AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज ठाकरे म्हणतात, राष्ट्रवादीच्या उदयानंतर जातीवाद फोफावला; प्रविण दरेकरांनी दोनच शब्दात दिलं उत्तर

राष्ट्रवादीच्या उदयानंतर राज्यात जातीयवाद फोफावला असं विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं होतं. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी त्यावर दोनच शब्दात उत्तर दिलं आहे. (pravin darekar)

राज ठाकरे म्हणतात, राष्ट्रवादीच्या उदयानंतर जातीवाद फोफावला; प्रविण दरेकरांनी दोनच शब्दात दिलं उत्तर
pravin darekar
| Edited By: | Updated on: Aug 21, 2021 | 1:38 PM
Share

औरंगाबाद: राष्ट्रवादीच्या उदयानंतर राज्यात जातीयवाद फोफावला असं विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं होतं. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी त्यावर दोनच शब्दात उत्तर दिलं आहे. राज ठाकरे यांचं म्हणणं पूर्णपणे सत्य आहे, असं प्रविण दरेकर यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आधीच मनसे आणि राष्ट्रवादीत जुंपलेली असताना त्यात दरेकरांची एन्ट्री झाल्याने पुन्हा एकदा हा वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (pravin darekar support to raj thackeray over his comment on ncp)

प्रविण दरेकर यांनी टीव्ही9 मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. भाजपच्या यात्रांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय. वातावरण भाजपमय झालेलं आहे. राज्यातील आघाडी सरकार भांबावलेलं आहे. त्यामुळे लोक नाराज आहेत. संतापलेले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा भाजपला प्रतिसाद मिळत आहे, असा दावा दरेकर यांनी केला आहे.

आमच्याचवेळी करोना कसा असतो?

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबतही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. दुसऱ्यांकडे बोट दाखवताना स्वतःखाली काय जळतंय हे यांना दिसत नाही का?, असा सवाल करतानाच हे जेव्हा कार्यक्रम घेतात तेव्हा कोरोना नसतो. नेमका आमच्या वेळी कोरोना होतो का?, असा सवालही त्यांनी केला. जन आशीर्वाद यात्रेला प्रतिसाद मिळत असल्यामुळे आघाडी भयभीत झाली आहे. त्यामुळे हे आरोप होत आहेत, असा दावाही त्यांनी केला.

24 तास निवडणुकांसाठी तयार

एका प्रश्नावर उत्तर देताना दरेकर यांनी भाजप 24 तास निवडणुकांना समोर जायला तयार असल्याचं स्पष्ट केलं. मनसेसोबत युती करण्याबाबत कुठलाही प्रस्ताव आलेला नाही. तसा विचारही नाही. भाजपसोबत मनसे पदाधिकारी येत असतील तर ती महाराष्ट्राच्या हिताची बाब आहे. मनसे जबाबदार पक्ष आहे, त्यामुळे ही बाब स्वागतार्ह आहे, असं ते म्हणाले.

हा भाजप-सेना संघर्ष

आपल्याला काही जमत नसलं की केंद्राकडे बोट दाखवण्याचं काम आघाडी करत आहे. हा संघर्ष राणे आणि सेना नाही तर हा संघर्ष भाजप आणि सेना आहे. राणे आणि सेना असा संघर्ष रंगवण्याचं काम करू नये, असंही ते एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले. (pravin darekar support to raj thackeray over his comment on ncp)

संबंधित बातम्या:

राज ठाकरे म्हणतात, राज्यातील जातीय द्वेषाला राष्ट्रवादी जबाबदार; रोहित पवारांनी पहिल्यांदाच दिलं जोरदार प्रत्युत्तर

मनसेकडून अमोल मिटकरींना श्वान आणि बिस्किट भेट; आंदोलनाचाही इशारा

उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षांच्या बैठकीत सोनिया गांधींना काय सांगितलं?; राऊतांनी केला गौप्यस्फोट!

(pravin darekar support to raj thackeray over his comment on ncp)

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.