“कोचिंंग क्लासेस सुरु करण्यास परवानगी द्या” काळे कपडे घालून औरंगाबादेत शिक्षक, मालकांचे आंदोलन

खासगी शिकवण्या सुरु करण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. त्यासाठी आज (10 जून) औरंगाबादेत आंदोलन करण्यात आले. यावेळी खासगी शिवकण्यांचे चालक, मालक आणि शिक्षक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

कोचिंंग क्लासेस सुरु करण्यास परवानगी द्या काळे कपडे घालून औरंगाबादेत शिक्षक, मालकांचे आंदोलन
AURANGABAD COACHING CLASSES
Follow us
| Updated on: Jun 10, 2021 | 5:34 PM

औरंगाबाद : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकट काहीसे कमी झाले आहे. रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे आता निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. दुकाने तसेच आस्थापना सुरु ठेवण्याची वेळ वाढवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आता खासगी शिकवण्या सुरु करण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. त्यासाठी आज (10 जून) औरंगाबादेत आंदोलन करण्यात आले. यावेळी खासगी शिवकण्यांचे चालक, मालक आणि शिक्षक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. (teachers owners of private coaching classes from Aurangabad demanded allow to start coaching classes protested in Kranti Chauk)

औरंगाबादेत क्रांती चौक येथे आंदोलन

कोरोनाची दुसरी लाट सरली आहे. रुग्ण कमी झाले आहेत. त्यामुळे राज्याचे अर्थकारण पूर्वपदावर येत आहे. या पार्श्वभूमीवर खासगी कोचिंग क्लासेस ( खासगी शिकवण्या) सुरु करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे. त्यासाठी आज औरंगाबादमधील क्रांती चौक येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी काळे कपडे तसेच काळे मास्क घालून आंदोलन केले. मागील एका वर्षापासून सर्व खासगी शिकवण्या बंद आहेत. त्यामुळे आतातरी या शिकवण्या सुरु करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी या आंदोलकांनी केली.

वर्षभरापासून कोचिंग क्लासेस बंद

मागील काही महिन्यांपासून राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला होता. रोज हजारो नव्या रुग्णांची नोंद होत होती. तर कित्येक रुग्णांचा योग्य उपचाराअभावी मृत्यू होत होता. याच कारणामुळे राज्य सरकारने संपूर्ण राज्यभर कोरोना प्रतिबंधक नियम लागू केले होते. आता निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र, असे असले तरी राज्यातील सर्व महाविद्यालये तसेच शाळा अजूनही बंदच आहेत. त्यामुळे कोचिंग क्लासेसही बंदच आहेत. मात्र, आता रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे कोचिंग क्लासेस सुरु करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी केली जात आहे.

दरम्यान, औरंगाबादेत करण्यात आलेल्या आजच्या आंदोलनात विविध कोचिंग क्लासेसचे शेकडो मालक, चाकल तसेच शिक्षक उपस्थित होते. आंदोलकांनी यावेळी सरकारविरोधी घोषणा दिल्या. तसेच आपल्या मागण्यांचे फलक घेऊन आपला रोष व्यक्त केला.

इतर बातम्या :

औरंगाबादेतील ‘म्हाडा’च्या 864 घरांची लॉटरी, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूरसाठी आव्हाडांची राज्य सरकारकडे मागणी

औरंगाबाद जिल्ह्यात तुफान पाऊस, जुई नदीला पूर, पूल वाहून गेल्यामुळे वाहतूक ठप्प

25 सेकंदांचा थरार, 18 वर्षांचा तरुण चेंबरमध्ये पडला, पुढे काय घडलं ?

(teachers owners of private coaching classes from Aurangabad demanded allow to start coaching classes protested in Kranti Chauk)

Non Stop LIVE Update
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.
भाजपचे शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकारी देणार भाजपचा देणार राजीनामा
भाजपचे शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकारी देणार भाजपचा देणार राजीनामा.
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल.
अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा
अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा.
मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला, 4 अज्ञात इसम आले अन
मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला, 4 अज्ञात इसम आले अन.