प्रत्येक जिल्ह्यात बाळासाहेबांचे स्मारक उभारा, औरंगाबादेत नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या सूचना

औरंगाबादः शहरातील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या (Divisional Commissioner’s Office) सभागृहात मराठवाड्यातील 2018 ते 2021 या आर्थिक वर्षातील जिल्हा वार्षिक योजना, नावीन्यपूर्ण योजनांतर्गत कोरोनाचा निधी व खर्च याबाबतची आढावा बैठक झाली. या बैठकीत बोलताना नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांनी नावीन्यपूर्ण योजनेच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यातील उद्यानात दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Kshirsagar) यांचे स्मारक उभारून […]

प्रत्येक जिल्ह्यात बाळासाहेबांचे स्मारक उभारा, औरंगाबादेत नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या सूचना
बाळासाहेबांचे आज नववे पुण्यस्मरण, सामनाचा अग्रलेख
Follow us
| Updated on: Oct 28, 2021 | 10:00 AM

औरंगाबादः शहरातील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या (Divisional Commissioner’s Office) सभागृहात मराठवाड्यातील 2018 ते 2021 या आर्थिक वर्षातील जिल्हा वार्षिक योजना, नावीन्यपूर्ण योजनांतर्गत कोरोनाचा निधी व खर्च याबाबतची आढावा बैठक झाली. या बैठकीत बोलताना नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांनी नावीन्यपूर्ण योजनेच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यातील उद्यानात दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Kshirsagar) यांचे स्मारक उभारून त्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, ओपन जिम, कला दालन आदींची व्यवस्था करा. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी खर्च करा, अशा सूचना अधिकाऱ्यांना केल्या आहेत. तसेच पुढील वर्षी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचे स्मृती शताब्दी वर्ष साजरे होत आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात राजर्षी शाहू महाराजांच्या नावे अध्ययन केंद्रे सुरू करण्याबाबत नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी जिल्हा प्रशासनाला आढावा बैठकीत केल्या आहेत. तसेच राज्यात मानव विकासाच्या माध्यमातून मानव विकास निर्देशांक वाढवण्यासाठी अनेक कामे करण्यात येत आहेत. त्यासाठी ४०० कोटींचा निधी दिला आहे. मराठवाड्यातच औरंगाबादमध्ये राज्याचे कार्यालय असून मराठवाड्यासाठी अनेक योजना राबवण्यात येत आहेत, अशी माहितीही क्षीरसागर यांनी दिली.

स्थानिक गरजेनुसार नावीन्यपूर्ण योजना राबवण्याचे आवाहन

राजेश क्षीरसागर या बैठकीत म्हणाले, नावीन्यपूर्ण योजनेतून योजना राबवताना काही त्रुटी आढळल्याचे पाहायला मिळत आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी अशा योजना राबवून रोजगाराच्या संधी निर्माण करा. नागरिकांच्या आरोग्यासह जिल्ह्याच्या उत्पन्नवाढीचा प्रयत्न योजनेतून होणे गरजेचे आहे. मानव विकास निर्देशांक वाढीच्या दृष्टीने प्रत्येक जिल्ह्याने स्थानिक गरजेनुसार नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत कामांचा समावेश करावा. मात्र, यात नियमांचे पालन होत नसल्याचे काही प्रमाणात पाहायला मिळत आहे. त्यामुळे सर्वच जिल्हाधिकाऱ्यांनी निधी खर्च करताना नियमांचे पालन करावे, अशा सूचनाही क्षीरसागर यांनी दिल्या.

मराठवाड्यातील योजनांचा आढावा

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात मराठवाड्यातील 2018 ते 2021 या आर्थिक वर्षातील जिल्हा वार्षिक योजना, नावीन्यपूर्ण योजनांतर्गत कोरोनाचा निधी व खर्च याबाबतची आढावा बैठक झाली. या वेळी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण (औरंगाबाद), डॉ. विजय राठोड (जालना), राधाबिनोद शर्मा (बीड), बी. पी. पृथ्वीराज (लातूर), कौस्तुभ दिवेगावकर (उस्मानाबाद), जितेंद्र पापळकर (हिंगोली), उपायुक्त (नियोजन) रवींद्र जगताप, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे (औरंगाबाद), मनुज जिंदाल (जालना), वासुदेव सोळंके (बीड), अभिनव गोयल (लातूर), राहुल गुप्ता (उस्मानाबाद), संजय दायनी (हिंगोली) उपस्थित होते. नांदेडमध्ये आचारसंहिता आणि परभणीत विधिमंडळाची समिती असल्यामुळे या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद सीईओ गैरहजर होते.

सर्व दवाखान्यांचे फायर ऑडिट पूर्ण

विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या या बैठकीत कोरोनाच्या उपाययोजनांबाबत आम्ही आढावा घेण्यात आला. या वेळी कोरोनात केलेल्या चाचण्या, लसीकरण, ऑक्सिजन पुरवठा, औषधोपचार, दवाखान्यांच्या फायर ऑडिटचा आढावा घेतला. सर्व दवाखान्यांचे फायर ऑडिट पूर्ण झाल्याचा दावाही क्षीरसागर यांनी केला.

इतर बातम्या-

22 वर्षांनंतर ठाकरेंचं पुन्हा ‘सीमोल्लंघन’, बाळासाहेबांनंतर नातू आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत

उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचं नाव बुडवलं; साध्वी कांचन गिरी यांची टीका

Non Stop LIVE Update
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.