AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संधी सोडू नका! सोने झाले स्वस्त, चांदी तर पार गडगडली, वाचा औरंगाबादमध्ये काय आहेत भाव?

आज औरंगाबादमधले सोन्याचे भाव संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास 46,000 रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. चांदीच्या दरात कमालीची घसरण दिसून आली. औरंगाबादच्या सराफा मार्केटमध्ये आज एक किलो शुद्ध चांदीचे दर 63000 रुपये एवढे नोंदले गेले

संधी सोडू नका! सोने झाले स्वस्त, चांदी तर पार गडगडली, वाचा औरंगाबादमध्ये काय आहेत  भाव?
| Edited By: | Updated on: Sep 18, 2021 | 6:53 PM
Share

औरंगाबाद: आठवड्याच्या शेवटच्या दिवशीही सोने आणि चांदीच्या भावात चांगलीच घसरण दिसून आली. विशेषतः चांदीच्या दरांनी चांगलीच(Fall in Gold and Silver Price)  आपटी खाललेली दिसत आहे. आज सोन्याच्या दरात 100 ते 400 रुपयांच्या आसपास घसरण दिसून आली तर चांदीने तब्बल दीड हजार रुपयांची घसगुंडी अनुभवली. त्यामुळे सोने आणि चांदीने मागील पाच महिन्यातील निचांकी पातळी गाठली आहे. दरम्यान, सोन्या-चांदीत गुंतवणुकीची इच्छा असणाऱ्यांनी ही संधी सोडू नये, असा सल्ला गुंतवणूक तज्ज्ञांनी दिला आहे.

शहरातले सोन्या-चांदीचे भाव काय?

आज औरंगाबादमधले सोन्याचे भाव संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास 46,000 रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. हे 22 कॅरेट सोन्याचे दर आहेत. तर चांदीच्या दरात कमालीची घसरण दिसून आली. औरंगाबादच्या सराफा मार्केटमध्ये आज एक किलो शुद्ध चांदीचे दर 63000 रुपये एवढे नोंदले गेले, अशी माहिती औरंगाबाद सराफा असोशिएशनचे अध्यक्ष राजेंद्र मंडलिक यांनी दिली. त्यामुळे  कालच्या दरांपेक्षा चांदीचे  दर तब्बल दीड हजार रुपयांनी कमी आहेत. त्यामुळे भविष्यात चांदीच्या दरांतून चांगला परतावा मिळू शकतो.

आता घरात सोनं सांभाळून ठेवण्याची जोखीम नाही

सोने खरेदी करण्यासाठी आता तुम्हाला दुकानात जाण्याची गरज नाही. कारण आपण दररोज पैसे ट्रान्सफर करण्यासाठी वापरत असलेल्या ‘गुगल पे’ वरुनही आता सोनं खरेदी करता येईल. एवढंच नव्हे तर ‘गुगल पे’ वर सोनं साठवून ठेवण्याचीही सुविधा असेल. त्यामुळे तुम्हाला घरात सोनं ठेवण्याची जोखीमही पत्कारावी लागणार नाही. गुगल पे (Google Pay) आणि पेटीएम वॉलेटकडून (PayTm) ही सुविधा सुरु करण्यात आली आहे. या दोन्ही पेमेंट वॉलेटच्या माध्यमातून तुम्ही डिजिटल गोल्ड खरेदी करु शकता. एवढेच नव्हे तर तुम्ही ‘गुगल पे’वरुन या सोन्याची विक्रीही करू शकता.

स्मार्टफोनवरून खरेदी करा डिजिटल गोल्ड

डिजिटल स्वरुपातील सोनं हे तुम्ही ऑनलाईन खरेदी करु शकता. हे सोनं विक्रेत्याकडून इन्शुअर्ड व्हॉल्टसमध्ये संग्रहित केले जाते. तुम्ही अगदी स्मार्टफोनवरुनही डिजिटल गोल्डची खरेदी करु शकता. विशेष म्हणजे तुम्ही अगदी कमी प्रमाणात म्हणजे अगदी 100 रुपयांचे सोनेही विकत घेऊ शकता. (Gold and Silver Rate in Aurangabad sarafa market, Maharashtra)

इतर बातम्या- 

अफगाणिस्तानातील परस्थितीचा परिणाम केशरच्या दरावर, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय ‘लाल सोन्याच्या’ किंमतीत वाढ

Tata Safari चं गोल्ड एडिशन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.