पालिका आयुक्तांच्या घराचे नळ कनेक्शन कापल्यानंतर कारवाई, मनसेच्या कार्यकर्त्यांना अटक, 1 दिवसाची पोलीस कोठडी

महानगपालिका आयुक्तांच्या निवासस्थानाच्या नळाचे कनेक्शन कापल्याप्रकरणी मनसेच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आलंय.

पालिका आयुक्तांच्या घराचे नळ कनेक्शन कापल्यानंतर कारवाई, मनसेच्या कार्यकर्त्यांना अटक, 1 दिवसाची पोलीस कोठडी
मनसे आंदोलन
Follow us
| Updated on: Jul 28, 2021 | 9:39 PM

औरंगाबाद : महानगपालिका आयुक्तांच्या निवासस्थानाच्या नळाचे कनेक्शन कापल्याप्रकरणी मनसेच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आलंय. निवेदनाद्वारे सांगूनही पाण्याचा प्रश्न न सोडवल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी 18 जुलै रोजी नळ कनेक्शन कापून आंदोलन केले होते. त्यानंतर आता ही अटकेची कारवाई करण्यात आलीय. अटक केलेल्या कार्यकर्त्यांना एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. (MNS activist has been arrested who had cut off water connection of municipal commissioner house)

नेमकं प्रकरण काय आहे ?

मागील अनेक दिवसांपासून औरंगाबादेत पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. हीच समस्या घेऊन मनसेच्या कार्यकर्त्यांनी शहरातील पाणीप्रश्न सोडवण्याची मनपा आयुक्तांकडे मागणी केली होती. या बाबतीत मनसेने सविस्तर निवेदनदेखील दिले होते. मात्र, या निवेदनाची तसेच मागणीची कोणतीही दखल न घेतल्यामुळे मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी 18 जुलै रोजी महानगरपालिका आयुक्तांच्या शासकीय निवासस्थानाचे नळ कनेक्शन कापले होते. 18 जुलै रोजी पहाटे साडे पाच वाजता हा प्रकार करण्यात आला होता. त्यानंतर मनसेने प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजीदेखील केली होती.

आता आयुक्तांना कळेल नागरिकांना नेमका काय त्रास होतोय…!

मनसेच्या या आगळ्यावेगळ्या आंदोलनामुळे सगळीकडे खळबळ उडाली होती. याबाबत मनसे अधिकाऱ्यांनी सविस्तर माहिती दिली होती. महापालिका आयुक्तांच्या घराचं आता आम्ही नळाचं कनेक्शन कापलंय. आता जेव्हा त्यांच्या घरात पाणी येणार नाही, त्यावेळी त्यांना पाण्याचं महत्त्व कळेल. तसंच मागील काही दिवसांपासून सर्वसामान्य औरंगाबादकर कोणत्या परिस्थितीतून जात आहेत, याची जाणीव देखील त्यांना होईल, असं मनसे कार्यकर्ते, त्यावेळी म्हणाले होते.

दरम्यान, हा प्रकार घडल्यानंतर आता नळ कापून आंदोलन करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांना अटक करण्यात आलं असून एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

इतर बातम्या :

Special Report | पूरग्रस्तांची स्थिती पाहून उर्मिला मातोंडकरांना अश्रू अनावर

Maharashtra Cabinet : पंचनामे पूर्ण झाल्यावर पूरग्रस्तांना मदत; मंत्रिमंडळ बैठकीतील 5 महत्वाचे निर्णय, वाचा सविस्तर

5 पेक्षा जास्त मुलं करा किंवा असल्यास दर महिना दीड हजार रुपये मिळवा, कॅथॉलिक चर्चची घोषणा वादात, वाचा सविस्तर

(MNS activist has been arrested who had cut off water connection of municipal commissioner house)

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.