AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बीडमध्ये गुंडाराज, 2 गटांत वाद, एकाच दिवशी 5 ठिकाणी मारहाण; नेमकं काय घडलं?

बीड जिल्ह्यात धक्कादायक प्रकरण घडले आहे. येथे दोन गटाचा वाद झाला असून भर रस्त्यावर पाच ठिकाणी मारहाणीच्या घटना घडल्या आहेत.

बीडमध्ये गुंडाराज, 2 गटांत वाद, एकाच दिवशी 5 ठिकाणी मारहाण; नेमकं काय घडलं?
beed crime news
| Updated on: Jul 13, 2025 | 7:59 PM
Share

Beed Crime News : बीडच्या माजलगाव तालुक्यातील केसापुरी येथील जायकोबा राठोड, रमेश राठोड आणि त्यांचा चुलत भाऊ बाळू राठोड यांच्यामध्ये 8 जुलै रोजी वाद झाला. यावेळी तलवार आणि लाठ्या-काठ्यांनी मारहाण झाली. या घटनेचा व्हिडिओ tv9 मराठी च्या हाती लागला असून यामध्ये एका व्यक्तीच्या हातात तलवार दिसत आहे. या प्रकरणात अद्यापपर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही. माजलगाव ग्रामीण पोलिसांशी संपर्क साधला असता अद्यापपर्यंत कोणाचीही तक्रार आलेली नाही. फिर्याद आल्यास आम्ही शहानिशा करून गुन्हा दाखल करू असं सांगण्यात आलं.

तू बाळू राठोड सोबत कसा आला ?

मारहाण झाल्यानंतर जखमी रमेश राठोड आणि बाळू राठोड यांना बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. बाळू राठोडला भेटण्यासाठी शेजारच्या निपाणी टाकळी गावचा उपसरपंच लक्ष्मण चव्हाण हा जिल्हा रुग्णालयात आला होता. यावेळी रुग्णालयाच्या गेटवर तू बाळू राठोड सोबत कसा काय आला ? असा जाब विचारत आपल्यालाच मारहाण झाल्याचा दावा करत उपसरपंच लक्ष्मण चव्हाण याने जायकोबा राठोड याच्यावर आरोप केलाय. जायकोबा राठोड याने आपल्यालाच तिघांनी मारहाण केल्याचं सांगितलं. याप्रकरणी जायकोबा राठोड याच्या फिर्यादीवरून बीड शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या मारहाणीचा देखील व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

केलेल्या तक्रारीमुळे लोखंडी रॉडने मारहाण

तर जायकोबा राठोडच्या आरोपानुसार माजलगाव तालुक्यातील जय महेश कारखाना परिसरातील मुख्य रस्त्यावर उपसरपंच लक्ष्मण चव्हाण आणि इतरांनी आपण बीड शहर पोलिसात केलेल्या तक्रारीमुळे लोखंडी रॉडने मारहाण केली. यामध्ये त्याचा हात फ्रॅक्चर झाला होता. सध्या त्याच्यावर बीडच्या खासगी कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवल्याने…

या मारहाणीच्या घटनेनंतर 11 जुलै रोजी निपाणी टाकळी येथील ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभा पार पडली या ग्रामसभेत आपण भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवल्याने निपाणी टाकळी गावचे सरपंच भगवान राठोड, जायकोबा राठोड आणि इतरांनी मारहाण केली असा आरोप उपसरपंच लक्ष्‍मण चव्हाण याने केला आहे.

राजकीय द्वेषापोटी खोटे आरोप?

दरम्यान निपाणी टाकळी गावचे सरपंच भगवान राठोड यांनी पोलिसांना निवेदन देत आपला या प्रकरणाशी संबंध नसून राजकीय द्वेषापोटी खोटे आरोप करून आपल्याला बदनाम केलं जात असल्याचं म्हटलंय. तर उपसरपंच लक्ष्‍मण चव्हाण यांना अमानुष मारहाण झाल्यानंतर त्यांच्या गटाच्या लोकांनी आपल्याला उचलून नेऊन बेदम मारहाण केल्याचा दावा विष्णू राठोड या जायकोबा राठोडच्या गटातील व्यक्तीने केला आहे. दरम्यान उपसरपंच लक्ष्‍मण चव्हाण, तरुण विष्णू राठोड यांच्यावर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मात्र घडलेल्या या सर्व घटना भर रस्त्यावर आणि भर दिवसा घडलेल्या आहेत आणि मारहाण करणाऱ्या व्यक्तींनी व्हिडिओ काढत मारहाण केलेली आहे. तेच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करत दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. यामुळे आता पोलिसांकडून सुमोटो अंतर्गत गुन्हा दाखल करून विशेष कारवाई केली जाते का हे पाहणं महत्त्वाचं असेल.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.