Aurangabad | ‘संभाजीनगर’ची घाई झालेल्या गूगलविरोधात तक्रार करणार, औरंगाबादेत नामांतरविरोधी संघर्ष समिती आक्रमक, पुढचे पाऊल काय?

गूगलने कोणत्या अधिकारातून हे  बदल केलाय, असा सवाल खा. जलील यांनी ट्विटरद्वारे केला आहे. 

Aurangabad | 'संभाजीनगर'ची घाई झालेल्या गूगलविरोधात तक्रार करणार, औरंगाबादेत नामांतरविरोधी संघर्ष समिती आक्रमक, पुढचे पाऊल काय?
Follow us
| Updated on: Jul 21, 2022 | 1:05 PM

औरंगाबादः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) सरकारने औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर (sambhajinagar) करण्याचा निर्णय घेतलाआहे. मात्र अद्याप केंद्र सरकारकडून या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आलेली नाही. राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात औरंगाबादेत नामांतर विरोधी संघर्ष समिती आक्रमक झाली आहे. नामांतराची ही लढाई आता कोर्टात लढण्याची समितीची तयारी असतानाच आणखी एक अजब प्रकार समोर आला. गूगल (Google) वेब पोर्टलवर औरंगाबाद शहराचे नाम बदलून संभाजीनगर करण्यात आले आहे. केंद्र सरकारने अद्याप मंजुरी दिलेली नसताना गुगलने परस्पर हे बदल केल्याने नामातंरविरोधी समितीतील सदस्यांचा संताप झाला आहे. दोन दिवसांपासून सोशल मीडियावरही एसटी महामंडळाच्या बसेसवर नामांतराचे फलक फिरत आहेत. औरंगाबादच्या नामांतरावरून राजकीय पक्षही श्रेयवादाचे राजकारण करत आहेत. मात्र नामांतरालाच आक्षेप घेणाऱ्या समितीने आता अधिक आक्रमक होण्याचे ठरवले आहे. गूगलविरोधात कायदेशीर कार्यवाही करण्याचा निर्णय समितीने घेतला आहे.

नामांतरविरोधी केंद्रीय संघर्ष समितीची स्थापना

औरंगाबाद शहराचे नामांतर करण्याच्या निर्णयाविरोधात केंद्रीय संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीची कार्यकारिणी घोषित झाली आहे. समितीच्या अध्यक्षपदी खालेद अहमद, उपाध्यक्ष सय्यद रफिक अहमद, उपाध्यक्ष अय्युब खान, सचिव अबुबकर रेहबर, सहसचिव डॉ. सोगेल झकिउद्दीन, कोषाध्यक्ष हसन पटेल यांची निवड करण्यात आली. सदस्यपदी हिशाम उस्मानी, अय्युब जहागीरदार, इलियास किरमाणी, जमीर अहमद कादरी, नईम खान, शेक जलील, अब्दुल मोहिद हशर, शफिक अहमद, आदींची नियुक्ती करण्यात आली आहे.

समितीचे आदेश काय?

औरंगाबादचे नामांतर करण्याविरोधी ही समिती योग्य पाऊले उचलत असून सर्व नामांतर विरोधी नेत्यांनी या समितीत शामिल व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या समितीने 1996 मध्ये न्यायालयीन लढाई लढली होती. अॅड. एम. ए. लतीफ यांनी सर्वोच्च न्यायालयात यासंबंधीची याचिका दाखल केली होती. समितीने सर्वोच्च न्यायालयातून नामांतरावर स्टे ऑर्डर आणली होती. अॅड. कमरुद्दीन व कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात हा खटला चालवला होता. या समितीच्या समन्वयाशिवाय कुणीही न्यायालयात जाऊ नये, अशी विनंती समितीने केली आहे. सध्या तरी गूगलविरोधात कायदेशीर कार्यवाही करण्यासाठी समितीने पुढची पावलं उचलायला सुरुवात केली आहे.

खा. इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया काय?

गूगल पोर्टलवर औरंगाबादचे संभाजीनगर करण्याची खोडसाळ कृती नेमकी कुणी केली आहे, याचा शोध घेतला जाईल, अशी प्रतिक्रिया एमआयएमचे खा. इम्तियाज जलील यांनी दिली आहे. गूगलने कोणत्या अधिकारातून हे  बदल केलाय, असा सवाल खा. जलील यांनी ट्विटरद्वारे केला आहे.

Non Stop LIVE Update
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....