AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंतप्रधानांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या नाना पटोलेंविरोधात गुन्हा दाखल करा, औरंगाबाद भाजपाची मागणी

पंतप्रधानांना मारण्याची आणि शिविगाळ करण्याची भाषा करणाऱ्या नाना पटोलेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी औरंगाबाद भाजपच्या वतीनेही करण्यात आली. शहरातील सिडको पोलीस स्टेशन येथील शहराध्यक्ष राजगौरव वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले.

पंतप्रधानांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या नाना पटोलेंविरोधात गुन्हा दाखल करा, औरंगाबाद भाजपाची मागणी
सिडको पोलीस स्टेशनमध्ये भाजपच्या वतीने निवेदन सादर
| Edited By: | Updated on: Jan 18, 2022 | 4:54 PM
Share

औरंगाबादः कार्यकर्त्यांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्याविरोधात भाजपनं राज्यभरात रान उठवलंय. नाना पटोले यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मात्र पंतप्रधानांना मारण्याची आणि शिविगाळ करण्याची भाषा करणाऱ्या नाना पटोलेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी औरंगाबाद भाजपच्या वतीनेही करण्यात आली. शहरातील सिडको पोलीस स्टेशन येथील शहराध्यक्ष राजगौरव वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले.

भाजपच्या मागण्या काय?

सिडको पोलीस स्टेशनमधील पोलीस निरीक्षक यांना भाजपने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मी मोदींना मारू शकतो, शिव्या देऊ शकतो, असे वक्तव्य महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. याबाबतची व्हिडिओ क्लिप आपणास सादर करीत आहे. व्हिडिओ क्लिपमधील वक्तव्याचा तपास करावा. मां. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवाला धोका उत्पन्न करणारी घटना नुकतीच पंजाबमध्ये नियोजनबद्ध करण्यात आली. नाना पटोले यांचे वक्तव्य हे जनसमूदायाला भडकावून मोदीजींना मारहाण कर्यासाठी किंवा त्यांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या षड्यंत्राला पाठबळ देणार आहे. हे वर्तन व भाषा आदर्श समाजात तेढ निर्माण करणे किंवा दंगा भडकावण्यासारखे आहे. त्यामुळे नाना पटोले यांच्याविरोधात गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी भाजपच्या वतीने या पत्रात करण्यात आली आहे. यावेळी मनोज भारस्कर प्रदेश कार्यकारणी सदस्य, सरचिटणीस राहुल रोजतकर,शहर उपाध्यक्ष पवन सोनवणे, सतीश खेडकर मयूर महाकाळ,विजय बरसमवार, तेजस व्यवहारे ,विनोद बनकर, समीर लोखंडे , भीमा धर्मे योगेश भाकरे,स्वप्नील नरवाडे, बंटी चावरीया आदी उपस्थित होते.

भंडारा पोलिसांकडून चौकशी सुरु

महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून भाजपच्या वतीने आज आंदोलन करण्यात आलं. तसेच अनेक भाजपच्या नेत्यांनीही नाना पटोलेंविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली. त्यानंतर भंडारा पोलिसांनी सदर प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. भाजपचे मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी समजानगर पोलीस स्टेशनला ही मागणी केली. त्यानंतर त्यांनी नाना पटोले यांचा पुतळा जाळला. यावेळी भातखळकर यांना अटक करण्यात आली. पंजाब राज्यात पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत घडलेल्या घटनेचा आणि नाना पटोले यांनी ‘मी मोदींना मारू शकतो’ केलेल्या या वक्तव्यव्याचा काही संबंध आहे का, याची सखोल चौकशी सर्वोच्च न्यायालयाने गठित केलेल्या समितीनेच केली पाहिजे, अशी मागणी अतुल भातखळकर यांनी केली.

इतर बातम्या-

नाना पटोलेंसह मलिकांविरोधात गावोगावी तक्रारी दाखल करा, चंद्रकांतदादांचे कार्यकर्त्यांना आदेश

Smart City | नागपूर स्मार्ट सिटीच्या शिरपेचात मानाचा तुरा!, स्ट्रीट फॉर पीपल चॅलेंजसाठी पुरस्कार

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.