Aurangabad Electricity: वीजबिलाची तक्रार कुठे कराल? वेबपोर्टलवर आणखी कोणत्या आहेत सुविधा?

MSEDCL ने वेब सेल्फ सर्व्हिस अर्थात (WSS) अशी सेवा उपलब्ध करून दिली आहे. https://wss.mahadiscom.in/wss/wss वेबसाइटवरून अनेक प्रकारचे ऑनलाइन कंझ्युमर नंबर्स मिळतात.

Aurangabad Electricity: वीजबिलाची तक्रार कुठे कराल?  वेबपोर्टलवर आणखी कोणत्या आहेत सुविधा?
संग्रहित छायाचित्र
Follow us
| Updated on: Aug 29, 2021 | 7:03 PM

औरंगाबाद: अनेकदा घरात वीजेच्या उपकरणांचा मर्यादित वापर करूनही भरभक्कम वीजबिल येतं, तेव्हा ग्राहकांना काय करावे समजत नाही. तक्रार कुठे आणि कशी करायची, त्यासाठी किती वेळ लागू शकतो, हे ही माहिती नाही. या कारणांमुळे जेवढं बिल आलंय, तेवढं भरून आपण कामाला लागतो. पण महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने (Maharashtra state electricity distribution co. Ltd.- Mahavitaran  ) ग्राहकांना थेट तक्रार करण्याची सोपी प्रक्रिया उपलब्ध करून दिली आहे. फक्त संबंधित पोर्टलपर्यंत आपण पोहोचणं आवश्यक आहे.

कोणत्या वेबसाइटवर तक्रार कराल?

MSEDCL ने वेब सेल्फ सर्व्हिस अर्थात (WSS) अशी सेवा उपलब्ध करून दिली आहे.  https://wss.mahadiscom.in/wss/wss वेबसाइटवरून अनेक प्रकारचे ऑनलाइन कंझ्युमर नंबर्स मिळतात तसेच इतरही सेवा मिळतात. एकदा इथे नोंदणी केल्यावर तुम्हाला बिल भरता येते, तक्रारही दाखल करता येते. त्यामुळे महावितरण कंपनीने सर्व ग्राहकांना या पोर्टलवर आपले खाते उघडण्याची विनंती केली आहे. या वेबसाइटवर वरील बाजूस डावीकडे New User Registration येथे नवी सदस्यता नोंदणी करता येईल. यशस्वीरित्या नोंदणी केल्यानंतर तुमच्या प्रोफाइल ईमेलवर एक मेल केला जाईल आणि त्यातील लिंकवरून पुढील सेवा घेता येईल.

कोणत्या सेवा मिळू शकतील?

वेबसाइटवर लॉग इन केल्यानंतर My Account ऑप्शनद्वारे तुम्ही बिल भरू शकता. तसेच पूर्वीची बिलं आणि त्यांचा तपशील डाऊनलोड करू शकता. तसेच Payment History Screen द्वारे तुमच्या पेमेंटचा ट्रेंडही पाहू शकता. MSEDCL च्या बिलिंग सिस्टिमवर नोंदणी करण्यात आलेली तुमची माहितीही पाहू शकता. तसेच ऑनलाइन पेमेंट करण्यासाठीच्या सर्व प्रश्नांची उत्तरं Online payment FAQ या लिंकवर मिळतील. एखाद्या वीजेचे उपकरण किती तास वापरल्यानंतर त्याचे किती बिल येऊ शकते, यासंबंधी माहिती काढण्याची सोयही वेबसाइटवर उपलब्ध आहे. Consumption Calculator द्वारे आपल्याला हे गणित करता येते.

मीटरचे रीडिंग आपणच अपलोड करा

आपल्या मीटरचे रीडिंग आपणच अपलोड करण्याची सुविधाही या वेबसाइटवर आहे. त्यानुसार आपले बिल योग्य प्रकारे येते की नाही, हे तपासता येईल. तसेच वीज मीटर किंवा बिलासंबंधी दाखल केलेल्या तक्रारीची सद्यस्थिती काय आहे, हेदेखील यावर पाहता येते. तसेच नवी वीज मीटरची जोडणी घ्यायची असेल तर त्याची विनंतीदेखील या वेबपोर्टलवरून करता येते. फक्त त्या करिता आवश्यक ती कागदपत्र आपल्याला अपलोड करावी लागतात.

वेबसाइटवर कस्टमर केअर नंबरही

ऑनलाइन अर्जासंबंधी काही चौकशी करायची असल्यास या पोर्टलवर आपल्याला कस्टमर केअर नंबरही मिळतात. या 1912,1800-233-3435, 1800-102-3435 या क्रमांकांचा समावेश आहे.  तसेच   customercare@mahadiscom.in या मेलवर आपण थेट तक्रार दाखल करू शकतो. (Where we can raise complaint for electricity bill, MSEDCL, Maharashtra)

इतर बातम्या 

थकित वीजबिल द्या, 71 लाख ग्राहकांना महावितरणची नोटीस, वीज कनेक्शन कापण्याचा धडाका

केंद्राचं नवे इलेक्ट्रिक विधेयक MSEB सारख्या कंपन्यांसाठी धोक्याची घंटा : संजय राऊत

Non Stop LIVE Update
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.