AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शाळेची फी भरलेल्यांना हिरवे कार्ड, अन्यथा रेड कार्ड, विद्यार्थ्यांत चक्क भेदभाव? औरंगाबादच्या जैन इंटरनॅशनल स्कूलचा प्रताप

शहरातील शहानूरमिया दर्गा परिसरातील जैन इंटरनॅशनल स्कूलने शैक्षणिक शुल्क न भारल्यामुळे काही विद्यार्थ्यांना बुधवारी गेटवरच रोखले. शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांना शाळेने रेड कार्ड दिले आहे. अशा भेदभावामुळे पालकांमध्ये प्रचंड संताप आहे.

शाळेची फी भरलेल्यांना हिरवे कार्ड, अन्यथा रेड कार्ड, विद्यार्थ्यांत चक्क भेदभाव? औरंगाबादच्या जैन इंटरनॅशनल स्कूलचा प्रताप
फी न भरलेल्या विद्यार्थ्यांना शाळा प्रशासनाने रोखले
| Edited By: | Updated on: Dec 23, 2021 | 11:47 AM
Share

 औरंगाबादः जवळपास दोन वर्षांनंतर शहरातील पहिली ते सातवीचे वर्ग ऑफलाइन पद्धतीने सुरु झाले आहेत. मात्र विद्यार्थी शाळेत येऊ लागताच शाळा आणि पालकांमध्ये शुल्कावरून वाद सुरु झालेले दिसून येत आहेत. शहरातील शहानूरमिया दर्गा परिसरातील जैन इंटरनॅशनल स्कूलने (Jain International School) शैक्षणिक शुल्क न भारल्यामुळे काही विद्यार्थ्यांना बुधवारी गेटवरच रोखले. शाळा व्यवस्थापनाने अशी कारवाई केल्यामुळे पालकही आक्रमक झाले. ऐनवेळी पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर शाळेने नरमाईचे धोरण स्वीकारले आणि विद्यार्थ्यांना आता प्रवेश दिला.

काय आहे नेमकं प्रकरण?

ऑनलाइन पद्धतीने शाळा सुरु असल्यामुळे शुल्कात सवलत द्यावी, अशी पालकांची मागणी आहे. मात्र शाळा व्यवस्थापन शुल्क रचनेवर ठाम होते. हे प्रकरण न्यायालयातही गेले होते. 16 जुलै रोजीच्या निर्णयानुसार, जैन इंटरनॅशनल स्कूलला शुल्क रचना ठरवून दिली आहे. विभागीय शुल्क नियमन समितीकडे प्रकरण प्रलंबित असेपर्यंत चालू शैक्षणिक वर्षासाठी 1 ली ते 8 वीच्या विद्यार्थ्यांकडून 35 हजार आणि 8 ते 10 वी च्या विद्यार्थ्यांकडून 38 हजार रुपये शुल्क घेण्याचे आदेश खंडपीठाने दिले होते. मात्र शाळा प्रशासन अतिरिक्त शुल्काची मागणी करीत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.

शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांना रेड कार्ड

दरम्यान, शाळेने शुल्क भरलेल्या विद्यार्थ्यांनुसार, त्यांना पांढरे, हिरवे, पिवळे, लाल या रंगाचे कार्ड दिले आहे. लाल कार्ड मिळालेल्या सुमारे 70 विद्यार्थ्यांना बुधवारी प्रवेश नाकारण्यात आला. त्यामुळे पालक संतप्त झाले. अशा विविध रंगाचे कार्ड देऊन शाळा व्यवस्थापन भेदभाव निर्माण करीत असल्याचा आरोप पालकांनी केला. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर हा वाद शमला. विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यात आला.

पालक संघटना आक्रमक, शाळेवर कारवाईची मागणी

शाळा व्यवस्थापनावर कारवाई करण्याची मागणी काही पालकांनी केली. यासाठी त्यांची शिक्षणाधिकाऱ्यांची भेटही घेतली. खंडपीठाच्या आदेशाची अवहेलना केल्या प्रकरणी जैन इंटरनॅशनल स्कूलविरुद्ध अवमान याचिका दाखल करण्यात येणार असून, राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाकडे तक्रार दाखल करणार असल्याचे पॅरेंट्स अॅक्शन कमिटीचे अध्यक्ष उदयकुमार सोनोने यांनी सांगितले.

इतर बातम्या-

धर्मेंद्रंना सोशल मीडियावर मागावी लागली चाहत्यांची माफी! जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

माझा बाप काढून आव्हाडांना काय मिळणार?; चंद्रकांत पाटलांचा पलटवार

निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ
निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ.
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा.
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे.
निवडणुकीसाठी मुंबईतलं युती अन् आघाड्यांचे चित्र स्पष्ट! कोण कोणासोबत?
निवडणुकीसाठी मुंबईतलं युती अन् आघाड्यांचे चित्र स्पष्ट! कोण कोणासोबत?.
ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल, बंडखोरी रोखण्याचं मोठं चॅलेंज
ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल, बंडखोरी रोखण्याचं मोठं चॅलेंज.
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.