Railway: लवकरच पॅसेंजरही सुरु होणार,औरंगाबाद मार्गावरील रेल्वे व जनरल डब्यांची सुविधा ऑक्टोबर महिन्यात टप्प्या-टप्प्याने

औरंगाबाद: कोरोना संकटामुळे रेल्वेद्वारे (Indian Railway) प्रवास करणाऱ्यांना आतापर्यंत फक्त ऑनलाइन तिकिटांद्वारेच (Online Railway Ticket) प्रवास करण्याची मुभा रेल्वेद्वारे दिली जात होती. यामुळे प्रवासाचे नियोजन न केलेल्या तसेच ऐनवेळी काही प्रवासाचे काम उद्भवलेल्या नागरिकांची खूप गैरसोय होत होती. आता कोरोना प्रादुर्भावाचे प्रमाण औरंगाबाद आणि परिसरात कमी झाल्याचे दिसून आल्याने लवकर सामान्य प्रवाशांसाठी पॅसेंजर सेवा सुरु […]

Railway: लवकरच पॅसेंजरही सुरु होणार,औरंगाबाद मार्गावरील रेल्वे व जनरल डब्यांची सुविधा ऑक्टोबर महिन्यात टप्प्या-टप्प्याने
प्रातिनिधीक छायाचित्र
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मंजिरी धर्माधिकारी

Oct 04, 2021 | 1:25 PM

औरंगाबाद: कोरोना संकटामुळे रेल्वेद्वारे (Indian Railway) प्रवास करणाऱ्यांना आतापर्यंत फक्त ऑनलाइन तिकिटांद्वारेच (Online Railway Ticket) प्रवास करण्याची मुभा रेल्वेद्वारे दिली जात होती. यामुळे प्रवासाचे नियोजन न केलेल्या तसेच ऐनवेळी काही प्रवासाचे काम उद्भवलेल्या नागरिकांची खूप गैरसोय होत होती. आता कोरोना प्रादुर्भावाचे प्रमाण औरंगाबाद आणि परिसरात कमी झाल्याचे दिसून आल्याने लवकर सामान्य प्रवाशांसाठी पॅसेंजर सेवा सुरु केली जाणार आहे. आगामी आठवड्यात काचीगुडा-मनमाड ही पॅसेंजर पुन्हा सुरु करण्यात येणार आहे व उर्वरीत पॅसेंजर गाड्या टप्प्या-टप्प्याने सुरु होतील अशी माहिती रेल्वे प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.

ऑक्टोबर महिन्यात जनरल डब्यांची सुविधा

औरंगाबाद रेल्वे मार्गावर चालमाऱ्या पॅसेंजर रेल्वे ऑक्टोबर महिन्यात सुरु करण्याची माहिती दक्षिण-मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक गजानन माल्या यांनी दिली. दक्षिण मध्य रेल्वे विभागाने हैदराबादसह अन्य भागात पॅसेंजर तसेच डेमू रेल्वे सुरु केल्या आहेत. मात्र नांदेड विभागात पॅसेंजर रेल्वे किंवा डेमू रेल्वे सुरु करण्यात आलेली नाही. मात्र ऑक्टोबरमध्ये सर्व पॅसेंजर टप्प्या-टप्प्याने सुरु करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

औरंगाबाद-परभणी-नांदेडमधील प्रवाशांची गैरसोय टळणार

मराठवाडा प्रवासी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी सिकंदराबाद येथे दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक गजानन माल्या यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी प्रवासी रेल्वेबाबतच्या अडचणी मांडल्या. नांदेड-औरंगाबाद मार्गावरील शहरांतून अनेक जण औरंगाबाद, नांदेड, परभणी तसेच अन्य शहरांत जात असतात. मात्र कोरोनातील निर्बंधामुळे केवळ फक्त एक्सप्रेस गाड्यांचीच सुविधा रेल्वे प्रशासनातर्फे सुरु करण्यात आली आहे. पॅसेंजर सेवा बंद आहेत. यामुळे या भागातील नागरिकांना मोठ्या आर्थिक संकटातून जावे लागत आहे. एक्सप्रेस रेल्वेत सामान्यांसाठी काही राखीव रेल्वे कोच देण्यात येत होते, मात्र एक किंवा दोन एक्सप्रेस रेल्वे वगळता इतर कोणत्याही रेल्वेत सामान्यांसाठी जनरल डबे ठेवण्यात आलेले नाही. याबाबत काही दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक गजानन माल्या यांनी मुख्य वाहतूक प्रबंधक बी नाग्या यांनाही अवगत केले.

टप्प्या-टप्प्याने सुरु होणार पॅसेंजर

या बैठकीत आगामी आठवड्यात काचीगुडा-मनमाड ही पॅसेंजर पुन्हा सुरु करण्यात येणार असल्याची माहिती बी. नाग्या यांनी दिली. मात्र ही रेल्वे मनमाडपर्यंत धावणार नाही. ती नगरसोलपर्यंतच चालवण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मात्र मनमाडपर्यंत रेल्वे धावणार नसल्याने तिला कितपत प्रतिसाद मिळेल, याबाबतही प्रवासी संघटनेच्या सदस्यांनी साशंकता व्यक्त केली आहे.

कोणत्या रेल्वे सुरु करण्याची मागणी?

प्रवाशांनी नांदेड-मनमात, औरंगााबद-अकोला, नांदेड-औरंगाबाद, अकोट-नांदेड, अकोट-परळी, नांदेड-बिदर, औरंगाबाद-उस्मानाबाद या दरम्यान डेमू लोकल सुरु करण्याची मागणी केली आहे. तसेच औरंगाबाद-नागपूर डेली एक्सप्रेस, नांदेड-बिकानेर, नांदेड-पुणे, कोल्हापूर-नागपूर या रेल्वे सुरु करण्याची मागणीही प्रवाशांनी केली आहे.

इतर बातम्या-

Railway: जनशताब्दी आता हिंगोलीपासून सुरु होणार, परभणीला वगळणार, थेट जालन्याचे स्टेशन

…तर आता रेल्वे त्यांच्या 94 शाळा बंद करणार, जाणून घ्या योजना काय? 

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें