AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी चिकन राइस आणायला पाठवलं, मग प्रियकराला कॉल करून खेळ खल्लास…

बीडमधील लिंबागणेश येथे पत्नीने प्रियकराच्या मदतीने पती किरण सोनवणेचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पत्नीने पतीला चिकन राईस आणायला पाठवून प्रियकराला हत्येची माहिती दिली. त्यानंतर प्रियकराने मित्रासह गळा आवळून खून करत अपघाताचा बनाव केला. पोलिसांनी डिजिटल पुराव्यांच्या आधारे पत्नी, प्रियकर आणि त्याच्या मित्राला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

आधी चिकन राइस आणायला पाठवलं, मग प्रियकराला कॉल करून खेळ खल्लास...
बीडमधील गुन्ह्याने गावकरी हादरले
| Updated on: Jun 11, 2026 | 11:17 AM
Share

वेगवेगळ्या गुन्ह्यांच्या घटनांनी राज्यातील नागिरक हादरले आहेत, मात्र तरीही गुन्हेगारीला अद्याप आळा बसलेला नाही. बीडमध्ये एका महिलेने तिच्या प्रियकरासह मिळून पतीची हत्या केली. नंतर एकमेकांना फोन करून “कार्यक्रम ओके” असा संदेशनही दिला. या खुनाने अखंख बीड हादरलं होतं. या प्रकरणी पोलिसांनी मृत व्यक्तीची पत्नी प्रियांका सोनावणे, तिचा प्रियकर दशरथ परदेशी आणि मित्र धीरज येडे या तिघांना अटक केली होती. संपूर्ण बीडमध्ये खळबळ आणि दहशत माजवणाऱ्या खून प्रकरणाचा पोलिसांकडून कसून तपास सुरू असून आता याच केसमध्ये एक मोठी अपडेट समोर आली आहे.

लिंबागणेश परिसरात प्रेम प्रकरणातून झालेल्या हत्या प्रकरणात नवा खुलासा झाला आहे. पत्नी प्रियांका हिनेच तिचा पती किरण याला चिकन राईस आणायला पाठवलं होतं. नंतर तिने प्रियकराला फोन केला आणि त्याने पतीचा काटा काढल्याचे उघड झाले आहे. खून केल्यानंतर प्रियकर दशरथ परदेशीने त्याची प्रेयसी प्रियांकाला फोन करून “कार्यक्रम ओके” असे सांगितले. त्यानंतर रात्री तब्बल चार ते पाच तास इंस्टाग्रामवरून त्यांचा एकमेकांशी संवाद झाल्याचेही तपासात उघड झाले आहे.

नक्की काय घडलं ?

मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या नेकनूर पोलीस स्टेशन हद्दीतील लिंबागणेश परिसरात 31 मे रोजी रोडलगत दुचाकीसोबत किरण सोनवणे नामक तरुणाचा मृतदेह आढळून आला. हा अपघात असून त्यामुळेच मृत्यू झाल्याचे सुरुवातीला सर्वांनाच वाटलं. मात्र पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमॉर्टमसाठी पाठववा, अहवाल आल्यावर सगळेच हादरले. किरणचा मृत्यू अपघाती नसून त्याची हत्या झाल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी कसून तपास करून किरण सोनवणे याची पत्नी प्रियंका सोनवणे, तिचा प्रियकर दशरथ परदेशी आणि मित्र धीरज येडे या तिघांना अटक केली.

पतीला चिकन राईस आणायल पाठवलं आणि काढला काटा

त्यांच्या चौकशीतून अनेक खुलासे झाले. पत्नी प्रियंका सोनवणे हिने किरणला चिकन राईस आणण्यासाठी पाठवले आणि याची माहिती तिने तिचा प्रियकर दशरथ परदेशी याला दिली. त्यानंतर दशरथ परदेशी याने मित्र धीरज येडे याच्यासोबत मिळून किरण सोनवणे याला गाठलं आणि गळा आवळून त्याची हत्या केली. त्यानंतर दुचाकी त्याच्या अंगावर ठेवून अपघाताचा बनाव त्यांनी रचला.

ह्या झाल्यानंतर दशरथ याने प्रियांकाला फोन करून “कार्यक्रम ओके” असा मेसेज कोडवर्डमध्ये दिला. यानंतर रात्री तब्बल चार ते पाच तास इंस्टाग्राम वरून कॉल द्वारे त्या दोघांचा संवाद सुरू होता. याप्रकरणी पोलिसांनी अनेक डिजिटल पुरावे हस्तगत केले असून न्यायालयात हजर केल्यानंतर तिघांना पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. प्रेम प्रकरणा असल्याने तसेच पती किरण सोनावणे हा दारू पिऊन प्रियांकाला वारंवार त्रास देत होता, त्यामुळे ही हत्या केली असं कारण आरोपींनी सांगितलं.

Follow Us
राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी...
SMA | राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!
अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी!
BJP VS Shiv Sena | अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी! शिवसेना-भाजप आमनेसामने
पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर..
MPSC Studant | पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर पडताच गाडीत कोंबलं; नेमकं काय घडलं?
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये; पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट समोर
जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल..
Vikhe Patil on Manoj Jarange | जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल आल्यानंतर...
मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा...
Mumbai | मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा-बिटरूट आणण्यास मनाई; मनसेचं माळा घेऊन आंदोलन
लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
Babasaheb Patil | अश्लीलता नेमकी कशाला म्हणायचं? लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
Jalna | जालन्यात मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली माहिती, तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर ठाकरे संतापले, म्हणाले..
Raj Thackeray | दादासाहेब फाळकेंच्या महाराष्ट्राला डावललं? राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर राज ठाकरे संतापले, म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...