पिकांना बसतोय पावसाचा फटका, शिवारात उभ्या पिकाची काळजी कशी घ्याल, जाणून घ्या कृषी हवामान सल्ला

कापूस, मूग, उडीद, मका आदी बहुतांश पिकांत मुसळधार पावसामुळे पाणी साठले असेल तर अतिरिक्त पाणी काढून टाकावे. फवारणीची कामे पुढे ढकलावीत, असा सल्ला तज्ञांनी दिला आहे.

पिकांना बसतोय पावसाचा फटका, शिवारात उभ्या पिकाची काळजी कशी घ्याल, जाणून घ्या कृषी हवामान सल्ला
संग्रहित छायाचित्र
Follow us
| Updated on: Sep 07, 2021 | 5:58 PM

औरंगाबाद: परतीच्या पावसाने मराठवाड्यात दमदार हजेरी लावली असून विविध जिल्ह्यांमध्ये खरीपाच्या पिकांवरही त्याचा परिणाम झाला आहे. औरंगाबाद, जालना, नांदेड, बीड, परभणी आणि लातूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस पडला. उस्मनाबाद, हिंगोली जिल्ह्यातही मुसळधार पाऊस (Heavy rainfall in Usmanabad, Hingoli, Marathwada) झाला. 8 सप्टेंबर रोजीही औरंगाबाद व जालन्यात भरपूर पाऊस होईल तसेच पुढील 12 ते 18 सप्टेंबर या पाच दिवसातही मराठवाड्यातील काही ठिकाणी पाऊस होईल, असा अंदाज मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने (Vasantrao Naik Marathwada Agricultural University, Parbhani) शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या पिकांसाठी योग्य सल्ला दिला आहे.

कापूस, तूर, मूग/उडीदाची काय स्थिती?

तज्ञांच्या सल्ल्यानुसार, कापूस सध्या पाते लागणे ते बोंड धरण्याच्या स्थितीत आहे. मागील आठवड्यातील पावसामुले कापूस पिकात साचलेले अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढून द्यावे. पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज असल्याने फवारणीची कामे पुढे ढकलावीत. तूरीला फांद्या फुटण्याचे दिवस असल्याने तुरीतीलही अतिरिक्त पाणी काढून द्यावे. फवारणी आताच करु नये. मूग व उडीदाचे पिक सध्या काढणीच्या स्थितीत असल्याने पिकाची काढणी सुरक्षित ठिकाणीच साठवावी. ती पावसात भिजणार नाही, याची काळजी घ्यावी.

भुईमूग, मका सध्या कोणत्या अवस्थेत?

भुईमूग सध्या फुलधारणा अवस्थेत आहे. त्यामुळे पिकात पाणी साठले असेल तर अतिरिक्त पाणी काढून टाकावे. फवारणीची कामे पुढे ढकलावीत. तसेच मक्याचीही सध्याची वाढीची स्थिती असल्याने अतिरिक्त पाणी साठू देऊ नये. तसेच केळी, आंबा, द्राक्ष, सिताफळ आदी फळांमध्ये सध्या वाढीचा काळ असल्यामुळे फळबागेतील अतिरिक्त पाणी काढून टाकण्याचा सल्ला तज्ञांनी दिला आहे. काढणीस तयार असलेल्या भाज्या काढून सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. यासंबंधीची माहिती परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागातील मुख्य प्रकल्प समन्वयक डॉ. कैलास डाखोरे यांनी दिली आहे.

पशुधनाची काळजी कशी घ्याल?

गेल्या काही दिवसांपासून दमट हवामान व सततच्या पावसामुळे पशुधनाला आजारांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यत असते. पावसात जनावरांचे गोठे कोरडे राहतील, अशी काळजी घ्यावी. जनावरांना कोरड्या जागी बांधावे, पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी. तसेच जनावरांना सर्दी, निमोनिया यासारख्या आजारांची लक्षणे दिसल्यास त्वरीत पशूवैद्यकाच्या सल्ल्याने उपाययोजना कराव्यात, अशा सूचना तज्ञांनी दिल्या आहेत. (How to take care of crops in current heavy rainfall in Marathwada region, Maharashtra)

इतर बातम्या- 

बीडवर दुष्काळाचं सावट, सोयाबीन करपू लागलं; पीक विमा कधी मिळणार? कर्जमाफी द्या, शेतकऱ्यांची मागणी

महाराष्ट्राच्या शेती विकासात महत्वपूर्ण योगदान, पद्मश्री बनबिहारी निंबकर यांचे निधन

Non Stop LIVE Update
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.