AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अनलॉकच्या पहिल्याच दिवशी नागरिकांची गर्दी, औरंगाबादेत बाजारपेठांच्या रस्त्यावर वाहतूक कोंडी

अनलॉकच्या पहिल्याच दिवशी औरंगाबादकर मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडल्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. (trafick jam aurangabad market)

अनलॉकच्या पहिल्याच दिवशी नागरिकांची गर्दी, औरंगाबादेत बाजारपेठांच्या रस्त्यावर वाहतूक कोंडी
सांकेतिक फोटो
| Edited By: | Updated on: Jun 07, 2021 | 3:54 PM
Share

औरंगाबाद : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे अनलॉक अंतर्गत अनेक निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. अनलॉकच्या नियमांनुसार औरंगाबाद जिल्हा हा तिसऱ्या टप्प्यात असून इथेही काही प्रमाणात नियमांमध्ये सूट देण्यात आली आहे. मात्र, अनलॉकच्या पहिल्याच दिवशी औरंगाबादकर मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडल्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. शहरवासीयांना पहिल्याच दिवशी ट्रॅफिक जॅमचा फटका बसला आहे. शहरात महत्त्वाच्या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे. (people facing trafick jam due to large amount of crowd gathered in Aurangabad market)

नागरिकांची तुफान गर्दी, पैठण गेट परिसरात ट्रॅफिक जॅम

अनलॉक अंतर्गत औरंगाबाद शहरात दुकाने तसेच इतर आस्थापना उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. नव्या नियमांनुसार अत्यावश्यक सेवेची दुकाने सकाळी 7 ते दुपरी 2 वाजेपर्यंत सुरु ठेवता येतील. तसेच इतर दुकाने सोमवार ते शुक्रवारपर्यंत सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरु ठेवता येतील. याच कारणामुळे अनलॉकच्या पहिल्याच दिवशी औरंगाबादमध्ये नागरिक मोठ्या संख्येने घराच्या बाहेर पडले आहेत. गुलमंडी, पैठण गेट परिसरात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. गर्दीमुळे शहरातील बाजारपेठांमध्ये वाहतूक कोंडी झाली आहे.

बाजारपेठेतील रस्ते ट्रॅफिक जॅममुळे ठप्प

राज्य सरकारने अनलॉक केल्यामुळे औरंगाबादेत नागरिक खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात बाहेर पडले आहेत. त्यामुळे शहरामध्ये तुफान गर्दी उसळली आहे. गुलमंडी, पैठण गेट परिसरातील बाजारपेठांमध्ये सर्व महत्त्वाचे रस्ते ट्रॅफिकमुळे जॅम झाले आहेत.

तिसऱ्या टप्प्यात कोणते जिल्हे

  • मुंबई उपनगर, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, अकोला, अमरावती, बीड, भंडारा, गडचिरोली, उस्मानाबाद, पालघर, परभणी, सोलापूर, वर्धा, वाशिम

तिसऱ्या टप्प्यात काय सुरु राहील? 

>>> अत्यावश्यक दुकाने सकाळी ७ ते २ आणि इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते २ सर्व खुले राहतील

माॅल्स थिएटर्स सर्व बंद राहतील

>>> सोमवार ते शुक्रवार हाॅटेल्स ५० टक्के खुले दुपारी २ पर्संत खुले राहतील त्यानंतर पार्सल व्यवस्था असेल, शनिवार रविवार बंद राहतील

>>> लोकल रेल्वे बंद राहतील

>>> मॉर्निंक वाॅक, मैदाने , सायकलिंग पहाटे ५ ते सकाळी ९ मुभा

>>> ५० टक्के खासगी आणि शासकीय कार्यालय सुरू

>>> आऊटडोअर क्रीडा सकाळी ५ ते ९ सुरू सोमवार ते शुक्रवार ,

>>> स्टुडियोत चित्रीकरण परवानगी सोमवार ते शनिवार करता येईल

>>> मनोरंजन कार्यक्रम ५० टक्के दुपारी २ पर्संत खुले असणार सोमवार ते शुक्रवार

>>> लग्नसोहळ् ५० टक्के क्षमतेने तर अंत्यविधी २० लोक मुभा असतील

>>> बांधकाम दुपारी दोन पर्संत मुभा

>>> कृषी सर्व कामे मुभा

>>> ई काॅम्रस दुपारी २ पर्संत

>>> जमावबंदी \ संचारबंदी कायम राहील

दरम्यान, अनलॉक केलेले असले तरी कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नाही. अजूनही मास्क, सोशल डिस्टन्सिंगसारखे नियम पाळणे गरजेचे आहे. नागरिकांनी घराच्या बाहेर पडताना या गोष्टी पाळाव्यात असे आवर्जून सांगण्यात येत आहे.

इतर बातम्या :

औरंगाबादमध्ये हत्यांचं सत्र, 15 दिवसांत धारदार शस्त्रांनी 6 हत्या, गुन्हेगारांचा पोलिसांना आव्हान देण्याचा प्रयत्न!

गोपीनाथ मुंडेंच्या कन्येनं ‘ते’ विधान करावं हे अत्यंत दुर्देवी: सुनील केदार

विनवणी करुनही पेट्रोल नाकारलं, तब्बल तासभर मृतदेह रुग्णवाहिकेत पडून, औरंगाबादेतील संतपाजनक प्रकार

(people facing trafick jam due to large amount of crowd gathered in Aurangabad market)

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...