AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

maharashtra cabinet meeting : 15 मोर्चे, 3 हजार पोलिसांचा बंदोबस्त, औरंगाबादला छावणीचं स्वरुप; कडेकोट बंदोबस्तात आजपासून कॅबिनेट

राज्य मंत्रिमंडळाची आजपासून औरंगाबादेत बैठक होणार आहे. या बैठकीसाठी अख्खं मंत्रिमंडळ औरंगाबादेत लोटलं आहे. तब्बल सात वर्षानंतर ही बैठक होणार असून त्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

maharashtra cabinet meeting : 15 मोर्चे, 3 हजार पोलिसांचा बंदोबस्त, औरंगाबादला छावणीचं स्वरुप; कडेकोट बंदोबस्तात आजपासून कॅबिनेट
cm eknath shinde Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Sep 16, 2023 | 8:23 AM
Share

सागर सुरवासे, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी, औरंगाबाद | 16 सप्टेंबर 2023 : औरंगाबादमध्ये आजपासून राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. दोन दिवस ही बैठक चालणार असून या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. या बैठकीसाठी अख्खं मंत्रिमंडळ औरंगाबादमध्ये दाखल झालं आहे. त्यामुळे शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला असून त्यामुळे शहराला छावणीचं स्वरुप आलं आहे. ही बैठक अतिशय महत्त्वाची मानली जात आहे. एक तर तब्बल सात वर्षानंतर ही बैठक होत आहे. दुसरं म्हणजे लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत. त्यापूर्वीच मराठवाड्यात सत्ताधाऱ्यांकडून घोषणांचा पाऊस पाडला जाणार असल्याने या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

औरंगाबादमध्ये आजपासून दोन दिवस राज्यमंत्रिंमडळाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला 29 मंत्री उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे बैठकीसाठी येणाऱ्या मंत्री आणि अधिकाऱ्यांसाठी रेड कार्पेट अंथरण्यात आलं आहे. तब्बल 7 वर्षानंतर मराठवाड्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात येत आहे. औरंगाबादच्या स्मार्ट सिटी कार्यालयात ही बैठक होत आहे. 17 सप्टेंबर रोजी म्हणजे उद्या मराठवाडामुक्ती संग्रामाचे 75 वे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. त्यामुळे मराठवाड्यात ही बैठक होत आहे.

अनुशेष भरून काढणार का?

मंत्रिमंडळाच्या या बैठकीमध्ये मराठवाड्याच्या प्रश्नांसंदर्भात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाऊ शकतात. मराठवाड्याचा राहिलेला अनुशेष हा भरून काढण्यात येणार का? हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचा ठरणार आहे. या बैठकीत एकूण 75 निर्णय होण्याची शक्यता आहे. तसेच या बैठकीसाठी 400 अधिकारी औरंगाबादमध्ये दाखल झाले आहेत.

छावणीचं स्वरुप

मंत्रिमंडळ बैठकीसाठी औरंगाबादेत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आयपीएस दर्जाचे 6 वरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलीस उपायुक्त दर्जाचे 23 पोलीस अधिकारी, 115 पोलीस निरीक्षक, 296 पीएसआय, 1700 पोलीस, 147 महिला पोलीस, एसआरपीएफच्या 4 तुकड्या, होमगार्ड 500 असे एकूण 3 हजार पोलीस संपूर्ण शहरात तैनात असणार आहेत.

येणाऱ्या जाणाऱ्यांची कसून चौकशी केली जाणार आहे. संशयितांवरही करडी नजर असणार आहे. शहरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने शहराला छावणीचं स्वरुप आलं आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीवर एकूण 15 मोर्चे धडकणार आहे. यात प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचितचा मोर्चा लक्षवेधी ठरणार आहे.

मोर्चे किती

एकुण मोर्चे – 15 एकुण धरणे/ निदर्शने -06 एकुण निवेदन – 04 मोर्चा रूट – क्रांती चौक ते भडकल गेट धरणे ठिकाण – भडकल गेट

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.