हळदीचा कार्यक्रम, हातात तलवार अन् ‘मै हूं डॉन’ वर बेधुंद, औरंगाबादच्या नवरदेवाला अतिउत्साह महागात पडलाच!

तलवार आणि जांबिया घेऊन नाचणाऱ्या या सहा जणांवर पुंडलिक नगर पोलिसांनी तत्काळ कारवाई केली. निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांनी तत्काळ स्वांना अटक करण्याचे निर्देश दिले.

हळदीचा कार्यक्रम, हातात तलवार अन् 'मै हूं डॉन' वर बेधुंद, औरंगाबादच्या नवरदेवाला अतिउत्साह महागात पडलाच!
औरंगाबादेत तलवार घेऊन नाचणाऱ्या नवरदेवासह मित्रांना शिक्षा
Follow us
| Updated on: Feb 04, 2022 | 12:28 PM

औरंगाबाद: लग्नासाठीचा अति उत्साह औरंगाबादमधील एक नवरदेव (Aurangabad husband) आणि त्याच्या मित्रांना चांगलाच महागात पडला. हळदीच्या कार्यक्रमात विकृत मनोवृत्तीचं दर्शन घडवत या लोकांनी तलवार आणि जांबिया घेऊन डान्स करायला सुरुवात केली. आधी मित्रांनी डान्स सुरु केला आणि त्यात नवरदेवालाही ओढलं. मग काय सगळेच गाण्याच्या तालावर बेधुंद थिरकले. उत्साहाच्या भरात स्वतःचे व्हिडिओही काढले आणि सोशल मीडियावर अपलोडही केले. अर्थात पोलिसांपर्यंत (Police Arrest) या सगळ्या प्रकाराची माहिती क्षणात पोहोचली आणि सगळ्या मिरवणुकीच्या टीमची चांगलीच जिरली. त्यामुळे औरंगाबादमध्ये (Aurangabad marriage party) अतिउत्साही नवरदेवाचीच चर्चा रंगली.

औरंगाबादचा व्हिडिओ व्हायरल!

मित्रांनी हट्ट केला अन् नवरदेवही उतरला

शहरातील पुंडलिक नगर परिसरातील रेणुकानगर या ठिकाणी बिभीषण अनिल शिंदे याच्या लग्नाच्या हळदीचा कार्यक्रम होता. यात बिभीषणचा मित्र व आरटीओ एजंट वसीम अय्युब शेख याने तलवार घेऊन डान्स करायला सुरुवात केली. त्यानंतर शुभम सुरेश मोरे याने दोन जांबिये बाहेर काढून बेधुंद नाचायला सुरुवात केली. त्यांच्यासोबत बिभीषण आणि यश पाखरे, शेख बादशहा शेख बाबा, किरण गोरख रोकडे यांनीदेखील तलवार घेऊन मोबाइलमध्ये चित्रण केले. नंतर ते सोशल मिडियावर अपलोड करताच पुंडलिक नगर पोलिसांच्या बाती लागले.

सहा जणांना पोलीस कोठडी

तलवार आणि जांबिया घेऊन नाचणाऱ्या या सहा जणांवर पुंडलिक नगर पोलिसांनी तत्काळ कारवाई केली. निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांनी तत्काळ स्वांना अटक करण्याचे निर्देश दिले. सहाय्यक निरीक्षक शेषराव खटाणे, हवालदार लक्ष्मणराव हिंगे, बाळाराम चौरे, पोलीस नाईक गणेश वैराळकर, जालिंदर मांटे आदींनी यांचा शोध घेत अटक करून हत्यारे ताब्यात घेतली. न्यायालयाने सर्वांची एक दिवसाच्या पोलीस कोठडीत रवानगी केली. या प्रकरणाचा तपास दादाराव राठोड करत आहेत.

इतर बातम्या-

परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचे आरोप, स्वत:च्या बचावासाठी आरोपी इतरांची नाव घेतो: संजय राऊत

थकबाकी शेतकऱ्यांकडे नव्हे महावितरणकडेच, आंदोलनानंतरची बैठकही निष्फळ, आता तोडगा काय?

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.