AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MSEDCL:  दीड महिन्यात 45 हजार शेतकरी थकबाकीमुक्त, औरंगाबाद परिमंडलातील शेतकऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद

औरंगाबाद जिल्ह्यातील सुमारे 32 हजार 62 शेतकऱ्यांनी 1 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर या काळात 17 कोटी 55 लाख रुपये थकबाकीपोटी महावितरणकडे जमा केले. तर जालना जिल्ह्यातील १३ हजार ७०६ शेतकऱ्यांनी ७ कोटी १९ लाख रुपये वीजबिल भरून महाकृषी ऊर्जा अभियानात सहभाग घेतला.

MSEDCL:  दीड महिन्यात 45 हजार शेतकरी थकबाकीमुक्त, औरंगाबाद परिमंडलातील शेतकऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद
थकबाकीमुक्त कृषीपंपधारकांचा महावितरणतर्फे सत्कार
| Edited By: | Updated on: Dec 21, 2021 | 3:34 PM
Share

औरंगाबादः कृषीपंपांच्या वीज बिलातील थकबाकीत सुमारे 66 टक्के सूट मिळवण्याच्या संधीचा लाभ औरंगाबाद परिमंडलातील 45 हजार 768 शेतकऱ्यांनी घेतल्याचे समोर आले आहे. गेल्या दीड महिन्यात एवढ्या शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेत वीजबिल भरल्याने महावितरणतर्फे (MSEDCL) वीजपुरवठा खंडीत करण्याची कारवाई टाळली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

थकबाकीमुक्तीकडे वाटचाल

औरंगाबाद जिल्ह्यातील सुमारे 32 हजार 62 शेतकऱ्यांनी 1 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर या काळात 17 कोटी 55 लाख रुपये थकबाकीपोटी महावितरणकडे जमा केले. तर जालना जिल्ह्यातील १३ हजार ७०६ शेतकऱ्यांनी ७ कोटी १९ लाख रुपये वीजबिल भरून महाकृषी ऊर्जा अभियानात सहभाग घेतला. औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत २ हजार २५२ व जालना जिल्ह्यातील ८७२ शेतकरी चालू वीजबिले भरून पूर्णपणे थकबाकीमुक्त झाले आहेत. या योजनेत सहभागी नसलेल्या शेतकऱ्यांच्या कृषीपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरु आहे.

महावितरणतर्फे शेतकऱ्यांचा सत्कार

सरकारच्या या योजनेत सहभागी होऊन थकबाकीमुक्त झालेल्या गांधेली येथील कौतिकराव नाथाजी नरवडे, भालगाव येथील आश्रू पुंजाजी डिघुळे या शेतकऱ्यांचा औरंगाबाद ग्रामीण मंडलाचे अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली यांच्या हस्ते सोमवारी सत्कार करण्यात आला. तसेच इतरही शेतकऱ्यांनी 66 टक्के सवलतीचा लाभ घेत थकबाकी मुक्त होत वीजपुरवठा सुरळीत करून घ्यावा, असे आवाहन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केले.

इतर बातम्या-

Devendra Fadanvis: आघाडीने लोकशाही कुलूप बंद केली, राज्यात ‘रोकशाही, रोखशाही’ सुरू! फडणवीसांचा घणाघात

Nitesh Rane : महाविकास आघाडीचा स्वत: वर विश्वास नाही, मग जनतेनं का ठेवावा, नितेश राणेंचा सवाल

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.