AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NCP : महाराष्ट्राच्या सत्तानाट्यात पणजीच्या हॉटेलात अटक केलेल्या राष्ट्रवादीच्या महिला नेत्याला जामीन, दहशतवाद्यांसारखी वागणूक दिली, सोनिया दहून यांचा आरोप

शिवसेनेच्या बंडखोर उमेदवारांशी संपर्क करण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना पकडले. खोटी कागदपत्रे सादर करुन सोनिया आणि त्यांचा सहकारी श्रेय कोठिलाय यांनी हॉटेलात घुसण्याचा आरोप पोलिसांनी केला होता. मात्र सोनिया यांनी हे आरोप नाकारले आहेत.

NCP : महाराष्ट्राच्या सत्तानाट्यात पणजीच्या हॉटेलात अटक केलेल्या राष्ट्रवादीच्या महिला नेत्याला जामीन, दहशतवाद्यांसारखी वागणूक दिली, सोनिया दहून यांचा आरोप
NCP sonia dahoonImage Credit source: social media
| Edited By: | Updated on: Jul 06, 2022 | 4:37 PM
Share

पणजी – जेव्हा राज्यातील सत्तानाट्य क्लायमेक्सवर होते, सगळ्यांच्या नजरा जेव्हा एकनाथ शिंदेंसोबत (Eknath Shinde)असलेल्या बंडखोर आमदारांच्या मूव्हमेंटवर होत्या. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसची एक महिला नेता 2019 प्रमाणेच आमदारांना हॉटेलातून बाहेर काढण्याच्या प्रयत्नात होती. मूळ हरियाणातील असलेल्या 30 वर्षांच्या या महिलेचे नाव आहे सोनिया दहून. सोनिया दहून (Sonia Dahoon)या राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा (NCP student wing)आहेत. सोनिया दहून यांच्यामुळेच 2019 साली भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे काही तासांचे सरकार पडले होते. 2019 साली विधासभा निवडणुकीच्या निकालानंतर पेच निर्माण झाला होता. त्यावेळी फडणवीस आणि अजित पवार यांनी एके दिवशी सकाळीच त्यांचा शपथविधी उरकला होता. त्यावेळी राष्ट्रवादीचे चार आमदार हे गुरुग्रामच्या एका हॉटेलमध्ये थांबले होते, त्या चारही आमदारांची सुटका सोनिया यांनी केली होती.

गोव्यातही आमदारांचे मन वळवण्याचा प्रयत्न

2019प्रमाणेच गोव्यात पोहचलेल्या शिवसेनेच्या आंमदारांचे मन परिवर्तनाचा प्रयत्न सोनिया दहून यांनी केला, मात्र हे प्रकरण त्यांच्या अंगाशी आले. सोनिया दहून या कामगिरीसाठी गोव्यातील डोना पाऊला या परिसरात असलेल्या ताज रिझॉर्ट आणि कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पोहचल्या होत्या. त्यांनी चेक इनही केले होते. मात्र ऐन वेळी त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्यासोबत एक साथीदारही होता. त्या दोघांना रविवारी जामीन मंजूर करण्यात आला आहे.

पोलिसांनी दहशतवाद्यांप्रमाणे वागवले – सोनिया

शिवसेनेच्या बंडखोर उमेदवारांशी संपर्क करण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना पकडले. खोटी कागदपत्रे सादर करुन सोनिया आणि त्यांचा सहकारी श्रेय कोठियाल यांनी हॉटेलात घुसण्याचा आरोप पोलिसांनी केला होता. मात्र सोनिया यांनी हे आरोप नाकारले आहेत. पोलिसांनी दहशतवाद्यांच्या पद्धतीची वागणूक आपल्याला दिल्याचा त्यांचा आरोप आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना त्रास दिल्याचेही सोनिया यांचे म्हणणे आहे.

नेमकी कशी झाली अटक

सोनिया दहून यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे- पोलीस, कमांडो आणि एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी सकाळी साडे पाचच्या सुमारास त्यांना हॉटेलमधून उचलले. पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी दहशतवादी असल्याप्रमाणे वागणूक दिली. त्यांची अनेक तास चौकशी करण्यात आली.

संघर्ष सुरुच राहील-सोनिया यांचे ट्विट

जामीन मिळाल्यानंतर सोनिया दहून यांनी ट्विट केले आहे, यात तुम्ही मला धोकेबाज ठरवलेत, तुरुंगात टाकलेस सरकारी यंत्रणांच्या चौकशीच्या नावाखाली मला त्रास दिलात, मात्र मी हिंदुस्तानची बेटी आहे. शरद पवार आणि कोट्य़वधी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची ताकद माझ्या मागे आहे. तुमच्या चार दिवसांच्या सत्तेला मी घाबरत नाही. संघर्ष सुरु राहील, सत्य मेव जयते. असे लिहिले आहे. सोनिया आणि श्रेय हे पर्यटनासाठी गोव्यात आले होते, मात्र त्यांना नाहक त्रास देण्यात आला, असा आरोप राष्ट्रवादी युवा खाशेचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांनी केला आहे. या सहकाऱ्यांना अडकवण्यात आले, असेही त्यांचे म्हणणे आहे. गोवा सरकारने महाराष्ट्रातील आमदारांना सुरक्षा पुरवली, मात्र तरुणांना नाहक त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.