Video : पावसाचं रौद्ररुप, नदीला पूर, दोन तरुण दुचाकीसह पुरात वाहून गेले, पण…..

फुलंब्री तालुक्यातील पानवडोद गावातील दोन तरुण दुचाकीसह पुरात गेले वाहून गेले. तुफान आलेल्या पुरात नदीच्या पुलावरुन दुचाकी घालणे तरुणांना चांगलंच महागात पडलं. मात्र सुदैवाने वाहून जाणाऱ्या दोन्ही तरुणांचे प्राण वाचले आहेत. (Two young man with bike was swept away Flood Water in Fulambri Aurangabad)

Video : पावसाचं रौद्ररुप, नदीला पूर, दोन तरुण दुचाकीसह पुरात वाहून गेले, पण.....
फुलंब्री तालुक्यातील फुलमस्ता नदीच्या पुलावर ही धक्कादायक घटना घडली. तुफान आलेल्या पुरात नदीच्या पुलावरुन दुचाकी घालणं तरुणांना महागात पडलं.


औरंगाबाद : जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडतोय. त्यात फुलंब्री तालुक्यात पावसाचा कहर पाहायला मिळतोय. फुलंब्री तालुक्यातील पानवडोद गावातील दोन तरुण दुचाकीसह पुरात गेले वाहून गेले. तुफान आलेल्या पुरात नदीच्या पुलावरुन दुचाकी घालणे तरुणांना चांगलंच महागात पडलं. मात्र सुदैवाने वाहून जाणाऱ्या दोन्ही तरुणांचे प्राण वाचले आहेत. (Two young man with bike was swept away Flood Water in Fulambri Aurangabad)

जसं औरंगाबादमध्ये मान्सूनचं आगमन झालंय तसा शहर आणि ग्रामीण भागात पावसाचा जोर चांगला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्याच्या शहर आणि ग्रामीण भागांत पाऊस चांगलाच बरसतोय. त्यामुळे छोट्या छोट्या ओढा-नदी-नाल्यांना पूर आलेला पाहायला मिळतोय. फुलंब्री तालुक्यातील फुलमस्ता नदीच्या पुलावर ही धक्कादायक घटना घडली. तुफान आलेल्या पुरात नदीच्या पुलावरुन दुचाकी घालणं तरुणांना महागात पडलं.

नदीला पूर आलेला दिसतोय. पाण्याचा वेग आणि पातळी मोठी होती. मात्र तरुणांनी आगाऊपणा म्हणा किंवा अतिआत्मविश्वासाने म्हणा नदीच्या पुलावर गाडी घातली. मात्र पाण्याला वेग जास्त असल्याने तरुण दुचाकीसह तरुण पुराच्या पाण्यात वाहून गेले. मात्र त्या दोन तरुणांचे सुदैवाने प्राण बचावले. दुचाकीसह तरुण पुराच्या पाण्यात वाहून जातानाचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.

(Two young man with bike was swept away Flood Water in Fulambri Aurangabad)

पाहा व्हिडीओ :

हे ही वाचा :

परभणी शहरासह बहुतांश तालुक्यात जोरदार पाऊस, पुढील चार दिवसांत मराठवाड्यात अतिवृष्टीची शक्यता

Malad Building Collapsed | मुंबईतील मालाड भागात इमारत कोसळली, 11 जणांचा मृत्यू, 8 जण गंभीर

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI