Aurangabad | Heat Wave चा तडाखा जायकवाडी धरणाला! दिवसाला औरंगाबादच्या गरजेपेक्षा दहापट बाष्पीभवन !

मराठवाड्यासह राज्यात पुढील पाच दिवस हवामान असेच उष्ण राहण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. विशेष म्हणजे विदर्भातील काही जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Aurangabad | Heat Wave चा तडाखा जायकवाडी धरणाला! दिवसाला औरंगाबादच्या गरजेपेक्षा दहापट बाष्पीभवन !
उष्णतेच्या लाटेचा तडाखा जायकवाडी धरणालाहीImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 17, 2022 | 4:37 PM

औरंगाबादः राज्यातील उष्णतेच्या लाटेचा (Aurangabad heat wave) तडाखा औरंगाबाद आणि मराठवाड्यालाही बसत आहे. औरंगाबाद शहराचे तापमान (Aurangabad temperature) जवळपास 40 अंशांकडे वाटचाल करत आहे. उष्णतेच्या या लाटेमुळे नागरिकांना चांगलाच त्रास होत असून दुपारच्या वेळी रस्त्यावरही तुरळक वाहने दिसत आहेत. मागील आठ दिवसातच शहराचे तापमान 6 ते 8 अंशांनी वाढलं आहे. तसेच पुढील पाच दिवस हवामान असेच उष्ण राहण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे. दरम्यान, मराठवाड्यासाठी महत्त्वाच्या अशा जायकवाडी धरणावरही (Jayakwadi dam) या वाढलेल्या तापमानाचा परिणाम झालेला दिसून येत आहे. होळीच्या आधीच सूर्याची प्रखरता वाढल्यामुळे जायकवाडीच्या जलाशयातून मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होत आहे. एका अंदाजानुसार, औरंगाबाद शहराला दररोज जेवढे पाणी लागते, त्याच्या दहापटींनी वाफ एका दिवसातच आकाशात जात आहे.

जायकवाडी जलाशयाची स्थिती काय?

जायकवाडी धरणात सध्या 71.63 टक्के पाणीसाठा आहे. उन्हाळी पिकांसाठी सद्या डाव्या कालव्यातून 1800 तर उजव्या कालव्यातून 700 क्युसेक पाणी सोडले जात आहे. तसेच 1.479 दशलक्ष घनमीटर (दलघमी) पाण्याची वाफ एका दिवसात होत असल्याची नोंद लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाकडे करण्यात आली आहे. औरंगाबाद शहराला दररोज 0.15 दलघमी पाणी लागते. हा विचार करता, औरंगाबादला दररोज लागणाऱ्या पाण्याच्या तुलनेत दहापट पाण्याचे बाष्पीभवन दररोज होत आहे.

जलाशयाचे बाष्पीभवन रोखता येते?

धरणाच्या जलाशयातील बाष्पीभवन रोखण्याची ठराविक पद्धत असते. त्यासाठी रसायनांची फवारणी करावी लागते. मात्र जायकवाडी धरणाचे क्षेत्र हे पक्षी अभयारण्य असल्याने त्यावर रसायनांची फवारणी करता येत नसल्याचे कडाचे सहाय्यक अधीक्षक अभियंता जयसिंह हिरे यांनी सांगितले.

पुढील काही दिवसांचा अंदाज काय?

मराठवाड्यासह राज्यात पुढील पाच दिवस हवामान असेच उष्ण राहण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. विशेष म्हणजे विदर्भातील काही जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी आपले आरोग्य सांभाळावे, शरीराचे तापमान संतुलित राहण्यासाठी पाण्याचे जास्त सेवन करावे, असा सल्ला देण्यात येत आहे.

इतर बातम्या-

ICSE, ISC Semester 2 Exams 2022 : आयसीएसईकडून बारावीच्या परीक्षांच्या तारखांमध्ये बदल, नेमकं कारण काय

Beed | दोनदा संधी हुकली, तिसऱ्यांदा जिद्दीलाच पेटला! ऊसतोड कामगार PSI बनण्याचा प्रेरणादायी प्रवास

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.