उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचं नाव बुडवलं; साध्वी कांचन गिरी यांची टीका

राज ठाकरे यांच्यामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची छबी दिसते असं सांगतानाच उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचं नाव बुडवलं अशी टीका साध्वी कांचन गिरी यांनी केली आहे. (Sadhvi Kanchan giri)

उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचं नाव बुडवलं; साध्वी कांचन गिरी यांची टीका
Sadhvi Kanchan giri
Follow us
| Updated on: Oct 18, 2021 | 3:20 PM

मुंबई: राज ठाकरे यांच्यामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची छबी दिसते असं सांगतानाच उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचं नाव बुडवलं अशी टीका साध्वी कांचन गिरी यांनी केली आहे.

साध्वी कांचन गिरी मुंबईत आल्या आहेत. काल त्यांनी मीडियाशी संवाद साधताना राज ठाकरेंची स्तुती करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला चढवला आहे. उद्धव ठाकरेंबाबत मला काही बोलायचं नाही. त्यांनी त्यांचे वडील बाळासाहेब ठाकरे यांचं नाव बुडवलं आहे. बाळासाहेब जे बोलायचे ते करत होते. ते प्रखर हिंदुत्ववादी होते. हिंदूंसाठी ते वाघासारखी डरकाळी फोडायचे, असं कांचन गिरी म्हणाल्या.

उद्धव ठाकरेंवर नाराज

उद्धव ठाकरेंवर मी नाराज आहे. त्यांनी मुस्लिमांसोबत जाऊन पक्ष बनवला आहे, असं सांगतानाच पालघरमध्ये हत्याकांड झालं तेव्हा उद्धव ठाकरे यांनी आपले कान आणि डोळे बंद केले होते, असी टीकाही त्यांनी केली.

राज ठाकरेच बाळासाहेबांचा संकल्प पूर्ण करणार

यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्यावर स्तुती सुमने उधळली. राज ठाकरे आक्रमक नेते आहेत. त्यांच्यात बाळासाहेबांची छबी दिसते. तेच बाळासाहेबांचा संकल्प पूर्ण करतील असं सांगतानाच उत्तर भारतीयांबाबत राज यांच्या मनात पूर्वग्रह निर्माण झाला आहे. तो दूर करण्यासाठीच मी मुंबईत आले आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, साध्वी कांचन गिरी यांनी आज राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. तब्बल तासभर त्यांनी राज ठाकरेंशी चर्चा केली. हिंदुराष्ट्र उभारणीच्या अभियानात सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. तसेच राज ठाकरे यांना अयोध्येला येण्याचं निमंत्रणही दिलं आहे.

गुरु माँ कांचनगिरी कोण?

गुरु माँ कांचन गिरी या जुना आखाड्याशी संबंधित आहेत. त्या महिला संत म्हणून प्रसिद्ध आहेत. त्या दिल्लीच्या सेक्टर-5 मधील वैशाली येथे राहतात. त्यांनी मधल्या काळात देश बचाओ आंदोलन सुरू केलं होतं. हिंदू राष्ट्र व्हावं म्हणून त्यांनी देशभर दौरे सुरू केले आहेत. महाकाल मानव सेवा समितीच्या बॅनरखाली त्यांनी हे अभियान सुरू केलं आहे. त्यांनी देशातील अनेक भागात हिंदूराष्ट्र स्थापन्याचे बॅनर्स आणि पोस्टर्स लावले आहेत. हिंदुराष्ट्राची संकल्पना प्रत्यक्षात उतरावी म्हणून त्यांनी महाराष्ट्र, मध्यप्रदेशासह विविध राज्यातील नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत.

धर्म प्रसार कार्य

1991 पासून त्यांनी युरोपीय देशात भारतीय सनातन हिंदू धर्माचा प्रचार करत आहेत. त्या गेल्या 20 वर्षांपासून त्या इंग्लंड आणि अमेरिकेसारख्या देशातही हिंदू धर्माचा प्रचार करत आहेत.

महाकाल मानव सेवान समितीच्या माध्यमातून त्या पर्यावरणाची जागृती करतात

महिलांच्या प्रश्नांवरही त्या काम करत आहेत

महिलांच्या चुकीच्या साक्षीमुळे ज्या पुरुषांना फसवले गेले आहेत. त्या पुरुषांना न्याय देण्याचं कामही त्या करतात

त्या आगामी काळात धर्म ध्वज यात्रा सुरू करणार आहेत.

आत्महत्या करणाऱ्यांना या मार्गावरून न जाण्यासाठीही त्या प्रयत्न करत असतात.

संबंधित बातम्या:

Chhagan Bhujbal | …म्हणून अजिबात भीती बाळगण्याचं कारण नाही, हे सरकार मजबूत राहणार : छगन भुजबळ

Kirit Somaiya | अजित पवारांनी स्वत:चा कारखाना विकत घेतला, माझ्याकडे घोटाळ्याचे सगळे पुरावे

Nitesh Rane | गांज्यावर इतकं प्रेम बरं नाही, सामनावरून नितेश राणेंची संजय राऊतांवर टीका

(Kanchan Giri criticize Uddhav Thackeray over Hindutva)

Non Stop LIVE Update
जाहीरपणे धमक्या? ही भाषा तुम्हाला शोभते का? राऊतांचा दादांवर घणाघात
जाहीरपणे धमक्या? ही भाषा तुम्हाला शोभते का? राऊतांचा दादांवर घणाघात.
48 तासात उत्तर द्या, अन्यथा... निवडणूक अधिकाऱ्याकडून पुन्हा नोटीस
48 तासात उत्तर द्या, अन्यथा... निवडणूक अधिकाऱ्याकडून पुन्हा नोटीस.
भांडूपमध्ये मध्यरात्री कोट्यवधींची रोकड सापडली, भरारी पथकाची कारवाई
भांडूपमध्ये मध्यरात्री कोट्यवधींची रोकड सापडली, भरारी पथकाची कारवाई.
मला शरम वाटली असती, असे म्हणत अजितदादांकडून सुप्रिया सुळेंची मिमिक्री
मला शरम वाटली असती, असे म्हणत अजितदादांकडून सुप्रिया सुळेंची मिमिक्री.
उत्तर मध्य मुंबईत भाजपनं उमेदवार बदलला, पूनम महाजनांचा पत्ता कट
उत्तर मध्य मुंबईत भाजपनं उमेदवार बदलला, पूनम महाजनांचा पत्ता कट.
गडी आपल्यात आला पाहिजे, नाहीतर घाबरून...,सदाभाऊंचं ईडीसंदर्भातील विधान
गडी आपल्यात आला पाहिजे, नाहीतर घाबरून...,सदाभाऊंचं ईडीसंदर्भातील विधान.
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.