video | निवडणुकीला उभा राहू नको म्हणत बेदम मारहाण, तरुण गंभीर जखमी, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील वाळूज परिसरात टोळक्याने तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. (Aurangabad wadgaon kolhati bitten)

video | निवडणुकीला उभा राहू नको म्हणत बेदम मारहाण, तरुण गंभीर जखमी, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

औरंगाबाद : आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील वाळूज परिसरात टोळक्याने तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत उभं राहू नको म्हणत टोळक्याने या तरुणाला मारहाण केल्याचं सांगण्यात येत आहे. या मारहाणीत अक्षय काळे हा तरुण गंभीर जखमी झाला असून या मारहाणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Aurangabad wadgaon kolhati young man bitten by group of unidentified people)

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

मिळालेल्या माहितीनुसार आगामी काही महिन्यांमध्ये वाळूज एमआयडीसी परिसरातील वडगाव कोल्हाटी येथे ग्रामपंचायतीची निवडणूक होणार आहे. त्यामुळे येथे राजकीय वातावरण चांगलेचं तापलेले आहे. निवडणुकीसाठी गणितं जुळवण्याचा प्रयत्न येथील स्थानिक नेत्यांकडून केला जतोय. याच पार्श्वभूमीवर एका अज्ञात टोळक्यeने अक्षय काळे या तरुणाला निवडणुकीत उभं राहू नको म्हणत बेदम मारहाण केली. या मारहाणीत अक्षय काळे हा गंभीर जखमी झाला आहे. हा प्रकार एका अज्ञाताने मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला असून त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

अक्षय काळेला झालेल्या मारहाणीचा व्हिडीओ :


दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार या मारहाणप्रकरणी 5 जणांवर वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपासास सुरुवात केली असून मारहाण करणाऱ्या आरोपींचा शोध घेतला जात आहे.

इतर बातम्या :

मलाच जीव द्यावा लागेल, असं कथित मंत्री का म्हणाला?; पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण गळ्याचा फास ठरणार?

बायकोच्या हट्टापाई नोकरी सोडली, गाडी लंपास करणाऱ्या आरोपीच्या नवी मुंबई पोलिसांनी मुसक्या आवळल्या

पूजा चव्हाणला नेमकं काय झालं होतं? ती स्ट्रीप रेड का झाली?; कथित मंत्री का घाबरला?

(Aurangabad wadgaon kolhati young man bitten by group of unidentified people)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI