AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टी-20 क्रिकेट सामन्यांवर औरंगाबादेत सट्टा, बुकीसह चौघे गजाआड, उस्मानपुरा पोलिसांची कारवाई

औरंगाबादः सध्या दुबई येथे सुरु असलेल्या टी-20 वर्ल्ड कप क्रिकेट सामन्यांवर ऑनलाइन सट्टा लावणारे तिघे आणि बुकी अशा चौघांना औरंगाबाद पोलिसांनी (Aurangabad police) जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून मोबाइल आणि रोकड मिळून 52 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पीरबाजार चौकातील मिलन हॉटेलजवळ 27 ऑक्टोबर रोजी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. मिलन हॉटेलच्या बाजूला लावत होते […]

टी-20 क्रिकेट सामन्यांवर औरंगाबादेत सट्टा, बुकीसह चौघे गजाआड, उस्मानपुरा पोलिसांची कारवाई
crime
| Edited By: | Updated on: Oct 29, 2021 | 6:32 PM
Share

औरंगाबादः सध्या दुबई येथे सुरु असलेल्या टी-20 वर्ल्ड कप क्रिकेट सामन्यांवर ऑनलाइन सट्टा लावणारे तिघे आणि बुकी अशा चौघांना औरंगाबाद पोलिसांनी (Aurangabad police) जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून मोबाइल आणि रोकड मिळून 52 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पीरबाजार चौकातील मिलन हॉटेलजवळ 27 ऑक्टोबर रोजी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली.

मिलन हॉटेलच्या बाजूला लावत होते सट्टा

या प्रकरणी संदेश प्रकाशचंद संचेती, संदीप श्रीधर भोसले, सय्यद आजम सय्यद शफी अशा तीन सट्टा खेळणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली. तर आसिफ सय्यद अजमुद्दीन सय्यद नावाच्या बुकीलाही पोलिसांनी जेरबंद केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिलन हॉटेलच्या बाजूला काही लोक बांग्लादेश- इंग्लंड टी-20 वर्ल्डकपच्या क्रिकेट सामन्यावर ऑनलाइन सट्टा लावत असल्याची माहिती उस्मानपुरा पोलिसांना मिळाली होती. त्यावरून विशेष पथकाचे सहाय्यक राहुल सूर्यतळ यांच्या पथकाने 27 ऑक्टोबरला सायंकाळी छापा मारला. तिथे तिघे मोबाइलवर सट्टा खेळत असल्याची खात्री पटताच पोलिसांनी घेराव घालून त्यांना पकडले. विचारपूस केल्यावर त्यांची नवे कळाली.

बुकीला फोनवर बोलावून पकडले

पोलिसांच्या हाती लागलेल्या तिघांकडून मुख्य बुकीचे नाव कळाले. पकडलेल्या तिघांची पोलीस निरीक्षक गीता बागवडे, सहाय्यक निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या पथकाने चौकशी केली. त्यात बुकी आसिफ सय्यद अजमुद्दीन सय्यद याच्याकडून घेतलेल्या वेबसाइटवर आयडी तयार करून ऑनलाइन सट्टा लावत असल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी सय्यद आजम याच्या मोहाइलवरूवन फोन करुन आसिफला बोलावून घेत अटक केली.

अट्टल चोर जिन्सी पोलिसांच्या ताब्यात; दोन दुचाकी जप्त

शहरातील आणखी एका कारवाईत, जुलै महिन्यात चोरीला गेलेल्या दुचाकीच्या शोधात असलेल्या जिन्सी पोलिसांना अट्टल दुचाकी चोर सापडला. त्याच्याकडून चोरलेल्या तीन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. हसन खान कलंदर खान असे चोराचे नाव आहे. किराडपुऱ्यातील इम्रान सांडू शेख (30) यांची दुचाकी 23 जुलै रोजी मध्यरात्री घरासमोरून चोरीला गेली होती. याप्रकरणी जिन्सीचे उपनिरीक्षक गोकुळ ठाकूर तपास करत असताना त्यांना हा प्रकार मूळ जालन्याचा असलेला व रेकॉर्डवरील गुन्हेगार हसनने केल्याची माहिती मिळाली. तेव्हापासून ठाकूर त्याच्या शोधात होते. बुधवारी तो रोशन गेट भागात असल्याचे कळताच निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक ठाकूर, सहायक फौजदार संपत राठोड, पोलिस नाईक नंदू परदेशी, सुनील जाधव, नंदलाल चव्हाण, ज्ञानेश्वर बाविस्कर, संतोष बमनात यांनी त्याला ताब्यात घेतले. 23 जुलै रोजी चोरलेल्या दुचाकींसह त्यादरम्यान चोरलेल्या इतर दोन दुचाकींची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी त्या जप्त केल्या.

इतर बातम्या-

GOLD: शहरात 300 पेक्षा जास्त सुवर्णदालने, ऐन दिवाळीत सोनेही घटले, वाचा औरंगाबादचे भाव

औरंगाबादच्या बाजारात परराज्यातील लाल मातीच्या आकर्षक पणत्या दाखल, स्थानिकांचा लक्ष्मी मूर्ती बनवण्यावर भर

इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.