नर्तकीच्या प्रेमात वेड्या उपसरपंच गोविंद बर्गे मृत्यूप्रकरणात धक्कादायक दावा, बीड जिल्हातील राजकीय मंडळी अडचणीत, थेट गंभीर..
Govind Barge case : बीडच्या गेवराई तालुक्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येनंतर मोठी खळबळ उडाल्याचे बघायला मिळतंय. सातत्याने गंभीर आरोप केली जात आहेत. आता नुकताच या प्रकरणात राजकीय नेत्यांवर आरोप करण्यात आला आहे.

बीड जिल्हा मागील काही दिवसांपासून तूफान चर्चेत असतानाच बीडच्या गेवराई तालुक्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी थेट कार लॉक करून गोळी झाडून आत्महत्या केली. हैराण करणारे म्हणजे गोविंद यांनी सोलापूर जिल्हातील सासुरेगावात कला केंद्रात काम करणाऱ्या नर्तकीच्या घरासमोर ही आत्महत्या केली. कला केंद्रात काम करणारी नर्तकी पूजा गायकवाड आणि माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्यात मागील दीड वर्षांपासून प्रेमसंबंध होती. गोविंद आणि पूजा यांची पहिली भेट कला केंद्रातच झाली. त्यानंतर पूजासाठी गोविंद बर्गे हे सातत्याने कला केंद्रात तिला भेटण्यासाठी जात. गोविंद यांनी पूजा हिच्यावर मोठा पैसा उधळला.
फक्त माजी उपसरपंचच नाही तर गोविंद बर्गे यांचा प्लॉटिंगचा व्यवसाय होता. प्लॉटिंगचा व्यवसाय असल्याने मोठा खेळता पैसा त्यांच्या हातात होता. शिवाय ते ठेकेदार असल्यानेही मोठ्या लोकांसोबत त्यांचे बसणे उठणे कायमच असायचे. गोविंद हे नर्तकीच्या प्रेमात इतके जास्त बुटाले होते की, त्यांना काय बरोबर आणि काय चूक हे कळणे देखील कठीण झाले. आयफोन, सोन्याचे दागिने, नाणे, बुलेट, प्लॉट, मोठी जमीन असे त्यांनी बरेच काही पूजाला दिला.
यादरम्यानच्या काळात पूजा ही गोविंद बर्गे यांच्या गेवराईतील बंगल्यात गेली होती आणि तिला हा बंगला इतका जास्त आवडला की, तो बंगला तिला हवा होता आणि यावरूनच दोघांमध्ये वाद झाला आणि नर्तकीने गोविंद यांचा संपर्क तोडला. मात्र, नर्तकी बोलत नसल्याने गोविंद व्याकून झाले आणि त्यांनी काहीच मार्ग निघत नसल्याने शेवटी मानसिक तणावात येऊन थेट आत्महत्येचे पाऊल उचलले. गोविंद बर्गे यांच्या भाच्याने अत्यंत गंभीर आरोप केली आहेत.
मामा गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येनंतर बोलताना गोविंद बर्गे यांच्या भाच्याने म्हटले की, हा मोठा कट माझ्या मामाच्या विरोधात रचण्यात आलाय. माझा मामा कधीच दारू पित नव्हता. मग मामाची बॉडी सापडली तिथे दारूच्या बॉटल कशा? बीडमधील जिल्हातील काही मोठ्या राजकारणी व्यक्तींनीच माझ्या मामाची आणि पूजाची ओळख करून दिली होती. यामागे मोठा कट आहे, असा संशय देखील त्याने व्यक्त केला. मात्र, कोणत्याही राजकारण्याचे त्याने नाव घेतले नाही.
