कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांचा सर्व्हे करून तातडीने मदत द्या; जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

कोरोना महामारीच्या काळात जिल्ह्यात ज्या बालकांचे पालक कोरोनाने दगावले आहेत अशा बालकांचे सर्व्हेक्षण करा. तसेच या बालकांना शासन निर्देशानुसार तातडीने मदत करा, असे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिले आहेत. (ravindra binwade)

कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांचा सर्व्हे करून तातडीने मदत द्या; जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
ravindra binwade

जालना: कोरोना महामारीच्या काळात जिल्ह्यात ज्या बालकांचे पालक कोरोनाने दगावले आहेत अशा बालकांचे सर्व्हेक्षण करा. तसेच या बालकांना शासन निर्देशानुसार तातडीने मदत करा, असे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिले आहेत. (survey children who lost single parent to COVID-19, says ravindra binwade)

कोवीड-19 च्या पार्श्वभूमीवर बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय कृती दलाची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी हे आदेश दिले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी नितीन नार्वेकर, जिल्हा कार्यक्रम अधिकारी संगिता लोंढे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे पारवे, जिल्हा रुग्णालयाच्या मुळे, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी गजानन इंगळे, अमोल राठोड यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पथक तयार करण्याचे आदेश

कोरोना महामारीच्या काळात जिल्ह्यात ज्या बालकांचे पालक कोरोनामुळे दगावले आहेत अशा बालकांना बाल संगोपन योजनेंतर्गत मदत मिळावी म्हणून कृतीदलाची (टास्क फोर्स)ची स्थापना करण्यात आली आहे. जालना जिल्ह्यातील अशा बालकांना तातडीने मदत उपलब्ध करून द्या. कोरोनामुळे पालक गमावलेले जे बालक आपल्या नातेवाईकांकडे राहत असतील अशा बालकांचा सांभाळ योग्यरितीने होतो किंवा नाही याबाबत खात्री करून घ्या. त्यासाठी पथक तयार करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी बिनवडे यांनी दिले.

बालकांचे शोषण, तस्करी होणार नाही याची काळजी घ्या

कोरोनाने ज्या बालकांचे दोन्ही पालक अथवा एक पालकाचे निधन झाले असेल अशा बालकांना सर्वोतोपरी संरक्षण द्या. अशी बालके शोषणास बळी पडणार नाहीत किंवा बालकामगार अथवा तस्करी सारख्या गुन्हेगारीमध्ये सापडणार नाहीत याची दक्षता घ्या. पालकत्व गमावलेल्या बालकांना त्यांचे कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यासाठी आवश्यकतेनुसार न्यायिक सल्ला व इतर सुविधा उपलब्ध करून द्या. तसेच या बालकांचे आर्थिक व मालमत्ता विषयक हक्क अबाधित राहतील याकरिता दक्षता घेण्याच्या सुचनाही त्यांनी केल्या.

100 बालकांनी गमावले छत्र

जालन्यात कोरोनामुळे एक पालक गमावलेल्या बालकांची संख्या 97 आहे. तर दोनही पालक गमावलेल्या बालकांची संख्या 03 आहे. या बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यासाठी कार्यवाही सुरू करण्यात आली असल्याची माहिती संगिता लोंढे यांनी दिली आहे.

बालकाच्या काळजी व संरक्षणासाठी हेल्पलाईन

>> चाईल्ड हेल्पलाईन क्र. – 1098
>> महिला व बालविकास विभाग मदत क्रमांक- 8308992222, 7400015518
>> बालकल्याण समिती जालना- 9890841439
>> अधीक्षक, शासकीय मुलांचे निरीक्षणगृह व बालगृह- 9404000405
>> जिल्हा बाल संरक्षण अधिकारी- 7972887043, 8830507008
>> जिल्हा महिला व बालकविकास अधिकारी कार्यालय- 02482-224711 (survey children who lost single parent to COVID-19, says ravindra binwade)

 

संबंधित बातम्या:

आता लसीकरण केंद्रावर येण्याची गरज नाही?, घरोघरी होणार लसीकरण; लाभ कुणाला?, वाचा सविस्तर!

Maharashtra Coronavirus LIVE Update : पुण्यात दिवसभरात 331 नव्या कोरोना रुग्णांची वाढ, 459 रुग्णांना डिस्चार्ज  

Video | तहसीलदाराची शेतकऱ्याला शिवीगाळ, लायकी काढत हाकलून देण्याची धमकी, नागरिकांत संताप

(survey children who lost single parent to COVID-19, says ravindra binwade)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI