GOLD: शहरात 300 पेक्षा जास्त सुवर्णदालने, ऐन दिवाळीत सोनेही घटले, वाचा औरंगाबादचे भाव

औरंगाबादः दसऱ्यापासून दिवाळी (Diwali festival) आणि त्यानंतर सोन्याच्या भावात चांगलेच चढ-उतार पहायला मिळत आहेत. त्यामुळे दिवाळीला सोन्याची खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी ही चांगली संधी आहे. दिवाळीनिमित्त बाजारपेठेत विविध डिझाइन्सचे दागिन्यांचीही आवक झाली आहे. तसेच लक्ष्मीपूजनासाठी पूजल्या जाणाऱ्या मूर्ती आणि लक्ष्मी म्हणून घेतल्या जाणाऱ्या प्रतिकात्मक शिक्क्यांचीही बाजारात आवक झाली आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजाराचे परिणाम म्हणून औरंगाबादच्या बाजारातील […]

GOLD: शहरात 300 पेक्षा जास्त सुवर्णदालने, ऐन दिवाळीत सोनेही घटले, वाचा औरंगाबादचे भाव
शहरात गेल्या वर्षात सुरु झालेल्या नव्या दालनांनाही ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
Follow us
| Updated on: Oct 29, 2021 | 5:24 PM

औरंगाबादः दसऱ्यापासून दिवाळी (Diwali festival) आणि त्यानंतर सोन्याच्या भावात चांगलेच चढ-उतार पहायला मिळत आहेत. त्यामुळे दिवाळीला सोन्याची खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी ही चांगली संधी आहे. दिवाळीनिमित्त बाजारपेठेत विविध डिझाइन्सचे दागिन्यांचीही आवक झाली आहे. तसेच लक्ष्मीपूजनासाठी पूजल्या जाणाऱ्या मूर्ती आणि लक्ष्मी म्हणून घेतल्या जाणाऱ्या प्रतिकात्मक शिक्क्यांचीही बाजारात आवक झाली आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजाराचे परिणाम म्हणून औरंगाबादच्या बाजारातील (Aurangabad market) भावातही चांगलेच चढ-उतार पहायला मिळत आहे. कालच्या पेक्षा आज सोन्याच्या दरात घट झालेली दिसून आली.

औरंगाबादचे आजचे भाव

आज 29 ऑक्टोब रोजी औरंगाबादच्या सराफा बाजारातील सोन्याच्या दरातही घट झालेली दिसून आली. 22 कॅरेट सोन्याचे दर 47,750 रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर 24 कॅरेट सोन्याचे दर आज शुक्रवारी 48,700 रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो शुद्ध चांदीचे दर 675000 रुपये एवढे दिसून आले. औरंगाबादच्या सराफा बाजारात 28 ऑक्टोबर रोजी गुरुवारी सोन्याचे भाव 47,800 रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर 24 कॅरेट सोन्याचे भाव 48,600 रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. मंगळवारी औरंगाबादमधील 22 कॅरेट सोन्याचे दर 48,000 रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर 24 कॅरेट सोन्याचे भाव 49,000 रुपये प्रति तोळा एवढे नोंदवण्यात आले. तर एक किलो शुद्ध चांदीचे दर 68,800 रुपये एवढे नोंदले गेले. 25 ऑक्टोबर रोजी सोमवारी 24 कॅरेट सोन्याचे भाव 49,200 रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर 22 कॅरेट सोन्याचे दर 48,050 रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. अर्थात शेअर बाजारातील चढ-उतारानुसार दर काही मिनिटांनी सोन्याच्या भावात चढ-उतार दिसत असतो. येथे दिलेले भाव हे त्या वेळेनुसार सरासरी काढून दिलेले आहेत.

300 पेक्षा जास्त सुवर्णदालने

औरंगाबाद सराफा असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र मंडलिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात पारंपरिक सराफा व्यापारी आणि विविध राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय ब्रँडची अशी जवळपास 300 ते 350 दालने आहेत. यामुळे सोन्या-चांदीसोबतच हिरे, प्लॅटिनमचे दागिने खरेदीचेही पर्याय ग्राहकांसमोर खुले आहेत. गेल्या वर्षभरातच 20 ते 25 नवीन शोरुम उघडले आहेत. त्यामुळे पारंपरिक कासारी बाजार, सराफा बाजार, जवाहर कॉलनीसोबत जालना रोड, सिडको-हडको, शिवाजीनगर इत्यादी भागातही विविध ब्रँडची सुवर्णदालने उघडली आहेत. त्यामुळे शहरात दररोज सोन्या-चांदीच्या व्यापारात कोट्यवधींची उलाढाल होते. दिवाळीच्या मुख्य चार-पाच दिवसात ही उलाढाल अनेक पटींनी वाढण्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.

इतर बातम्या-

गोल्ड स्कीममध्ये पैसे लावणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, गुंतवणूकदाराचा मृत्यू झाल्यास काय होणार?

Gold price: दिवाळीपूर्वी सोन्याच्या भावात घसरण; रेकॉर्ड स्तरापेक्षा 8330 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या आजचा भाव

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.