बीड जिल्ह्यात नाईट कर्फ्यू लागू, सायंकाळी 7 ते सकाळी 7 कर्फ्यू, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात काय काय?

वाढणाऱ्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात नाईट कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. | Beed night Curfew

बीड जिल्ह्यात नाईट कर्फ्यू लागू, सायंकाळी 7 ते सकाळी 7 कर्फ्यू, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात काय काय?
lockdown

बीड : बीड जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव (Corona Virus Update) वाढला आहे. दररोज कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात नाईट कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी आदेश काढले आहेत. (Beed night Curfew Over Corona Positive Cases Increasing)

बीड जिल्ह्यामध्ये सायंकाळी सात ते सकाळी सातपर्यंत वाजेपर्यंत कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी घेतला आहे. तसंच या वेळेत अत्यावश्यक सेवा वगळता जिल्ह्यातील सर्वच व्यवसाय बंद राहणार आहेत.

काय सुरु, काय बंद?

1) बीड जिल्ह्यातील सर्व हॉटेल, खानावळ, बार, रेस्टॉरंट, ग्राहकांसाठी संपूर्णत: बंद राहतील. फक्त पार्सल सेवा सुरु राहतील. हॉटेलमध्ये कोरोना नियमांचं पालन करावं.
2) जिल्ह्यातील सर्व मंगल कार्यालये, फंक्शन हॉल आणि इतर कार्यक्रमांवर 18 मार्च रोजीच्या नंतर अनिश्चित काळासाठी बंद
3)जिल्ह्यातील फळ विक्रेते आणि भाजीपाला विक्रेते यांनी मास्क लावून फळविक्री करावी. जो नियम मोडेल त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.
4) सर्व दुकानदार तसंच आस्थापनाधारक यांनी दर 15 दिवसाला कोरोना चाचणी करुन त्याचा अहवाल जवळ बाळगणं अत्यावश्यक
5)जिल्ह्यातील सर्व दुकाने, आस्थापने , दूध विक्रेते दररोज सायंकाळी 7 ते सकाळी 7 पर्यंत बंद राहतील. (मेडिकल सेवा वगळून)

जिल्ह्यातील अनेक दुकानदार, व्यापाऱ्यांना कोरोनाची लागण

बीड शहरातील अनेक व्यापारी दुकानदार आणि दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं असल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने यापुढे सर्व दुकानदार तसंच आस्थापनाधारक यांनी दर 15 दिवसाला कोरोना चाचणी करुन त्याचा अहवाल जवळ बाळगणं अत्यावश्यक असल्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

हे ही वाचा :

नगरमध्ये कोरोना रुग्णांमध्ये वाढ, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक रस्त्यावर, नियम मोडताना दिसला की कारवाई!

राज्यात कोरोनाचा कहर, मंत्रालयातील ‘या’ विभागात दोन शिफ्टमध्ये काम

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI