video : औरंगाबादच्या लसीकरण केंद्रावर तुफान गर्दी, सकाळी 7 पासून नागरिकांच्या रांगा

औरंगाबाद येथील लसीकरण केंद्रांवर आज सकाळी नागरिकांची तुफान गर्दी पाहायला मिळाली. नागरिकांनी सकाळी 7 वाजेपासून लसीकरण केंद्रावर हजेरी लावली होती. Aurangabad kranti Chowk Vaccination Centre Crowd

Video : औरंगाबादच्या लसीकरण केंद्रावर तुफान गर्दी, सकाळी 7 पासून नागरिकांच्या रांगा
लसीच्या तुटवड्यामुळे औरंगाबादेतील अनेक लसीकरण केंद्र बंद

औरंगाबाद : औरंगाबाद येथील लसीकरण केंद्रांवर आज सकाळी नागरिकांची तुफान गर्दी पाहायला मिळाली. नागरिकांनी सकाळी 7 वाजेपासून लसीकरण केंद्रावर हजेरी लावली होती. यावेळी केंद्रावर सोशल डिस्टन्सिंगचे नियम पायदळी तुडविले गेले. (Aurangabad kranti Chowk Vaccination Centre Crowd)

औरंगाबाद शहरात लसींचा साठा समाप्त झालाय. तेव्हा प्रत्येकी केंद्रांवर 200 जणांना लस दिली जाणार आहे. सलग दोन दिवसांपासून औरंगाबाद शहरात लसींचा पुरवठा खंडित झालेला आहे. लसींचा पुरवठा खंडित झाल्याने अनेक जण लस घेण्यापासून वंचित राहत आहे, तसंच लसीकरणाला देखील ब्रेक लागत आहे.

औरंगाबाद येथील क्रांती चौक लसीकरण केंद्रांवर सकाळपासून नागरिकांची झुंबड पाहायला मिळतेय. मर्यादित टोकन असल्याने काहींना रिकाम्या हाताने परतावे लागतंय. सकाळी लवकर केंद्रावर जाऊनही लस संपल्याने बऱ्याच नागरिकांचा हिरमोड होतोय.

(Aurangabad kranti Chowk Vaccination Centre Crowd)

हे ही वाचा :

BMC च्या चतुर्थश्रेणी कामगारांची हेराफेरी, पत्नीच्या नावे कंपनी उघडून पालिकेकडून कोट्यवधींची कंत्राटं

“राणेंची क्षमता गृह, संरक्षण, अर्थ खाते सांभाळण्याची, कराडांना मंत्रिपद म्हणजे पंकजा मुंडेंना खतम करण्याचा डाव”

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI