क्रीडामहर्षी आर.आर. भारसाखळेंच्या स्मृतीप्रीत्यर्थ पहिल्या शिष्यवृत्तीचे औरंगाबादेत वितरण, 8 महिला खेळाडूंचा गौरव

महाविद्यालयातील 7 राष्ट्रीय आणि 1 राज्यस्तरीय महिला खेळाडू यांचा प्रत्येकी पाच हजार आणि तीन हजार रुपयांची शिष्यवृत्ती देऊन गौरव करण्यात आला. यावेळी महाविद्यालयातील विविध अभ्याक्रमांतील गुणवंत 16 विद्यार्थिनीचा सत्कार देखील करण्यात आला.

क्रीडामहर्षी आर.आर. भारसाखळेंच्या स्मृतीप्रीत्यर्थ पहिल्या शिष्यवृत्तीचे औरंगाबादेत वितरण, 8 महिला खेळाडूंचा गौरव
एईव्हीपीएम महिला महाविद्यालयातील राष्ट्रीय खेळाडूंना क्रीडा महर्षी प्राचार्य डॉ.आर.आर.भारसाखळे क्रीडा शिष्यवृत्ती प्रधान करण्यात आलेल्या विद्यार्थ्यां सोबत जलदूत किशोर शितोळे, प्रा.संजय गायकवाड, डॉ.केजल भारसाखळे आणि प्राचार्य डॉ.मिलिंद उबाळे
Follow us
| Updated on: Oct 13, 2021 | 3:14 PM

औरंगाबाद: शहरातील एईव्हीपीएम महिला महाविद्यालयात (AEVPM Women Collage) प्रवेश घेणाऱ्या राष्ट्रीय आणि राज्यस्तर खेळाडूंसाठी यंदाच्या वर्षांपासून देण्यात येणाऱ्या क्रीडामहर्षी आर. आर. भारसाखळे क्रीडा शिष्यवृत्तीचे वितरण बुधवारी करण्यात आले. औरंगाबाद शहराच्या सिडको (CIDCO, Aurangabad) भागात कार्यरत एईव्हीपीएम महिला महाविद्यालयातर्फे हा शिष्यवृत्ती प्रदान सोहळा आणि गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार आयोजित करण्यात आला. यावेळी महाविद्यालयातील 7 राष्ट्रीय आणि 1 राज्यस्तरीय महिला खेळाडू यांचा प्रत्येकी पाच हजार आणि तीन हजार रुपयांची शिष्यवृत्ती देऊन गौरव करण्यात आला. यावेळी महाविद्यालयातील विविध अभ्याक्रमांतील गुणवंत 16 विद्यार्थिनीचा सत्कार देखील करण्यात आला.

शिष्यवृत्ती पटकावणाऱ्या महाविद्यालयातील राष्ट्रीय खेळाडू..

अमृता माने, राजनंदिनी वाघमारे, प्रांजल सोनवणे, सीमा खान, मयुरी सोनेत, गायत्री भोसले, धनश्री पवार, कीर्ती जाधव, अशी शिष्यवृत्ती पटकावणाऱ्या महिला खेळाडूंची नावे आहेत. हा वितरण सोहळा देवगिरी बँकेचे अध्यक्ष किशोर शितोळे यांच्या हस्ते तर उपाध्यक्ष प्रा. संजय गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. एईव्हीपीएम महिला महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. केजल भारसाखळे या अध्यक्षस्थानी होत्या तर प्राचार्य डॉ. मिलिंद उबाळे यांची मंचावर उपस्तीथी होती.

सशक्त भारताचा मार्ग महिला सबलीकरणातून: शितोळे

आपल्या भाषणात किशोर शितोळे यांनी महिला सबलीकरणाचे महत्व अधोरेखीत केले. एक महिला शिकली तर त्याचा फायदा फक्त तिच्या कुटुंबाला होत नाही तर त्याचा लाभ हा समाजात संस्कारी पिढी घडवायला होतो. एक महिला उद्योजिका झाली तर ती देशाच्या जीडीपीत भर घालते आणि पर्यायाने देश सशक्त होतो. आज अश्या महिलांना आर्थिक साहाय्य देण्यासाठी अनेक बँका तयार आहेत. शिक्षणात अव्वल मुलींचा आदर्श खेळाडूंनी आणि खेळाडूंचा आदर्श शिक्षणात पुढे असलेल्या महिला खेळाडूंनी घ्यावा, असे शितोळे म्हणाले.

क्रीडा संस्कृतीत भारसाखळेंचा सिंहाचा वाटा

टेबल टेनिस, हॉकीचे राष्ट्रीय खेळाडू आणि पीइएस शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे संस्थापक प्राचार्य डॉ. आर. आर. भारसाखळे यांच्या प्रयत्नातून मराठवाड्यातील आंतरराष्ट्रीय असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुलाची निर्मिती झाली. टेबल टेनिस, हॉकी, बॉक्सिंग आणि अथलेटिक्स या खेळांच्या संघटनेचे ते संस्थापक सदस्य होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे शारीरिक शिक्षण विभाग स्थापण्यात सिंहाचा वाटा त्यांचा होता. तत्कालीन राज्यपाल पी. सी. अलेकझेंडर यांच्या हस्ते अश्वमेध स्पर्धेत विशेष गौरव करण्यात आला. निवृत्तीनंतर पद्मपाणी महाविद्यालयाची सुरुवात करून त्यांनी अनेक खेळाडू आणि संघटक घडवले. त्यांची ही ऊर्जा क्रीडा क्षेत्राला मिळत राहावी यासाठी त्यांच्या नावाने ही यावर्षी शिष्यवृत्ती सुरू करण्यात आली आहे.

इतर बातम्या- 

SPORTS: राष्ट्रीय ट्रायथलॉन स्पर्धेत औरंगाबादच्या निकेतला सुवर्णपदक, स्विमिंग-सायकलिंग-रनिंग तिन्ही फेऱ्यांत अव्वल

औरंगाबादच्या सोनम शर्माचा विक्रम, एकाच वर्षी दोनदा सुपर रॅन्डोनिअर्स, मराठवाड्यातील पहिली सायकलपटू

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.