“संजय राऊत म्हणजे कलियुगातील शकुनी मामा”; अयोध्येच्या दौऱ्यानंतर शिवसेनेने राऊतांना घेरले…

लोकांना कन्फ्युज करण्याचा आणि कॅमेऱ्यासमोर येण्यासाठी संजय राऊत टीका करण्याची आणि काहीही सांगण्याची स्टंटबाजी करतात असा टोलाही लगावला आहे.

संजय राऊत म्हणजे कलियुगातील शकुनी मामा; अयोध्येच्या दौऱ्यानंतर शिवसेनेने राऊतांना घेरले...
Follow us
| Updated on: Apr 10, 2023 | 4:19 PM

छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि काही आमदार अयोध्या दौऱ्यावर गेल्यानंतर विरोधकांकडून त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला. खासदार संजय राऊत, आदित्य ठाकरे, चंद्रकांत खैरे यांनी या दौऱ्यावरून शिंदे गटावर सडकून टीका केली होती. त्या नंतर आता विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना सत्ताधारी गटातील आमदारानीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. कालच्या दौऱ्याविषयी बोलताना आमदार संजय शिरसाठ यांनी सांगितले की, काल ज्या पद्धतीने आमचे उत्स्फूर्त स्वागत झाले तसे स्वागत आतापर्यंत अयोध्येमध्ये कुणाचेच झाले नाही.

उद्धव ठाकरे यांच्यासोबत आम्ही गेलो होतो त्यावेळेस पण असे स्वागत झाले नव्हते ज्या पद्धतीने आमचे स्वागत झाले. त्यामुळे संजय राऊत यांची पोटदुखी वाढली असल्याचा घणाघात शिरसाठ यांनी संजय राऊत यांच्यावर केला आहे.

अयोध्येमध्ये मंदिरापर्यंत जायला आम्हा आमदारांना दोन तास लागले. त्यामुळे तेथे आलेले लोक हे स्वयंस्फूर्तीने आले होते.

लोकांच्या ज्या धार्मिक भावना आहेत. त्यावर टीका करण्याचे काम संजय राऊतसारखा पापी माणूस करतो अशी टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

आमदार संजय शिरसाठ यांनी संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली आहे. ते म्हणाले की, संजय राऊत म्हणजे कलियुगातील शकुनीमामा आहे.

संजय राऊत हे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांना हिंदुत्वापासून दूर करायचे काम करत असल्याचे सांगत त्यांना हिंदुत्वावरून छेडण्याचा प्रयत्न केला आहे.

संजय शिरसाठ यांनी बाळासाहेब ठाकरे यांची आठवण सांगताना त्यांनी बाबरी मशिदीची आठवण करून दिली. यावेळी ते म्हणाले की, शिवसेनाप्रमुखांनी म्हटले होते की, बाबरीचा ढाच्या माझ्या शिवसैनिकांनी पाडला असेल, तर आम्हाला त्याचा अभिमान आहे असे म्हणणारे शिवसेनाप्रमुख.

आणि आता रामाच्या यात्रेवर आम्ही गेलो यावर टीका करणारे संजय राऊत हा विरोधाभास आहे आणि आम्ही याला महत्त्व देत नाहीत अशी टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

आम्ही कोणा सोबत घेऊन गेलो याचा अभ्यास आधी संजय राऊत यांनी करावा,मात्र तुम्ही मातोश्रीवर कुणाला घेऊन गेला हे जर आम्ही काढले तर तुम्हाला पळता भूई थोडी होईल असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला.

आमदारांच्या नाराजीच्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, आमच्यात कोणीही नाराज नाही तुम्हाला कोणी आमचा आमदार भेटला का. त्यामुळे आमच्या आमदारांवर बोलण्यापेक्षा तुमच्याकडे जे आमदार आहेत त्यांना आधी तुम्ही सांभाळा राहिलेल्या 14 आमदारांपैकी किती आमदार तुमच्या मातोश्रीकडे येतात? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.संजय राऊक यांच्या टीकेवरूनही संजय शिरसाठ यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

लोकांना कन्फ्युज करण्याचा आणि कॅमेऱ्यासमोर येण्यासाठी संजय राऊत टीका करण्याची आणि काहीही सांगण्याची स्टंटबाजी करतात असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.