AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वाह रे पठ्ठ्या! गेम खेळू नको म्हटलं तर इरेलाच पेटला, 13 व्या वर्षीच कंपनी टाकली, 3 गेम लाँच, बीडच्या आर्यनची गगनभरारी

बीडः मुलांच्या डोळ्यांवर, शरीरावर, अभ्यासावर परिणाम होऊ नये म्हणून आई-वडील मुलांना गेम खेळू देत नाहीत. मात्र गेमची मनातून आवड आणि जन्मजात असलेले बिझनेसमनचे गुण यातून बीडच्या अवघ्या 13 वर्षाच्या मुलाने एक नाही दोन नाही तर तीन-तीन गेम लाँच (Video Game Launch) करण्याची किमया करून दाखवली. आर्यन कुटे (Aryan Kute) असे या मुलाचे नाव असून बीडमधील […]

वाह रे पठ्ठ्या! गेम खेळू नको म्हटलं तर इरेलाच पेटला, 13 व्या वर्षीच कंपनी टाकली, 3 गेम लाँच, बीडच्या आर्यनची गगनभरारी
विजयादशमीनिमित्त आर्यन कुटे याने नुकत्याच एका कार्यक्रमात तिसरा व्हिडिओ गेम लाँच केला.
| Edited By: | Updated on: Oct 18, 2021 | 1:57 PM
Share

बीडः मुलांच्या डोळ्यांवर, शरीरावर, अभ्यासावर परिणाम होऊ नये म्हणून आई-वडील मुलांना गेम खेळू देत नाहीत. मात्र गेमची मनातून आवड आणि जन्मजात असलेले बिझनेसमनचे गुण यातून बीडच्या अवघ्या 13 वर्षाच्या मुलाने एक नाही दोन नाही तर तीन-तीन गेम लाँच (Video Game Launch) करण्याची किमया करून दाखवली. आर्यन कुटे (Aryan Kute) असे या मुलाचे नाव असून बीडमधील (Beed) एका कार्यक्रमात आर्यनच्या तिसऱ्या गेमचे विजयादशमीच्या निमित्ताने नुकतेच लाँचिंग झाले.

अडीच वर्षांपूर्वी स्थापन केली स्वतःची कंपनी

अभ्यासावर परिणाम होऊ नये म्हणून बालपणी आई-वडील गेम खेळू देत नव्हते. पण गेमची आवड असल्याने अवघ्या दहाव्या वर्षी बीडच्या तिरुमला उद्योग समूहाचे प्रमुख सुरेश कुटे व अर्चना कुटे यांचा मुलगा आर्यनने गेम तयार करण्याची संकल्पना मांडली अन् पालकांच्याच मदतीने अडीच वर्षांपूर्वी ओएओ इंडिया ही आयटी कंपनी स्थापन केली. कंपनीच्या माध्यमातून सुरुवातीला कृष्णा माखन मस्ती व त्यानंतर इंडियन फूड बाश हे दोन गेम लाँच केले. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर आता ‘राइज ऑफ वॉर’ हा तिसरा गेम तयार करत जगभरात याचे लाँचिंग बीड येथील कार्यक्रमातून करण्यात आले.

आर्यन सध्या सातव्या इयत्तेत

13 वर्षीय आर्यन सध्या सातवीत शिकतो. दहा वर्षांचा असताना शाळा संपली की तो घरी थांबण्यापेक्षा आईबरोबर तिरुमला कंपनीत जात असे. आई सतत कंपनीच्या मीटिंगमध्ये व्यग्र असायची. कंपनीतील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांचे आई ज्या पद्धतीने प्रतिनिधित्व करते ते पाहून स्वत:ची एक कंपनी असावी असे आर्यनला वाटायचे. त्यामुळे गेम तयार करण्याची संकल्पना त्याने पालकांसमोर मांडली व हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी त्याने आई-वडिलांच्या मदतीने पुणे येथे ओएओ इंडिया ही आयटी कंपनी स्थापन केली. या माध्यमातून त्याने सुरुवातीला “कृष्णा माखन मस्ती’ आणि इंडियन फूड बाश हे दोन गेम लाँच केले. याला जगभरातून उदंड प्रतिसाद मिळाला. या यशानंतर त्याने आता “राइज ऑफ वॉर’ हा तिसरा गेम तयार केला. हा गेम सुरुवातीला थायलंडमध्ये लाँच केला. परंतु भारतात याचे लाँचिंग झाले नव्हते. शुक्रवारी बीडमध्ये हा त्याचा तिसरा गेम जगभरात लाँच झाला.

तिसऱ्या गेमच्या स्टोरीत सस्पेन्स

तिसरा गेम तयार करण्यासाठी आर्यनला एक वर्ष लागले. आर्यन म्हणतो, ताणतणाव घालवण्यासाठी या गेमच्या माध्यमातून काही वेळ करमणूक होऊ शकते का? आपला ताण घालवू शकतो का? असा विचार माझ्या मनात आला आणि त्या भूमिकेतून आम्ही आबालवृद्ध खेळू शकतील असे गेम तयार केले. तिसऱ्या गेममधील स्टोरीमध्ये सस्पेन्स आहे. आर्यन सुरेश कुटे हा सध्या त्याच्या ओएओ इंडिया कंपनी मॅनेजिंग डायरेक्टरपदावर आहे.

आर्यनच्या घरात बिझनेसचा वारसा

आर्यनचे आजोबा स्व. ज्ञानोबाराव कुटे यांनी 1950 मध्ये राधा क्लॉथ्स नावाने बिझनेस सुरु केला. त्यानंतर आर्यनचे वडील सुरेश कुटे यांनी कुटे ग्रुपची स्थापना केली आणि त्यानंतर कुटे ग्रुपचा विस्तार अधिक जोमाने होत गेला. ग्रुपच्या विविध कंपन्याही स्थापन झालेल्या आहेत. आर्यनची आई अर्चना कुटे या सध्या कुटे ग्रुपच्या मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. आर्यनच्या संकल्पनेतून गेमची नवी कंपनी स्थापन करण्यात आल्याची माहिती सुरेश कुटे यांनी दिली.

इतर बातम्या-

भारतीय रेल्वेसोबत करा ‘हा’ व्यवसाय, कमी भांडवल गुंतवूनही व्हाल मालामाल

Business Ideas: चार लाखांच्या भांडवलात ‘हा’ व्यवसाय सुरु करा; महिन्याला बक्कळ पैसा कमवा

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.