AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“हा एन्काऊंटर, हा मर्डरच”, हायकोर्टाच्या आदेशानंतर अक्षय शिंदेचे वकील काय म्हणाले?

अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना जबाबदार धरलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाने, पाच पोलिसांना दोषी ठरवलं आहे. आता याप्रकरणावरुन अक्षय शिंदेचे वकील अमित कटारनवरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हा एन्काऊंटर, हा मर्डरच, हायकोर्टाच्या आदेशानंतर अक्षय शिंदेचे वकील काय म्हणाले?
akshay shinde lawyer Amit Katarnavare
| Updated on: Jan 20, 2025 | 1:58 PM
Share

Akshay Shinde Encounter : बदलापूरमधील एका शाळेत दोन चिमुकल्या मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. १२ व १३ ऑगस्ट रोजी ही घटना घडली. या घटनेनंतर बदलापूरकर रस्त्यावर उतरले. या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला अटक करण्यात आली. यानंतर अक्षय शिंदेंचा एन्काऊंटर करण्यात आला होता. आता याप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना जबाबदार धरलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाने, पाच पोलिसांना दोषी ठरवलं आहे. त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. आता याप्रकरणावरुन अक्षय शिंदेचे वकील अमित कटारनवरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अमित कटारनवरे यांनी नुकतंच टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अक्षय शिंदेचा फेक एन्काऊंटर झालं असून ही मर्डरच आहे, असा आरोप केला आहे. आता सरकारच्या वकिलांनी सबमिशन केलंय की यात एफआयआर झालं पाहिजे, अशी मागणीही अमित कटारनवरे यांनी केली.

“आम्ही क्रिमिनल रिटपिटीशन दाखल केली होती. त्यात आम्ही हा फेक एन्काऊंटर असून मर्डर आहे, असा दावा केला होता. गुन्हा दाखल करण्याची आणि कोर्टाच्या निगराणीखाली तपास होण्याची मागणी केली होती. त्यानंतर सरकारने स्टँड घेतला की, जोपर्यंत कस्टोडियल डेटची एन्क्वायरी करणारे न्यायदंडाधिकाऱ्यांचा रिपोर्ट येत नाही, तोपर्यंत आम्ही पुढील स्टेप घेणार नाही, असा स्टँडच सरकारचा होता. आज न्यायदंडाधिकाऱ्यांनी जो फायनल रिपोर्ट दिला, त्यात फेक एन्काऊंटर झालं असून ही मर्डरच आहे. आता सरकारच्या वकिलांनी सबमिशन केलंय की यात एफआयआर झालं पाहिजे”, असे अमित कटारनवरे यांनी म्हटले.

बंदुकीवर फिंगरप्रिंट नाही – अमित कटारनवरे यांची माहिती

“आता पुढचा काय निर्णय होतो याकडे आम्ही लक्ष ठेवून आहे. एफआयआर होतोय की नाही तात्काळ ते पाहणार आहोत. न्यायदंडाधिकाऱ्याचा रिपोर्ट असताना एफआयआर घेत नसतील तर आम्हाला जे पोलीस अधिकारी एफआयआर घेणार नसेल तर आम्ही पुढची स्टेप घेऊ”, असे अमित कटारनवरे म्हणाले.

“फिंगर प्रिट गनवर नाही. पोलिसांनी आरोप केला होता. पण अहवालात पोलिसांचा दावा खोटा ठरला. सेल्फ डिफेन्ससाठी एन्काऊंटर झाल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं, ते सिद्ध होत नाही. डिटेल रिपोर्ट हाती आला नाही. रिपोर्ट आल्यावर तपास करू. सरकार काय भूमिका घेतील हे पाहू”, असेही अमित कटारनवरे यांनी सांगितले.

सुषमा अंधारे काय म्हणाल्या?

अक्षयचा एन्काऊंटर झाला. त्यानंतर मी पत्रकार परिषद घेतली होती. तेव्हाही म्हटलं होतं की, एन्काऊंटर फेक आहे. ही हत्या आहे, असं मी म्हटलं. ज्या पद्धतीने अक्षयला तुरुंगातून बाहेर काढलं होतं, एन्काऊंटर अधिकारी संजय शिंदे याची कारकिर्द वादग्रस्त होती हे मी सांगितलं होतं. पण सत्य बाहेर आल्याबद्दल मी कोर्टाचे आभार मानते, असे सुषमा अंधारे म्हणाल्या.

जबाबदार पोलीस अधिकारी

संजय शिंदे (पीआय) निलेश मोरे (उपनिरीक्षक) हरिश तावडे (हवालदार) अभिजीत मोरे (हवालदार)

कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा.
जेजुरीत भंडाऱ्यानं आगीचा भडका उडाला, प्रत्यक्षदर्शीनं सांगितल घडल काय?
जेजुरीत भंडाऱ्यानं आगीचा भडका उडाला, प्रत्यक्षदर्शीनं सांगितल घडल काय?.
महायुतीत तिढा कायम,सामंत मध्यस्थीसाठी पुण्यात;शिवसेनेचा स्वबळाचा इशारा
महायुतीत तिढा कायम,सामंत मध्यस्थीसाठी पुण्यात;शिवसेनेचा स्वबळाचा इशारा.
दोन भावांची युती अन् मनोमिलन झालंय, 100 टक्के... राऊतांचं मोठं वक्तव्य
दोन भावांची युती अन् मनोमिलन झालंय, 100 टक्के... राऊतांचं मोठं वक्तव्य.
सिंदखेडराजा नगरपरिषदेत 21वर्षीय सौरभ तायडे विजयी, कमी वयाचा नगराध्यक्ष
सिंदखेडराजा नगरपरिषदेत 21वर्षीय सौरभ तायडे विजयी, कमी वयाचा नगराध्यक्ष.
मशालीला आईस्क्रीम कोनासारखं फेकलं...भाजपची टीका, राऊतांचं उत्तर काय?
मशालीला आईस्क्रीम कोनासारखं फेकलं...भाजपची टीका, राऊतांचं उत्तर काय?.
कल्याणमध्ये राजकीय भूंकप, भाजप अन् शिंदे सेनेला मोठा हादरा; एकनिष्ठ...
कल्याणमध्ये राजकीय भूंकप, भाजप अन् शिंदे सेनेला मोठा हादरा; एकनिष्ठ....
हे विजयी कसे झाले? महायुतीच्या विजयानंतर 'समाना'तून जोरदार टीकास्त्र
हे विजयी कसे झाले? महायुतीच्या विजयानंतर 'समाना'तून जोरदार टीकास्त्र.
...म्हणून गप्प होतो, पण आता ती वेळ आलीये, नितेश राणेंचा रोख कुणाकडे?
...म्हणून गप्प होतो, पण आता ती वेळ आलीये, नितेश राणेंचा रोख कुणाकडे?.
जागा वाटपाची रस्सीखेच फार ताणू नका... राज ठाकरे यांच्याकडून सूचना
जागा वाटपाची रस्सीखेच फार ताणू नका... राज ठाकरे यांच्याकडून सूचना.