Video | तहसीलदाराची शेतकऱ्याला शिवीगाळ, लायकी काढत हाकलून देण्याची धमकी, नागरिकांत संताप

औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथील तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी एका शेतकऱ्याला दमदाटी तसेच शिवीगाळ केली आहे. तसेच या शेतकऱ्याची लायकी काढत त्याला हाकलून देण्याची धमकीसुद्धा दिली आहे.

Video | तहसीलदाराची शेतकऱ्याला शिवीगाळ, लायकी काढत हाकलून देण्याची धमकी, नागरिकांत संताप
AURANGABAD TAHSILDAR


औरंगाबाद : असं म्हणतात की सरकारी अधिकारी हा सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी नियुक्त केलेला असतो. नागरिकांच्या अडचणी, त्यांची संबंधित शासकीय कामे नियोजित वेळेत पार पडावीत म्हणून सरकारी नोकरदारांनी काम करायचे असते. मात्र, औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथील तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी एका शेतकऱ्याला दमदाटी तसेच शिवीगाळ केली आहे. तसेच या शेतकऱ्याची लायकी काढत त्याला हाकलून देण्याची धमकीसुद्धा दिली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या समोर आला असून लोक तीव्र संताप व्यक्त करत आहेत. (Tahsildar behaved abusively and threatened farmer in Paithan Aurangabad video goes viral)

नेमका प्रकार काय ?

मिळालेल्या माहितीनुसार पैठण तालुक्यातील एक शेतकरी रस्ता मोकळा करुन देण्यात यावा अशी मागणी पैठणच्या तहसीलदारांकडे करत होता. या शेतकऱ्याने आपली व्यथा तहसीलदारांना समजाऊन सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतर क्षुल्लक कारणावरुन तहसीलदारांने शेतकऱ्याला दमदाटी करण्यास सुरुवात केली. तसेच तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी ऑफिसमध्येच मोठ्या आवाजात बोलणे सुरु केले. त्यांनी शेतकऱ्याला शिवीगाळ करत त्याची लायकीही विचारली. एवढेच नव्हे तर शेळके या तहसीलदारांनी शेतकऱ्याला शिव्या घालून हाकलून देण्याचीही धमकी दिली. तहसीलदारांनी शेतकऱ्याला नालायक म्हणत शिवीगाळ केली आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ समोर आल्यामुळे नागरिकांत संताप

दरम्यान हा प्रकार समोर आल्यानंतर लोक चांगलेच संतापले आहे. सरकारी खुर्चीवर बसलेल्या एका अधिकाऱ्याने अशा प्रकारे अर्वाच्य भाषेत बोलणे चुकीचे असून हे निषेधार्ह असल्याचा सूर पैठणच्या नागरिकांमध्ये आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर लोक मोठ्या प्रमाणात व्यक्त होत असून चंद्रकांत शेळके या तहसीलदारांवर चांगलेच संतापले आहेत. हा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.

इतर बातम्या :

Video : पावसाचं रौद्ररुप, नदीला पूर, दोन तरुण दुचाकीसह पुरात वाहून गेले, पण…..

औरंगाबादेत म्युकरमायकोसिसवरील उपचारासाठी स्वतंत्र वॉर्ड, महागड्या इंजेक्शनसह सर्व औषधी मोफत

“कोचिंंग क्लासेस सुरु करण्यास परवानगी द्या” काळे कपडे घालून औरंगाबादेत शिक्षक, मालकांचे आंदोलन

(Tahsildar behaved abusively and threatened farmer in Paithan Aurangabad video goes viral)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI